Skip to main content

राजगड

लेखक स्पा यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
टीप : राजगड बद्दल इत्यंभूत माहिती किसन ने ह्या धाग्यात दिल्याने परत खोलात मी लिहित नाही :) तर ट्रेक ला जायचं कुठे ह्यावरून बरीच चर्चा केल्यानंतर 'राजगड' करायचा असे किसन देवांनी जाहीर केले. बरेच मेंबर गळत गळत शेवटी मी , किसन, सुड, अल्प्या आणि सिड.. एवढे उरलो.इंद्रायणी वेळेवर शिवाजीनगर पोचली.तडक रिक्षा पकडुन आमची वरात सुडच्या घरी पोहोचली. पण काहीतरी बिनसलं घराच्या खालीच अचानक हवा शिळी झाली. हुडहुडी भरायला लागली.अंधारुन आलं..दमटपणा वाढला, एकप्रकारचा गायछाप तंबाखूचा वास जाणवायला लागला, मागुन एक घोगरा आवाज आला..

आमरिकेतल्या सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report बद्दल माहिती हवी

लेखक माहितगार यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सध्या शालेय निबंध लेखन कसे करावे ? या धाग्याच्या माध्यमातून खूपच छान माहिती मिळते आहे. आमरिकेत सॅट एसे (SAT essay) आणि पुस्तक वृत्तांकन Book report असे काही प्रकार आहेत असे कळले. त्या शिवाय इतरही शालेय लेखन कौशल्याचे प्रकार असल्यास त्या बद्दल आधीक माहिती हवी आहे. * या धाग्यावरील आपले प्रतिसाद मराठी विकिप्रक्ल्पातून वापरले जाऊ शकतात त्यामुळे ते प्रताधिकारमुक्त गृहीत धरले जातील. * प्रतिसादांसाठी अवांतर टाळण्यासाठी धन्यवाद

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १४

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
बर्फाच्या कडेने जात एका लहानशा खाडीत ग्जो ने प्रवेश केला. या खाडीच्या पलीकडे पश्चिमेच्या दिशेने जाणारा दुसरा जलमार्ग असल्याचं हॅन्सनला आढळलं होतं. परंतु तिथे पोहोचण्यापूर्वीच बर्फाने वाट अडवली होती. अनेक लहान-लहान खाड्या हिमखंडाच्या आतपर्यंत शिरलेल्या आढळत होत्या. यापैकी एक खाडी हर्शेल बेटापासून पंधरा मैलांपर्यंत आत शिरली होती. ही खाडी आणि पश्चिमेचा जलमार्ग यात बर्फाचा लहानसा पट्टा होता, पण दुर्दैवाने हा बर्फ अद्यापही घट्ट होता. २४ जुलैच्या रात्री ११ वाजता ग्जो ने बर्फापुढे माघार घेतली आणि हर्शेल बेटाचा मार्ग धरला!

आल्प्सच्या वळणांवर - भाग १ - नियोजन, पूर्वतयारी आणि प्रयाण

लेखक मधुरा देशपांडे यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
जर्मनीत आल्यापासून जवळपास सगळे मित्र मैत्रिणी, नातेवाईक आणि अजून कुणी ओळखीचे यांच्याकडून एक ठरलेला प्रश्न असायचा, "स्वित्झर्लंडला जाउन आलात का?" "नाही गेलो अजून" असे म्हटल्यावर पुढचा प्रश्न, "का नाही गेलात अजून" किंवा "कधी जाणार मग" किंवा "किती वेळ लागतो तुमच्या इथून" इत्यादी इत्यादी. "झुरीच ट्रेनने तीन साडेतीन तास, सगळं तसं पाच सहा तासांच्या आत" हे उत्तर ऐकल्यावर तर समोरच्याचे हावभाव जणू काही आम्ही 'स्विसला गेलो नाही म्हणजे घोर पाप केले' असे असायचे. मग इकडे जा, तिकडे जा असे कधी प्रेमळ सल्ले तर कधी खवचट उपदेश मिळायचे आणि आम्ही माना डोलवायचो. स्वित्झर्लंड सुंदर आहे यात वाद नाहीच.

स्वयंभू (संपूर्ण कथा)

लेखक बोबो यांनी बुधवार, 08/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

उकिरडा

लेखक तुमचा अभिषेक यांनी मंगळवार, 07/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये, रबरी चेंडू - ८ रुपये, टेनिस चेंडू - २० रुपये ..... एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

लेखक _मनश्री_ यांनी मंगळवार, 07/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

लेखक स्पार्टाकस यांनी मंगळवार, 07/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली.

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

लेखक बहुगुणी यांनी मंगळवार, 07/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप.

चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

लेखक पगला गजोधर यांनी सोमवार, 06/10/2014 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.