Skip to main content

स्वयंभू (संपूर्ण कथा)

लेखक बोबो
Published on बुधवार, 08/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
स्वयंभू (संपूर्ण कथा) ------------------------------------------------------------------------------------ "माधवा, किती वेळ झोपून राहणार? चल उठ पाहू",विठाबाई- माधवाची आई त्याला उठवत म्हणाली. "आई झोपू दे ना. कशाला झोपमोड करतेस", माधव कंटाळून बोलला. "अरे बाळा, देवाची पालखी यायची वेळ झाली आहे. तुझे बाबा पहाटेच उठून भक्तांच्या स्वागताची तयारी करताहेत. जा जरा तूसुद्धा जाऊन दर्शन घेऊन ये. तेवढंच पुण्य पदरात पडेल. " "अगं आई, कमाल आहे तुझ्या आणि बाबांच्या देवभोळेपणाची. तुम्ही आणि तुमचा देव. गेले वर्षभर मी नोकरी शोधतोय पण तुमचा देव वर्षभरात मला साधी एक नोकरी मिळवून देऊ शकला नाही.

उकिरडा

Published on मंगळवार, 07/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
प्लास्टीक चेंडू - ३.५० रुपये, रबरी चेंडू - ८ रुपये, टेनिस चेंडू - २० रुपये ..... एक अद्रुष्य बोर्ड, माझ्या डोळ्यासमोर वाकुल्या दाखवत तरळत होता. खिशात चाचपून पाहिले एक फुटी कौडी नव्हती. कंपासपेटीत नाही म्हणायला दोन-अडीज रुपयांची चिल्लर असावी. ती ज्या कामासाठी राखून ठेवली होती ते तर आता राहिलेच, त्यात वरतून दिड-दोन रुपये टाकून कसेबसे साडेतीन बनवले तरी प्लास्टीक चेंडूसाठी पोरे ऐकणार नव्हती. टेनिसचा चेंडू फोडला होता, तर किमान रबराचा तरी भरून द्यावा लागणार होता. तसेही आधीच मला कोणी खेळायला घ्यायचे नाही. टेनिसचा चेंडू म्हटले तर नाहीच नाही.

गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी

लेखक _मनश्री_
Published on मंगळवार, 07/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
लग्न ठरवताना काय आवश्यक असतं , व्यक्ती मधले गुण की कौटुंबिक पार्श्वभूमी माझी एक मैत्रीण आहे ,ती लहान असताना तिच्या आई वडिलांचा घटस्फोट झाला आणि नंतर दोघांचाही पुनर्विवाह झाला . ते आता त्यांच्या प्रपंचात सुखी आहेत . पण माझ्या मैत्रिणीचे लग्न ठरताना मात्र अडचणी येतात ,कारण ती घटस्फोटीत आई वडिलांची मुलगी आहे . आणि तिचे वडील मराठा होते आणि आई ब्राम्हण ,आणि ती आईबरोबर राहिली त्यामुळे ब्राम्हणी संस्कारात वाढली पण जेव्हा ब्राम्हण स्थळे पहिली जातात तेव्हा तिच्या वडिलांच मराठा असण आडव येत , आणि जेव्हा मराठा स्थळ पहिली जातात तेव्हा तिची आई ब्राम्हण आहे आणि ती लहानपणापासून ब्राम्हण कुटुंबात वाढली

आर्क्टीक बाय नॉर्थवेस्ट - १३

Published on मंगळवार, 07/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
३ फेब्रुवारी १९०६ ला अ‍ॅमंडसेनने ईगल सिटीतून पुन्हा उत्तरेचा मार्ग धरला. नॉर्वेतून आणि अमेरीकेच्या इतर भागातून सर्वांच्या नावाने आलेली पत्रं आणि विविध वृत्तपत्रं त्याच्यापाशी होती! फोर्ट युकून इथे पोहोचल्यावर जॅक कारने त्याला तीन दिवस आपल्या घरी ठेवून घेतलं. फोर्ट युकूनलाच अ‍ॅमंडसेनची जिमी आणि कापा यांच्याशी पुन्हा गाठ पडली. पोर्क्युपाईन नदीवरील वसाहतीत इंग्लिश व्यापारी डॅनीयल कॅडझॉव्ह याच्याशी अ‍ॅमंडसेनची गाठ पडली.

जिओ मिपा! ....अर्थात्, जियो मिपा!

लेखक बहुगुणी
Published on मंगळवार, 07/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार मंडळी! बरेच दिवस मिपाला (म्हणजे मिपाकरांना, त्यांच्या विविध कट्ट्यांना, त्यांच्या भटकंतीला) जागतिक दृश्य स्वरुपात कसं एकत्र आणता येईल याचा विचार करीत असता या सर्वांना real-time, geosynchronous अशा रुपात नकाशावर मांडावं, असा विचार डोक्यात आला. त्याचं जिओ मिपा हे पहिलं दृश्य स्वरूप.

चोळीच्या हक्कासाठीचा लढा (मारू मरक्कल समरम)

Published on सोमवार, 06/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
आत्ता तुम्हाला अतिशय विचित्र वाटेल, पण सुमारे १५० वर्षांपूर्वी, त्रावणकोर संस्थानातील (सध्याचे केरळ) नाडर समाजातील महिलांना चोळी-वापरण्याच्या हक्कासाठी सुद्धा, ५० वर्ष संघर्ष करावा लागला. ऐका अतिशय कुरूप धार्मिक प्रथे प्रमाणे तिथे त्यावेळी दलित महिलांना, शरीराचा वरील भाग झाकण्यासाठी, चोळी वा कुठलेही वस्त्र वापरायची कुठेही अजिबात परवानगी नव्हती, आणि काही नोंदीनुसार, असेही झाले आहे कि, कोणी अशी कृती केलीच, तर शिक्षेपोटी तिचे वक्ष तलवारीने कापण्यात आले.

इमानदार माणूस आणि त्याचा झाडू

Published on सोमवार, 06/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
काल झाडू विकत आणायला गेलो. भाव विचारला. दुकानदाराने चक्क ५० रुपये मागितले. एका टुकार झाडू साठी ५० रुपये. दुकानदाराला जाब विचारला. तो म्हणाला आजकाल झाडू के अच्छे दिन आएं हैं, डिमांड बढ़ गई है. डिज़ाइनर झाडू चाहिये तो १०० रुपये में मिलेगा. फोटू खिंचाने के काम आएगा. मी तर चाटच झालो. आता काय म्हणणार ५० रुपये मोजून झाडू आणला. खरंच, गेल्या वर्षी एका इमानदार माणसाने हातात झाडू घेतला होता. तो सर्वांना म्हणाला त्याच्या हातातला झाडू चमत्कारी आहे, या झाडूने तो सर्व भ्रष्टाचार स्वच्छ करणार.

अंधार-क्षण - उपोद्घात (लेख १)

Published on सोमवार, 06/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
अंधारक्षण - उपोद्घात नाझींनी निःशस्त्र बायका आणि लहान मुलांवर गोळ्या कशा झाडल्या असतील? जपानी सैनिकांनी एवढ्या भयावह प्रमाणावर बलात्कार आणि हत्या कशा केल्या? नाझी मृत्युछावणीत लोक नक्की कशाच्या आधारावर जिवंत राहिले असतील? जवळजवळ २० वर्षे मी ह्या आणि अशाच काही प्रश्नांची उत्तरं शोधण्याचा प्रयत्न करतो आहे. त्याचसाठी मी दुस-या महायुद्धात या ना त्या प्रकारे  सहभागी असलेल्या शंभराहून अधिक लोकांना भेटलो. मला अत्याचार करणा-या लोकांना भेटण्यात आणि त्यांचं तर्कशास्त्र जाणून घेण्यात जास्त रस होता.

सोराक

Published on सोमवार, 06/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
सोराक हि गोवन लोकांची एक पारंपारीक, साधी, सोपी ओला नारळ घालून केलेली एक लाल ग्रेव्हि आहे जी खासकरुन पावसाळ्यात करतात. कोसळणार्‍या पावसात जेव्हा ताजी मासळी मिळणं दुरापास्त असतं तेव्हा अश्या वेळी सुखी मासळी आणि जोडिला हे कालवण करतात. व्हेजवाले ह्यात त्यांच्या आवडिच्या भाज्या (उदा.

सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं जग

Published on सोमवार, 06/10/2014 प्रकाशित मुखपृष्ठ
नमस्कार, सह्याद्रीत भटकताना काढलेल्या फोटोंपैकी काही निवडक फोटो शेअर करत आहे. सह्याद्री आणि त्याच्या कुशीतलं लोकजीवन हे नेहमीच काहीतरी दाखवून, शिकवून जाणारं असतं. आनंद देणारं, शांतता देणारं असतं. फोटोंमधून ते टिपण्याचा केलेला एक प्रयत्न. प्रतिक्रीयांचं, प्रतिसादांचं स्वागत.