राजगड
टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :)
तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली.
पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला..
मिसळपाव