झालं काय होतं कि आमच्या लग्नाची घाई झाली होती घरच्यांना....
आणि तसं बघायला गेलं तर सगळ्या "आवडत्या" मैत्रिणींच्या लग्नाचं जेवण पण आम्ही पचवलं होता (दुःख पचवलं या अर्थी पचवलं).... म्हणून ठरलं कि आता बघायच्या कार्यक्रमांना सुरुवात करायची आणि मग पत्रिका, फोटो (हा माझ्या आज पर्यंतच्या काढलेल्या सगळ्या फोटोत सगळ्यात जास्त पैसे देऊन काढलेला सगळ्या वाईट फोटो होता... ) इत्यादी तयारी झाली आणि शुभारंभ (????) झाला.... नातेवाईक आणि ओळखीच्या लोकांमध्ये टपून बसलेले बरेच जण पुढे सरसावले आणि हमालांनी सामानावर तुटून पडावं असे ते माझ्या "स्थळावर" तुटून पडायला लागले.....
खर तर रविवार ची सकाळ म्हणजे मिसळ पाव खायचा, आणि एक कटिंग मारत मित्रांच्या बरोबर एखादा मुव्ही किंवा ट्रेक चा प्लान करायचा खास राखीव टाईम स्लॉट ..... पण मिसळ हरवली आणि कांदे पोह्यांच्या (टोपण नाव - शो - मॉर्निंग शो , मैटिनि शो ई …) बशा रिचवायला आम्ही सुरुवात केली....
सुरुवातीला जशी सगळ्यांना वाटते तशी एक उत्सुकता... प्रत्येक मीटिंग च्या आधी वाटणारी थोडीशी हुरहूर वगैरे अनुभव वेगळेच वाटत होते.... पण लवकरच त्यातलं नाविन्य संपल आणि एक तोच तो पण आला ... एखाद्या टेस्ट मैच मध्ये तेंडुलकर आउट झाल्यावर जितका उत्साह राहतो तसं काहीतरी व्हायला लागलं....
पण कुठे तरी एक जाणीव होत होती.... काहीतरी चुकतंय.... समदुःखी मित्रांचे आई वडील बोलायला लागले होते.... मुली कमावत्या झाल्या, म्हणून फाजील अपेक्षा वाढल्या आहेत... हल्ली मुलींना सगळ रेडीमेड हवंय ई. ई.....
रोज एक नवीन कारण कळायचं....
आज एकीने एकत्र कुटुंब नको म्हणून नकार दिला, तर दुसऱ्याला स्वताच घर नाही म्हणून नकार....
कधी घरात जीन्स वापरली तर चालेल का म्हणून तर कुठे तुम्ही नॉन-व्हेज खात नाही म्हणून फिसकटलं... शेवटी रोज मुद्दा एकच.... या मुलींना हवंय तरी काय ??
मग हळूहळू कळायला लागलं कि जितके प्रॉब्लेम मुलांचे आहेत त्या पेक्षा किती तरी जास्त प्रॉब्लेम मुलींचे आहेत.... प्रत्येक मुलगी स्वतःची एक वेगळी कहाणी घेऊन भेटू लागली.... बायको म्हणून पटत नसेल कदाचित पण एक माणूस म्हणून प्रत्येकीची एक वेगळीच बाजू दिसू लागली...
एक मुलगी, साधीशीच... काहीच अपेक्षा नाहीत फक्त इतकंच कि माझ्या नवऱ्याने माझा एक व्यक्ती म्हणून आदर करावा, निदान बरोबरीची वागणूक तरी द्यावी ....
तर दुसरी एक मुलगी सांगू लागली, माझं एका मुलावर प्रेम होतं पण माझ्या वडिलांनी आत्महत्या करेन असा सांगितलं म्हणून मी आता त्याचा विचार सोडून दिलाय... तू हो म्हणालास तर मी तुझी होईन, नाही म्हणालास तर दुसऱ्याची.... मी लग्न वडीलांसाठी करते आहे…
अशीच एक भेटलेली मुलगी खूप काही सांगून गेली.... तिचेच शब्द ऐकवायचे तर "मला घरकामाचा किंवा नोकरी चा काही प्रोब्लेम नाहीये... सगळ आवडीने करेन... फक्त एकच अपेक्षा आहे .... रात्री सगळ आवरून मी जेव्हा झोपायला येईन बेडरूम मध्ये, तेव्हा माझ्या नवऱ्याने इतकंच म्हणावं कि 'किती दमलीस गं तू, सगळ्याचं सगळ करून खूप दमायला होत असेल ना गं ?? '
इतक जरी तो म्हणाला तरी मी आयुष्यभर काही न मागता राहीन ...."
इतकं सरळ आणि साधं मागणं ?? यात तर काहीच गैर दिसेना ….
एकीला MSc करून पुढे PhD करायचा होत… पण लग्नाच्या बाजारात चांगला भाव मिळावा म्हणून वडिलांनी पोस्टात चिकटवून टाकल होतं … सरकारी नोकरी म्हणजे चांगल स्थळ ना… सरळ गणित …
एक दिवस आमच्याच घरी मॉर्निंग शो होता … मुली कडचे आले… आधी मुलगी कोणती तेच कळेना … कारण आधी बघितलेला फोटो आणि समोर बसलेली मुलगी यांच्यात निवडणुकीआधीचा आणि नंतरच्या उमेदवारा इतका फरक होता…
ते सगळे गेल्यावर माझी आणि बाबांची चिडचिड, फसवायची काय गरज, उगाच आमचा वेळ वाया घालवला वगैरे वगैरे…
संध्याकाळी आई ला घेऊन बाजारात गेलो होतो… समोर चांगली द्राक्ष दिसली … आईला म्हणलं घेऊ थोडी … आईने बारकाईने चांगले घड निवडून काढायला सुरुवात केली … मागचे सगळे घड हिरवे, कच्चे आणि काही थोडे खराब झालेले होते…
(मी बाजारात चुकून गेलोच तर फक्त पिशवी पकडायचं काम ईमाने इतबारे करतो … नाहीतर "सगळी किडकी भाजी तेवढी बरोबर आणलीस , भाजीवाले तूला दुवा देतील हो… आता आणलीच आहेस तर थोडी कामधेनुला खाऊ घाल, थोडी बुद्धी येउदे म्हणो गो-माते " वगैरे जगप्रसिद्ध तिरकस वाक्य ऐकावी लागतात )
मग गाडीवर आमचा संवाद सुरु झाला …
मी - द्राक्षवाले पण कसे फसवतात ना ग आई ??
आई - अरे त्यात काय फसवलं ?
मी - पुढे सगळी चांगली द्राक्ष , आणि मागे सगळी खराब…
आई - अरे सगळेच तसंच करतात, आणि त्याने पुढे खराब द्राक्ष ठेवली तर कोणी येईल का त्याच्या दुकानात?? आपल्याला पटलं तर घ्यायचं नाही तर पुढे जायचं …
रात्रीच्या अंधारात वीज चमकावी तसे ते शब्द कानात शिरले…
अरेच्या, इतक कस नाही कळलं आपल्याला ??
मॉर्निंग शो च्या त्या मुलीत बाकीचे पण गुण असतील पण जर फोटो वरूनच नापसंत झाली तर सगळच संपल … मग पुढे ठेवायचा तो घड चांगला नको ??
मन शांत झालं आणि विचार चालू झालें …
वाटून गेल कि हि कांदे पोह्याची जुलमी पद्धत बदलायला हवी आहे…
इथे मुलीचं दिसणं आणि मुलाचा पैसा हेच महत्वाचं … बाकीच्या गोष्टीना काही महत्वच नाही का ??
खरं तर किती महत्वाच असत… स्वभाव जुळणं , समजून घेणं … पण नाहि…
माझ्याच बाबतीतला एक किस्सा , एका मित्राने विचारल … काय झाल परवाच्या शो (दाखवायच्या प्रोग्रॅमचं )
मी गमतीने म्हणालो अरे १ एप्रिल ला भेटलो होतो , मग काय होणार…
तर तो अर्थतज्ञ चिदम्बरम म्हणे, अरे वा, नवीन आर्थिक वर्षाच्या सुरवातीला भेट झाली … छान …
वाटलं तिथेच त्याच्या डोक्यात २-४ दगड मारून आधी हेल्मेट आणि नंतर डोक फोडावं …
(विनोदावर न हसण्याचा हक्क फक्त सदाशिव पेठे पुरता राखीव आहे असा माझ ठाम मत आहे … )
(वरील विनोद कळला नसल्यास पुढील ब्लॉग वाचण्या आधी पु. ल. किंवा व, पुं. चे एखादे पुस्तक वाचावे हि नम्र विनंती )
हे एकदा झालं तर ठीक, आयुष्यभर जर अशीच विसंगत जोडी जमली तर ?? पण आपण हे सगळ बघतच नाही ना लग्न ठरवताना ?? मग आयुष्यभर वाट्याला येते ती तडजोड आणि घुसमट … मैच्युरिटि च्या नावाखाली स्वप्न गाडून टाकणं …
पत्रिकांचे गुण जुळावे या पेक्षा हे न पत्रिकेत न दीसणारे गुण जुळावेत या साठी धडपड करणाऱ्या पंडितांची खरी गरज आहे आता …
ता. क. :- सदरचा लेख लिहिण्यास सुरुवात करून बरेच दिवस झाले …. मला आणि मित्रांना आलेले अनुभव त्यात लिहित गेल्याने ब्लॉग पूर्ण होण्यास उशीर लागला … दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत (वधूपिता क्षमस्व)…
वरिल लेख हा माझ्याच ब्लोग वरुन घेतल असुन चौर्य कर्म नाहि....
वाचने
34018
प्रतिक्रिया
107
मिसळपाव
प्रतिक्रिया
पुढे ??
लिखाण आवडलं
जमलेत कांदेपोहे .
मज्जा आली ,
ऒ एका वाक्याला एक स्मायली
In reply to मज्जा आली , by जेनी...
पूजाबॉट की पवारबॉट =))
In reply to ऒ एका वाक्याला एक स्मायली by विद्युत् बालक
हायला...
In reply to मज्जा आली , by जेनी...
उत्तम अन एकदम ब्यालन्स्ड लेख.
दरम्यान माझे दोनाचे चार हात झाले आहेत
छान लिहिलंय
एकातच संपलं?
ह्म्म्म !!
धन्यवाद
छान लिहिलंय!
भरुन वगैरे आल हो चिन्मय!
बास का ओ, दिसण्यावरून तर
In reply to भरुन वगैरे आल हो चिन्मय! by स्पंदना
"बास का ओ, दिसण्यावरून तर
In reply to बास का ओ, दिसण्यावरून तर by बॅटमॅन
हम्म्म! बदल करायला हवा.
In reply to "बास का ओ, दिसण्यावरून तर by टवाळ कार्टा
तरीही नुसत्या दिसण्यावरुन
In reply to हम्म्म! बदल करायला हवा. by स्पंदना
उची जास्त आहे?
In reply to तरीही नुसत्या दिसण्यावरुन by सुहास..
Stuart: Are you crazy? That
In reply to भरुन वगैरे आल हो चिन्मय! by स्पंदना
:)
एका लग्नाची ४थी गोष्ट..
सुपर्ब! पुढे?
@कारण आधी बघितलेला फोटो आणि
कटु अनुभव
@. (हे मागणारी स्वतः एक
In reply to कटु अनुभव by वेल्लाभट
हे मागणारी स्वतः एक `पार्सल'
In reply to कटु अनुभव by वेल्लाभट
लेख फार आवडला
या निमित्तानी गेल्या सहा
असो...!
सहजिवनासाठी हवे असलेले- "अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो... तो विवाहच काय? खराखुरा शरीर-संग'ही नव्हे... या मतावर (वाढत्या घटस्फोटांचे प्रमाण पहाता) आंम्ही ठाम आहोत! :)अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो...
In reply to या निमित्तानी गेल्या सहा by अत्रुप्त आत्मा
बघा कशी गंमत आहे. आंम्ही
In reply to अनुरूपता आणी प्रीती" हे प्रथम पहायचे दोन घटक सोडून जो होतो... by संजय क्षीरसागर
>>>आंम्ही सांगतो,ते कसं चटकन
In reply to बघा कशी गंमत आहे. आंम्ही by अत्रुप्त आत्मा
@सर नि गुर्जी मधला फरक. >>>
In reply to >>>आंम्ही सांगतो,ते कसं चटकन by प्यारे१
अगदि सहमत गुर्जि
In reply to या निमित्तानी गेल्या सहा by अत्रुप्त आत्मा
+११११
In reply to अगदि सहमत गुर्जि by जेनी...
वा वा छान छान
In reply to या निमित्तानी गेल्या सहा by अत्रुप्त आत्मा
हा प्रश्न-भटजी...फोटोग्राफर.
In reply to या निमित्तानी गेल्या सहा by अत्रुप्त आत्मा
छान लेख
तुमचं नशीब चांगलं
In reply to छान लेख by तुमचा अभिषेक
पुरुषाला जस्टिफाय करत नाही पण
In reply to तुमचं नशीब चांगलं by पैसा
मुलीचं वय काय!!
In reply to पुरुषाला जस्टिफाय करत नाही पण by संजय क्षीरसागर
फसणारे खरे तर कुठेही फसतात,
In reply to तुमचं नशीब चांगलं by पैसा
सोशल साईट मुळे घडलेला एक शॉट
In reply to फसणारे खरे तर कुठेही फसतात, by तुमचा अभिषेक
काही झेपले नाही. मुलीबद्दल
In reply to सोशल साईट मुळे घडलेला एक शॉट by मालोजीराव
पुरुष विभाग काढावा हि
In reply to काही झेपले नाही. मुलीबद्दल by विश्वनाथ मेहेंदळे
तो मान्य होत नाही तो पर्यंत
In reply to पुरुष विभाग काढावा हि by मालोजीराव
स्वभाव की सवय....
In reply to छान लेख by तुमचा अभिषेक
मला एक भेटली होती स्त्री
एकदम ताई? हा!हा!हा!
In reply to मला एक भेटली होती स्त्री by एम.जी.
होतकरू तरुणांना फुकटचा पण
बर
In reply to होतकरू तरुणांना फुकटचा पण by एम.जी.
तु "होतकरू तरुण"????
In reply to बर by जेनी...
आगागागागा........
In reply to तु "होतकरू तरुण"???? by टवाळ कार्टा
=))
In reply to तु "होतकरू तरुण"???? by टवाळ कार्टा
हे च विचारणार होते
In reply to तु "होतकरू तरुण"???? by टवाळ कार्टा
>>तु "होतकरू तरुण"????
In reply to तु "होतकरू तरुण"???? by टवाळ कार्टा
च्याय्ला आत्ता कळलं पोरी
In reply to तु "होतकरू तरुण"???? by टवाळ कार्टा
का बुवा?? आम्हाला पण सांगा...
In reply to च्याय्ला आत्ता कळलं पोरी by जेनी...
हाहाहा...द्राक्शे आंबट आहेत
In reply to च्याय्ला आत्ता कळलं पोरी by जेनी...
मान गये उस्ताद!!
Do you remember 'THAT'
चिन्मय --
धन्यवाद
मस्त लेख....
वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात
आणि बर्याच मुलीही स्वतः
In reply to वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात by म्हैस
ते चार चाकी आणि अमेरिकावारी
In reply to आणि बर्याच मुलीही स्वतः by बॅटमॅन
येस! हे विसरलोच होतो. चारचाकी
In reply to ते चार चाकी आणि अमेरिकावारी by अनुप ढेरे
हायला
In reply to आणि बर्याच मुलीही स्वतः by बॅटमॅन
@ काही लोक तर इतके
In reply to वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात by म्हैस
मला असं सांगा अपेक्षा
In reply to वधू पाहिजे ची कुठलीही जाहिरात by म्हैस
हॅ हॅ हॅ
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
अरारा
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
ह ह पु वा!
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
मस्त प्रतिसाद !!
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
+1
In reply to मस्त प्रतिसाद !! by सूड
मग तासाभराने जेव्हा मुला
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
एकदम परफेक्ट लिहिले आहे.
In reply to मला असं सांगा अपेक्षा by मृत्युन्जय
आमच्या ओळखीतले एक उदाहरण.
माझ्याही ऐकिवातलं उदाहरण
In reply to आमच्या ओळखीतले एक उदाहरण. by परिंदा
मस्त फोडणी बसली आहे कांदे
एक द्रावक अनुभव.....
येस, हे एका मित्राकडून ऐकले
In reply to एक द्रावक अनुभव..... by ज्ञानव
डस्टबिन्सचा हा किस्सा इतक्या
In reply to येस, हे एका मित्राकडून ऐकले by बॅटमॅन
अॅटीट्यूड... बाबा... अॅटीट्यूड....
In reply to डस्टबिन्सचा हा किस्सा इतक्या by गवि
व्यक्तिगत भेटीत शक्य आहे,
In reply to अॅटीट्यूड... बाबा... अॅटीट्यूड.... by प्रभाकर पेठकर
सहमत.
In reply to व्यक्तिगत भेटीत शक्य आहे, by गवि
मला ही डस्टबीन कथा
In reply to व्यक्तिगत भेटीत शक्य आहे, by गवि
मुक्तपीठ ना...
In reply to मला ही डस्टबीन कथा by बाळ सप्रे