सर्वप्रथम या सुंदर फ़ोटोग्राफ़्स वर एक नजर टाका !
http://www.stephgrantphotography.com/blog/shannon-seema-indian-lesbian-…
काही दिवसांपुर्वीच शॅनॉन आणि सीमा या दोन स्त्रियांमधील हा सुंदर लेस्बीयन विवाहसोहळा लॉसएंजल्स या अमेरीकेतील शहरात थाटामाटात संपन्न झाला. हा एका अर्थाने क्रांतीकारी विवाह म्हणावा लागेल. कारण हा नेहमीसारखा एक स्त्रि व एक पुरुष यांच्यातील विवाह नव्हता. तर एका स्त्रि ने केलेला दुसरया स्त्रि बरोबर चा विवाह होता. हा अनेक अर्थांनी वेगळा असा विवाहसोहळा म्हणता येईल याची कारणे अशी की
एक तर हा विवाह अतिशय मोकळेपणाने संपन्न झाला. असे समलैंगिक विवाह क्वचितच इतक्या निर्भयतेने संपन्न होतात. याच्या अगदी नेहमीच्या विवाहासारख्या पत्रिका छापण्यात आल्यात. अनेक प्रतिष्ठीत लोकांना आमंत्रणे पाठविण्यात आली. आणि मोठ्या संख्येने अगदी प्रतिष्ठीत लोकांनी या विवाहाला हजेरी लावली. आणि आपला पाठींबा एक प्रकारे जाहीर केला. असे विवाह सामान्यत: छुपेपणाने होतात त्या पार्श्वभुमीवर यातील आयोजकांचा मोकळेपणा आणि हजेरी लावणारयांचा देखील मोकळेपणा विशेष असाच होता.
दुसरी एक खासियत म्हणजे हा विवाह अगदी व्यवस्थित असा विधीवत पार पाडण्यात आला. दोन्ही वधुंनी अग्निला साक्षी मानुन छान वैदिक पध्दतीने सात फ़ेरे वगैरे घेतले. मेंदी ,मेकअप, वधुला भावांनी डोली त बसवुन आणणे आदी सर्व अगदी साग्रसंगीत करण्यात आलं. आणि त्याच बरोबर ख्रिश्चन पध्दतीने देखील विवाहाचे विधी पाळण्यात आले. एक वधु ख्रिश्चन आणि एक हिंदु असे असुनही कुठेच काहीच अडचण आली नाही. दोन्ही कडचे हिंदु आणि ख्रिश्चन पाहुणे या विवाहात सामील झाल्याने दोन्ही धर्माच्या लोकांना एकमेकांच्या विधीची छान माहीती करुन घेता आली व परंपरेतील वैविध्या चा आनंद ही लुटता आला.
यात विशेष म्हणजे या हिंदु मुलीचे भाउ आई आणि वडिल यांचा या विवाहाला पाठिंबा च नव्हे तर तो धुमधडाक्यात आणि अतिशय शानदार पध्दतीने करावा असे मत होते आणि तसा त्यांनी तो करुनही दाखविला. याचे फ़ोटोग्राफ़्स एका प्रसिध्द फ़ोटोग्राफ़र स्टेफ़ ग्राफ़ हीने काढलेले असुन ते ओपनली सर्वत्र प्रसिध्द देखील केलेले आहेत.फ़ोटोग्राफ़्स पण अतिशय सुंदर जमुन आलेले आहेत. असाच सपोर्ट दुसरया मुलीच्या घरच्यांचा ही होता.हे सर्वात विशेष ! यात सर्वात कौतुकाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुलींच्या कुटुंबियांनी ज्या सुंदर उमदेपणाने व माणुसकीने प्रेमाने आपापल्या मुलींच्या लैंगिकतेचा जो बिनशर्त स्वीकार केला. व त्यांच्या आनंदातच आपला आनंद मानुन अगदी पुर्ण सपोर्ट देउन त्यांना आपले आयुष्य आपले स्वातंत्र्य जपु दिले ही आहे.
हे सर्व करतांना त्यांनी बुरसटलेल्या विचारसरणीचा आपल्यावर प्रभाव पडु दिला नाही. प्रत्येक व्यक्तीला माणुस म्हणुन आपल्या लैंगिकतेची निवड करावयाचा हक्क आहे व त्याचा सम्मान केला पाहीजे ही जाणीव या पालकांनी दाखविली हे महत्वाचे आहे.हा बदल सुखावह आहे. शाल्मली पालेकर ( अमोल पालेकरांची पहील्या पत्नीपासुन झालेली मुलगी) ही देखील ओपनली लेस्बीयन आहे. तिच्या आईला जेव्हा हे प्रथम कळले. तेव्हा तिला चित्रा पालेकरांना थोडा धक्का स्वाभाविकपणे बसला. परंतु नंतर त्यांनी ही आपल्या मुलीला समजावुन घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. तिच्याकडुन या विषयावरची पुस्तके मागविली आणि लेस्बीयन म्हणजे नक्की काय असते त्यांची जीवनशैली काय असते हे समजुन घेतले. आणि आज त्या ठामपणे तिच्या पाठीशी उभ्या आहेत. आज त्यांना आपली मुलगी लेस्बीयन आहे या गोष्टीची अजिबात लाज वाटत नाही. इनफ़ॅक्ट घटनेचे जे एक कलम ३७७ समलैंगिकांच्या नैसर्गिक हकांवर गदा आणते त्या विरोधातील लढ्यात त्या समलैंगिकाचे पालक या नात्याने सक्रिय रीत्या उतरल्या आहेत. हा बदल निश्चितच आनंददायी आहे.खालील लिंक बघा.
http://www.indianexpress.com/news/-read-books-to-understand-daughter-s-…
आजपर्यंत ही लोक केवळ अल्प्संख्य आहे म्हणुन यांना विकृत ठरविण्यापासुन ते माणुसकीचे साधे हक्क ही नाकारण्यात आलेले आहेत. खर तर आज ही हे सर्व सुरु आहे. या लैंगिकतेला अनैसर्गिक ठरविण्याचा प्रयत्नही मोठ्या प्रमाणावर झालेला आहे.अर्थात यातील बरेच दावे पोकळ सिद्ध झालेले आहे
या विवाहाची आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे दोन्ही मुली या सुशिक्षीत आहेत. स्वत:चे स्वतंत्र विचार असणारया आणि करीयर असणारया आहेत.दोघांची कुटुंबेही सुसंकृत आहेत.आणि वयाने ही इनफ़ मोठ्या आहेत. आणि सर्वात शेवटी या मुलींच्या बॉडी लॅंग्वेज कडे नीट बघा काय निर्भय आणि दुरदुरपर्यंत कुठेही अपराध गंड अथवा लज्जा यांच्या चेहरयावर दिसत नाही.
दिसतोय फ़फ़्त जबरदस्त आत्मविश्वास आणि एकमेकांवरील निखळ अनिर्बंध प्रेम !
त्यांच्या प्रेमाला सलाम ! त्यांच्या हिंमती ला सलाम !
वाचने
32558
प्रतिक्रिया
133
मिसळपाव
प्रतिक्रिया
दोन स्त्रीयांमधले (किंवा
१०० % सहमत
पत्रिका जुळली वाटते
पत्रिका आणि ३६ गुण पण जुळले
In reply to पत्रिका जुळली वाटते by टवाळ कार्टा
छान !! आता त्यांच्या आनंददायी
.
वर आणि वधु
In reply to . by शिद
छान आहे.....पुढे काय काय होते
अगम्य आहे...
हा निसर्गाचा चमत्कार मानावा
In reply to अगम्य आहे... by वाटाड्या...
कायच्या काय उदाहरण आहे ….
In reply to हा निसर्गाचा चमत्कार मानावा by राजेश घासकडवी
होउ शकतं ना
In reply to कायच्या काय उदाहरण आहे …. by देवांग
**
धन्यवाद, एक अप्रतिम
यप्प... बेस्ट एकदम :)
In reply to धन्यवाद, एक अप्रतिम by मालोजीराव
चान चान!
हे सगळं चांगलय हो पण अजून वेळ
होऊ दे खर्च!! लग्न आहे घरचं..
In reply to हे सगळं चांगलय हो पण अजून वेळ by रेवती
बाकी सगळं ठीक.
थिंक अगेन..
In reply to बाकी सगळं ठीक. by अर्धवटराव
तुम्ही सुद्धा.
In reply to थिंक अगेन.. by विवेक वाघमारे
अर्धवट राव अगोदर पुर्ण माहीती घ्या !
In reply to तुम्ही सुद्धा. by अर्धवटराव
१-विधवा स्त्रिचे शरीर संबंधातुन संतती, संगोपन, याला सामाजीक मान्यता. हि ती सुधारणा.ज्या देशात या समलैंगिक विवाहांना कायदेशीर मान्यता आहे त्या कायद्यात सर्व प्रकारच्या प्रोव्हिजन्स केलेल्याच असतात. त्यात अशा जोडप्यांनी क्रुत्रीम पध्दतीने गर्भधारणा करणे, अशा संतती ला कायदेशीर मान्यता, सामाजिक हक्क इत्यादी आनुषंगिक सर्व बाबींचा उहापोह झालेलाच असतो.मुळात कायदा जेव्हा मान्यता देतो तेव्हाच हे सर्व विचार चिंतन करुनच आनुषंगिक प्रोव्हिजन्स आलेल्याच असतात. प्रस्तुत विवाह जेथे झालेला आहे तेथे तो पुर्णपणे कायदेशीर आहे. व तसाच जगात सर्वत्र व भारतात होईल तेव्हा मग लेस्बीयन्स वर अन्याय होणार नाहीत. आणि ही सर्व लढाई कायदा लागु करण्यासाठीची च आहे.असेल ना.
In reply to अर्धवट राव अगोदर पुर्ण माहीती घ्या ! by मारवा
फोटो मस्त विषय जबरदस्त
मला पडलेले काही प्रश्न
ए विद्युत, वाहिनी नसतंय रे
In reply to मला पडलेले काही प्रश्न by विद्युत् बालक
थ्री फेज !!
In reply to ए विद्युत, वाहिनी नसतंय रे by प्यारे१
ह्या शेनान वाहिनी तर फेमेल
In reply to मला पडलेले काही प्रश्न by विद्युत् बालक
सहमत आहे.
In reply to ह्या शेनान वाहिनी तर फेमेल by मृत्युन्जय
फोटो आवडले. लेस्बियन तर
लग्न
बरोबर आहे.
In reply to लग्न by राजेंद्र मेहेंदळे
जोरदार पाठींबा आहे.
मला अत्यंत बेसीक प्रश्न पडलाय...
In reply to जोरदार पाठींबा आहे. by शुचि
इतरांच्या लग्नात किती मिरवणार
In reply to मला अत्यंत बेसीक प्रश्न पडलाय... by अर्धवटराव
इन्शुरन्स (मिनेपोलीस मध्ये
In reply to मला अत्यंत बेसीक प्रश्न पडलाय... by अर्धवटराव
सॅक्रीड
In reply to जोरदार पाठींबा आहे. by शुचि
मला 'फ्रेंड्स' या मालिकेत
>>वधुला भावांनी डोली त बसवुन
प्रेम् असलेल्या भिन्नलिंगी
In reply to >>वधुला भावांनी डोली त बसवुन by सूड
भिन्नलिंगी विवाहसंबंध हे
शेम टू शेम मत
In reply to भिन्नलिंगी विवाहसंबंध हे by मृत्युन्जय
वा!
+१
In reply to वा! by निनाद
जोवर तुम्ही अश्या लोकांच्या
बाकी असे विवाह थाटमाटात का
In reply to जोवर तुम्ही अश्या लोकांच्या by स्पंदना
भिन्न लिंगी विवाहांचा जगभर
In reply to बाकी असे विवाह थाटमाटात का by राजेश घासकडवी
लहान मुलांना वृत्तपत्रातल्या
In reply to भिन्न लिंगी विवाहांचा जगभर by स्पंदना
व्हॉट अ परफ़ेक्ट आरग्युमेंट !
In reply to बाकी असे विवाह थाटमाटात का by राजेश घासकडवी
हे खरं तर सर्वसाधारण भिन्नलिंगी विवाहांनाही लागू पडतं की. ज्यांच्या मनात भिन्नलिंगी भावना नसतात त्यांच्यावर इतका काळ हे 'वास्तव' लादलं जायचंच.हॅट्स ऑफ़ टु यु !!!नवदांपत्याचे अभिनंदन
लग्न आणि सेक्स
याला व्यभिचार म्हनता येईल काय
In reply to लग्न आणि सेक्स by प्रसाद गोडबोले
वगैरे वगैरे
In reply to लग्न आणि सेक्स by प्रसाद गोडबोले
हे विवाह बरयाच युरोपियन देशांत कायदीशीर आहेत
In reply to लग्न आणि सेक्स by प्रसाद गोडबोले
६) एका लेस्बीयन कपल मधील पोरीने कोणा परपुरुषाशी संबंध ठेवले तर (आजच्या कायद्याने ) त्याला व्यभिचार म्हनता येईल काय ( मुळात जिथं लग्नच इल्लीगल तर बाकीचे काय ?)अहो हे लग्न ज्या ठिकाणी झालेल आहे तिथे लग्न पुर्णपणे कायदेशीर आहे आणि म्हणुन वारस डिव्होर्स आदिंच्या प्रोव्हिजन्स ही कायदयात अर्थातच आहेत.आणी बरयाच युरोपीय देशात कायदेशीर आहेत हे विवाह.हम्म
चोक्कस
In reply to हम्म by पैसा
मग या अशा समलैंगिक लग्नातून नैसर्गिकरीत्या संतती निर्माण होणे जर शक्य नाही तर हिंदू पद्धतीचे विवाह संस्कार हे केवळ फॅशन म्हणून त्याचा अर्थ समजून न घेता केलेले कृत्य आहेसहमत ! थिल्लरपणा आहे झालं , रहायचं आहे एकत्र तर रहा ना , लग्नाची बोंब कशाला? चीप पोप्युलरिटी आहे नुसती. वास्तविक " लग्न " ही संज्ञाच येथे लागू होत नाही . शयनेषु रंभा इतकीच त्याची व्याप्ती असू शकेल पुन्हा दोन्ही रंभाच ! शरिर संबंध हा महत्वाचा भाग आहे पण त्यापेक्षा अनेक मह्त्वाच्या बाबी लग्न संस्थेत अंतर्भूत आहेत. तो एक संस्कार आहे. हिन्दू धर्माचे सौदर्य त्यातील निसर्गानुरुपता मध्ये आहे. त्याचा व्यतास ताणायचा झाला तर जे नैसर्गिक नाही ते हिंदू नाही. म्हणजे लेस्बियन ( अथवा तत्सम अन्य) यांच्याबदल आदर नाही असा नव्हे.) प्रत्येक जीवाबद्दल ( प्राणीसुद्दा) आदर आहेच , सर्वेपि सुखिनं सन्तु .. पण तरिही अनैसर्गिक ते हिंदू नाही ! हिंदू पद्धतीने लग्न झाले याची हिंदू म्हणून लाज वाटते.होल्ड ऑन
In reply to चोक्कस by विटेकर
रहायचं आहे एकत्र तर रहा ना ,
In reply to चोक्कस by विटेकर
हे आता काय सांगायची गोष्ट आहे का?
In reply to रहायचं आहे एकत्र तर रहा ना , by ऋषिकेश
पोलिस खुप त्रास देतात
In reply to हे आता काय सांगायची गोष्ट आहे का? by वेताळ
भारतात लग्नाशिवाय सेक्स
In reply to हे आता काय सांगायची गोष्ट आहे का? by वेताळ
हिन्दू धर्माचे सौदर्य त्यातील निसर्गानुरुपता मध्ये आहे
In reply to चोक्कस by विटेकर
हिंदू लग्नात अशा विवाहाचा
In reply to हम्म by पैसा
+१
In reply to हम्म by पैसा
@ पैसाताई
In reply to +१ by अनिरुद्ध प
चांगली संतती निर्माण करणे हाच
In reply to हम्म by पैसा
असतो.
In reply to चांगली संतती निर्माण करणे हाच by पिशी अबोली
आहे ना!
In reply to चांगली संतती निर्माण करणे हाच by पिशी अबोली
जर डोली भांगडा चालतं तर
In reply to आहे ना! by पैसा
बेट्या
In reply to जर डोली भांगडा चालतं तर by बॅटमॅन
बेट्या
In reply to बेट्या by पैसा
चांगला मुद्दा आहे.
In reply to बेट्या by पैसा
"विवाहसंस्थेचा इतिहास"
In reply to जर डोली भांगडा चालतं तर by बॅटमॅन
कॉपी आत्ता माझ्याकडे नाही.
In reply to "विवाहसंस्थेचा इतिहास" by प्रसाद गोडबोले
वर आणि वधू यांच्यासाठीच हे
In reply to आहे ना! by पैसा
शेवटी मानणे-न मानणे हाच भाग
In reply to वर आणि वधू यांच्यासाठीच हे by पिशी अबोली
"तर अर्थ समजून न घेता केवळ
In reply to आहे ना! by पैसा
पूर्ण वाचावे ही विनंती
In reply to "तर अर्थ समजून न घेता केवळ by पक्या
आजच्या घटकेला विवाहविधीचे
In reply to पूर्ण वाचावे ही विनंती by पैसा
समलिंगी विवाहाबद्दल विचार
In reply to आजच्या घटकेला विवाहविधीचे by राजेश घासकडवी
एक मिनीट !!
In reply to समलिंगी विवाहाबद्दल विचार by प्यारे१
एक मिनीट !!
. . . . . . माझे पॉपकॉर्न संपलेत .. घेवुन येतो ..माझ्यासाठी पण! आणच
In reply to एक मिनीट !! by सुहास..
आणच
;)अहो भाऊ नर-मादी काय करताय,
In reply to समलिंगी विवाहाबद्दल विचार by प्यारे१
दुसऱ्या एका वेबसाइटवर मला हे
In reply to पूर्ण वाचावे ही विनंती by पैसा
दोघींचेही मनःपूर्वक अभिनंदन!
एक रुढी मोडताना इतर रुढींच्या
अहो ते निर्भेळ आनंद म्हणुन रुढी पाळत आहेत !
लग्न केल्यानंतर सेक्स करतील असा भाबडा आशावाद नसावा
मग भिन्नलिंगी विवाह काय
In reply to लग्न केल्यानंतर सेक्स करतील असा भाबडा आशावाद नसावा by वेताळ
+१
In reply to मग भिन्नलिंगी विवाह काय by बॅटमॅन
+२
In reply to +१ by मालोजीराव
'शरीरसंबंध करण्याचे योजिले
In reply to +२ by बॅटमॅन
पत्रिका
In reply to 'शरीरसंबंध करण्याचे योजिले by प्रसाद गोडबोले
येस! ही पत्रिका मी स्वतः
In reply to 'शरीरसंबंध करण्याचे योजिले by प्रसाद गोडबोले
माझ्या कडे आहे.. माझ्या आई
In reply to येस! ही पत्रिका मी स्वतः by बॅटमॅन
हम्म, असे प्रसंग अनुभवले आहेत
In reply to माझ्या कडे आहे.. माझ्या आई by पिलीयन रायडर
अमान्य. कुठल्याही लग्नामागची
In reply to लग्न केल्यानंतर सेक्स करतील असा भाबडा आशावाद नसावा by वेताळ
बरंचसं आदर्शवादी. योग्य देखील
In reply to अमान्य. कुठल्याही लग्नामागची by मृत्युन्जय
खुपच सुंदर
In reply to अमान्य. कुठल्याही लग्नामागची by मृत्युन्जय
प्यारेचा प्रतिसाद वाचल्यावर
In reply to खुपच सुंदर by वेताळ
आमच्या समाजात लग्नाशिवाय
In reply to खुपच सुंदर by वेताळ
वरील विधान तुमच्या प्रतिसादावरुन लिहले होते.
In reply to आमच्या समाजात लग्नाशिवाय by मृत्युन्जय
आनंदाची बातमी , या दोन
बुरसटलेली????
प्रभाकर पेठकर यांना
In reply to बुरसटलेली???? by प्रभाकर पेठकर
मानसिक तयारी नाही.
In reply to प्रभाकर पेठकर यांना by मारवा
पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष
In reply to बुरसटलेली???? by प्रभाकर पेठकर
घोर गैरसमज....
In reply to पुन्हा एकदा, स्त्री-पुरुष by विवेक वाघमारे
जे नैसर्गिकरीत्या समलिंगी आहेत त्यांनी ते जाहीर केले
In reply to घोर गैरसमज.... by प्रभाकर पेठकर
मुळात नैतिकता आणि नैसर्गिकता
हल्लीच
In reply to मुळात नैतिकता आणि नैसर्गिकता by ऋषिकेश
होय आणि माणूस व निसर्ग असा
In reply to हल्लीच by पैसा
:)
In reply to होय आणि माणूस व निसर्ग असा by नगरीनिरंजन
मोझेसच्या दहा आज्ञांमधली आठवी
ही गोष्ट फार पुर्वीपासुन आहे
In reply to मोझेसच्या दहा आज्ञांमधली आठवी by कंजूस
या निमित्ताने हे आठवले...
खूप छान दुवा वाचायला
In reply to या निमित्ताने हे आठवले... by बिपिन कार्यकर्ते
जेवणात जिलबि होती क?
ग्रीक
नेमके!!! लेस्बियन हा शब्द
In reply to ग्रीक by निनाद
अगदी अचुक सांगितलय तुम्ही साफ़ो विषयी निनाद भाउ !
In reply to ग्रीक by निनाद
पण स्त्री स्वातंत्र्य
In reply to अगदी अचुक सांगितलय तुम्ही साफ़ो विषयी निनाद भाउ ! by मारवा
पण नक्की प्रॉब्लेम काय झालाय?
मुख्य म्हणजे यात अनैसर्गिक
बहुपत्नित्व आणि समलैंगिक
हुप्प्याजी, तसे नव्हे. स्त्री
In reply to बहुपत्नित्व आणि समलैंगिक by हुप्प्या
तसे का नव्हे म्हणतो मी?
In reply to हुप्प्याजी, तसे नव्हे. स्त्री by रेवती
बहुपत्नित्वाने मोठाच घोळ होतो
In reply to तसे का नव्हे म्हणतो मी? by हुप्प्या
या निमित्ताने
ह्म्म... व्यक्ति सापेक्ष
नैर्सगिकतेचा आणि नैतिकतेचा
दोघींनाही भावी आयुष्यासाठी
Why not blacks..