(स्वामी चेकाळदर्शी उवाच: सनातनीनाम् किम् लक्षणं?)
चेकाळदर्शी बाबा ध्यानमग्न बसलेले होते, बहुधा आज संध्याकाळी पाय चुरायला येणार्या फिल्मतारकेबद्दल काही चिंतन करीत असावेत. अचानक त्यांनी डोळे उघडले, क्षणाचा ही बिलंब न करता मी प्रश्न विचारला, स्वामीजी मनात एक शंका आहे. स्वामी चेकाळदर्शी: काय शंका आहे बच्चा? मी: स्वामीजी सनातनी कोण असतो, त्याची लक्षणे काय? स्वामी चेकाळदर्शींच्या चेहऱ्या एक हास्याची लहर पसरली, ते म्हणाले बच्चा, समोर वडाचे झाड बघ, झाडाच्या वरच्या टोकाला एक वाळकी फांदी दिसते आहे न. मी म्हणालो होय, स्वामीजी. स्वामी चेकाळदर्शी: त्या फांदीखाली बघ, त्याखालच्या फांद्याना सनातनी असे म्हणतात.
मिसळपाव