"आजच्या" गणेश मंडळाची सभा....
(स्थळ - हर्क्युलस सार्वजनिक गणेश मंडळाचे कार्यालय)
"अरे रघ्या.....ए रघ्या.. समोश्याचा अजून एक राउंड होऊन जाऊ दे..."
"सब खतम हो गया साब..."
"खतम? जा त्या मारवाड्याला सांग... सेक्रेटरी साहेबांनी १५-२० प्लेट मागवलेत अजून. मंडळाची महत्वाची मिटिंग सुरु आहे."
(रघ्या समोसे आणायला पळतो)
"चला तोवर आपण सभेला सुरुवात करूया. अरे तो एसी कोणी तरी वाढवा रे...किती उकडतंय इथे.."
(एसीची घरघर वाढते आणि मंडळाच्या सभेला सुरुवात होते)
"तर मंडळी सालाबादप्रमाणे यंदाही आपण आपल्या मंडळाच्या सार्वजनिक गणेश उत्सवाच्या निम्मित ही सभा आयोजित केलेली आहे.
विशेष
मिसळपाव