काळसारं (लघूकथा)
तिने आपले हात धुतले न्हाणीमध्ये, चुलीवर आमटी गरम करायला ठेऊन, बाजूला ठेवलेली भाकरी ताटात घेतली, जरा वेळाने गरम आमटी वाटीत ओतली आणि भाकरीचा एक तुकडा मोडून त्यात बुडवला. बाजूची चिमणी रॉकेल संपल्यामुळे मंद मंद होत वीजू लागली होती, एकदाची ती विजली, तिने खस करून चुलीतले जळते लाकूड बाहेर काढले, झोपडी अगदी लाल रंगात उजळुन गेली.. तिने आपले हात ताटात धुतले व धडपडत बाहेर आली. बाहेर गच्च अंधार पसरला होता, दूरवर कोठेतरी एखादा फड जळत होता! तिने आपले त्याच्याकडे पाहिले न पाहिले आणि तोंडातल्या तोंडात पुटपुटली.. "शेण पडो, त्याच्या तोंडात!" आपली वळकट सरळ करून ती झोपी गेली.
"अंग, रुक्मीअक्का..
मिसळपाव
कातरवेळ झाली अन सकाळपासून तिच्या मनी दाटलेल्या हुरहुरीने आणखीनच उग्र रूप धारण केले. आज दिवसभर त्याचे दर्शन नाही. नित्यकर्मे करताना मनाची तहान वाढतच गेली. अन आता संध्याकाळी त्या व्याकुळतेने पुरते पिसे लावले.
अंधार दाटला, तसे राधेला काही सुचेना. शामसुंदर, श्रीहरी, कृष्ण काळा, कान्हा, मुरारी, मुकुंद, गोविंद, माधव, मिलिंद सगळी नावे आलटून पालटून घेऊन झाली. त्याची लोभस रूपे मन:चक्षुंनी हजार वेळा न्याहाळली.