केला इशारा जाता जाता
... मि. वॉटसनकडे पहात शेरलॉक होम्सने डाव्या हाताच्या पकडीतील पाईपमधून लांबलचक झुरका घेतला. धुराचा भपका सोडत बारीक नजरेतून...
... बिंदू, अरुणा इराणी वा तत्सम हलकट जवानीची हूल दाखवणाऱ्या बिल्लो राण्यांच्या महिला मंडळाकडून केलेल्या इशाऱ्याची वाट पाहत असलेल्या मर्दांच्या एका हातात लाल पाण्याचा गिलास तर दुसर्या हाताच्या मुठीत कडक सिग्रेटची कांडी. ओठांचा चंबू करून धुराच्या गोल गोल रिंगा काढून आपापला धाक जमवणाऱ्या कधी अट्टल पटाईतांकडे, तर कधी शेरलॉक होमला आदरपूर्वक पहात असताना आरोग्यास हानिकारक संवैधानिक उदघोषणा 'पचका' करून जातात.
पडद्यावर दिसणाऱ्यांना त्यांचे काही देणेघेणे नसते. पहाणाऱ्यांना तर त्याहून नसते. अशा इशाऱ्यास दाखवणाऱ्यांना रस नसतो पण 'संवैधानिक' नामक दटावणीमुळे त्यांनी दाखवायचे प्रेक्षकांनी निमुटपणे दुर्लक्ष करून वेळ मारून नेणे क्रमप्राप्त होते.
'फोटो लेना मना है' असे इशारे पर्यटनात विरस निर्माण करतात. सुंदर कलाकृती, भव्य भावनांचा, रम्य मनोहर देखाव्याची मजा फावल्या वेळी आपणास व अन्य रसिकांना दाखवणाऱ्यांना मनाई करण्यात या पाट्या लावणाऱ्यांना काय आनंद मिळतो कोणाला ठाऊक! राष्ट्रीय संपत्तीचा व ठेव्यांच्या रक्षणासाठी हे असे करावे लागते असे म्हणतात. पण सध्याच्या एरियल व अन्य आधुनिक साधनांनी हव्या त्या टारगेटचा शोध व वेध घेता येतो म्हणून या दाव्याचा फोलपणा पाट्या लावणाऱ्यांना ही मान्य असतो. रखवालदारांच्या हडेलहप्पीतून चतुरपणे सुटून फोटो काढले जातात. मोबाईल मधून फोटो व व्हिडीओ फिल्म बनवलेली जाते. मग या मनाईला काय अर्थ अभिप्रेत आहे?
कान बंद करता येत नाही म्हणून, तोंड आहे म्हणून बोलणाऱ्यांचे निमूट ऐकावे लागते कधी कधी.... काय करायचं...
असे आणखी काही इशारे सदस्यांनी सुचवावेत. संवैधानिक आहे म्हणून या अशा चेतावण्या जाता येता बोकांडी बसतात? यावर विचार वाचायला आवडेल.
| लेखनविषय: | |
|---|---|
| लेखनप्रकार |
वाचने
6928
प्रतिक्रिया
13
मिसळपाव
प्रतिक्रिया
शरलोक होलमस कोकेन घ्यायचा.
२१व्या शतकाचा प्रभाव..
हां हा हया!
In reply to २१व्या शतकाचा प्रभाव.. by शशिकांत ओक
ओहो .. धन्यवाद अग्निकोल्हा धागा दर्शवल्या बद्दल...
एकांगी विचार
+ १००
In reply to एकांगी विचार by सुबोध खरे
लाईट रीडिंग साठी चा धागा...
In reply to एकांगी विचार by सुबोध खरे
आपल्याला राष्ट्रीय चरित्र नाही.
राष्ट्रीय चारित्र्य
मंदिरांमधील छायाचित्रण प्रतिबंधाच्या इतिहासाचे अधिकृतसंदर्भ हवेत
प्रतिबंधांच्या इतिहासाची
In reply to मंदिरांमधील छायाचित्रण प्रतिबंधाच्या इतिहासाचे अधिकृतसंदर्भ हवेत by माहितगार
पुण्यात राहून ‘पाट्यां’शी वैर
पुणे :पाटी : खाष्ट मजकूर :?