Skip to main content

नाईन इलेव्हन - Twin To-Worse: प्रस्तावना

लेखक टर्मीनेटर यांनी गुरुवार, 17/08/2023 12:36 या दिवशी प्रकाशित केले.

मंगळवार दिनांक ११ सप्टेंबर २००१, संध्याकाळी सात-सव्वा सातची वेळ.

रोजच्या प्रमाणे त्या संध्याकाळीही चकाट्या पिटण्यासाठीचा आमचा अड्डा असलेल्या एका मित्राच्या सायबर कॅफेवर आम्ही काही मित्रमंडळी हजर होतो. आतमध्ये अमेरिकेतील आपल्या नातेवाईकाशी याहू मेसेंजरवर चॅट करत बसलेला एक नेहमीचा ग्राहक लगबगीने बाहेर आला आणि त्याने अमेरिकेतील 'वर्ल्ड ट्रेड सेंटरवर' विमान धडकल्याची त्याला नुकतीच समजलेली बातमी आम्हाला सांगितली.

वार्तालाप: दुराशेच्या धार्मिक पोथी

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 17/08/2023 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
श्रवणी लोभ उपजेल तेथे विवेक केंचा असेल तेथे. बैसली दुराशेची भुते तया अधोगती. समर्थ म्हणतात जो व्यक्ती सांसारिक उद्देश्यांच्या पूर्तीसाठी उदाहरण धन-संपत्ती, सुख- समाधान, सत्ता, ऐश्वर्य इत्यादी प्राप्तिसाठी पोथ्या वाचतो, कथा श्रवण करतो, कथेतील देवतेला प्रसन्न करण्यासाठी अन्न जल ग्रहण न करता पोथीत दिलेल्या विधिनुसार उपवास इत्यादी करतो, त्याच्या नशिबात फक्त दुराशा येणार. कधी कधी जे आहे ते ही हातातून जाते. उदा. हजार मोदकांची आहुती दिली तर इच्छित फलप्राप्ती होईल. तो आहुती देतो, पण फळ मिळत नाही. कारण, उद्यमेन हि सिध्यन्ति कार्याणि न मनोरथैः.

जीवनातील "Q/क्यू"

लेखक भालचंद्र लिमये यांनी गुरुवार, 17/08/2023 10:30 या दिवशी प्रकाशित केले.
जन्माला येण्यापासून मरेपर्यंत आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावरचा 'क्यू' काही संपत नाही. एकांच्या अंत्यविधीसाठी गेलो होतो. ओळीत ठेवलेले अनेकांचे मृतदेह पाहून 'क्यू' ची कल्पना सुचली. जन्म होण्यासाठी कारणीभूत असलेली गुणसूत्रे मोठ्या प्रमाणात एकमेकांशी स्पर्धा करत मिलनासाठी येतात. योग्य मिलन झाल्यावरच जन्म होतो. इथपासून आयुष्यातल्या प्रत्येक टप्प्यावर 'क्यू' काही सुटलेला नाही.

पावसाचं वय....

लेखक कर्नलतपस्वी यांनी बुधवार, 16/08/2023 20:38 या दिवशी प्रकाशित केले.

मऊ मऊ दुपटं,ऊबदार कुशीत 

तोंडात अंगठा,गाल लुसलुशीत 

तड तड ताशा,मोत्याच्या माळा 

सांगतो का रे पावसा वय माझ्या बाळा? 

 

भिरभीर डोळे, संतत धार 

रस्त्यातले डबके,आईचा मार 

भिजलेलं डोकं,कागदी होड्या

 सांग ना रे पावसा वय तुझं गड्या? 

 

मनात चुळबुळ,बाहेर भुरभुर 

मातीला गंध,हिरवळ दूरदूर 

छत्रीतलं भिजणं,भेटीची सय 

सांग ना रे पावसा काय तुझं वय? 

 

उरात उर्मी,अंगात गर्मी 

सह्याद्रीची साथ,मित्रांचा हाथ

काव्यरस

झटपट कप केक्स

लेखक नागनिका यांनी बुधवार, 16/08/2023 20:09 या दिवशी प्रकाशित केले.
साहित्य - २ पाकिटे bourbon biscuits, चिमूटभर खाण्याचा सोडा, २ कप दुध, कॅडबरी चोकलेट किंवा डार्क चोकलेट . कृती - सर्व बिस्किटे मिक्सरमधून ग्राईंड करून घ्या. बिस्किटांचा भुगा एका बाऊल मध्ये घेऊन त्यात अंदाजे दुध मिसळत राहा. आप्प्यांप्रमाणे सरबरीत मिश्रण करा. मिश्रण २ मिनिटे चांगले फेटून घ्या. खाण्याचा सोडा घालून हलक्या हाताने पुन्हा एकदा मिश्रण हलवा. आप्पे पात्राला तुपाने ग्रीस करुन मिश्रण अर्ध्यापर्यंत भरा. कॅडबरी चोकलेटचा किंवा डार्क चोकलेटचा एक चौकोनी तुकडा ठेऊन पुन्हा थोडे मिश्रण ओतून आप्पे पात्र व्यवस्थित भरून घ्या.मंद आचेवर ३ ते ४ मिनिटे बेक करा.

श्री गणेश लेखमाला २०२३

लेखक साहित्य संपादक यांनी बुधवार, 16/08/2023 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
१९ सप्टेंबर २०२३. भाद्रपद शुद्ध चतुर्थी, शके १९४५. अर्थात गणेश चतुर्थी. आणि मिपाचा वर्धापनदिनदेखील! 2 दरवर्षी आपण गणेशोत्सवामध्ये अकरा दिवस श्रीगणेश लेखमालेचे आयोजन करतो. यंदाही आपण श्रीगणेश लेखमाला आयोजित केलेली आहे.

काय आहे 'अज्ञात पानिपत'

लेखक कंजूस यांनी बुधवार, 16/08/2023 11:54 या दिवशी प्रकाशित केले.
काय आहे 'अज्ञात पानिपत' गाभा :- अज्ञात पानिपत पुस्तकाच्या निमित्ताने ऐतिहासिक पुस्तकांचे वाचन. 'अज्ञात पानिपत' ( मराठी: इतिहास -संशोधन ) लेखक - मनोज दाणी पाने ८३०. (किंमत १३००रु, ) प्रकाशन Merven Technologies.,११ जून २०२३ . पुणे भांडारकर प्राच्यविद्या संशोधन मंदिर संस्था इथून. उपलब्ध : सह्याद्री बुक्स ISBN 978-81956210-4-0 सर्वप्रथम हे सांगू इच्छितो की ही ऐतिहासिक कादंबरी नाही. म्हणजे ऐतिहासिक नोंदींवरून वीरश्रीपूर्ण आणि भावनिक कथन असलेले पुस्तक नाही.

शपथ

लेखक मी-दिपाली यांनी मंगळवार, 15/08/2023 18:43 या दिवशी प्रकाशित केले.
धर्म, पंथ, वंश, जात भेदभाव मालवू एक सूर, एक ताल, एक राग आळवू ॥ ध्रु ॥ सावळे कुणी जरी, कुणास रूप गोरटे रक्त आमुच्या नसानसांत लाल वाहते कुंचले जरी विभिन्न, एक चित्र रंगवू ॥१॥ एक सूर... द्रौपदी, तुझी इथे युगेयुगे विटंबना हात रोखणार मात्र यापुढे, नराधमा बद्ध या पणात नित्य पौरुषास चेतवू ॥२॥ एक सूर... स्पंदनांत ये उचंबळून आज आर्तता विश्व या कुटुंब कल्पनेस देत मूर्तता अंतरी असीम बंधुभाव खोल बिंबवू ॥३॥ एक सूर... वासना विकार मीपणा समूळ तो गळो माणसास माणसातलाच देव आकळो देहमंदिरात हाच मंत्रघोष जागवू ॥४॥ एक सूर... (वृत्त - देवराज) १५.८.२०२३

अमेरिका-६ रस्ते आणि गाड्या

लेखक निमी यांनी मंगळवार, 15/08/2023 15:36 या दिवशी प्रकाशित केले.
*रस्ते आणि गाड्या* दूरदर्शन मुंबईनंतर अन्य महाराष्ट्रात सुरू झालं तेव्हा बातम्या ऐकण्यासोबत बातम्या देणारे-देणाऱ्या दिसू लागल्या. त्याच काळात बातम्यांना हिंदीत समाचार आणि इंग्लिश मध्ये न्यूज म्हणतात हे कळलं. काही दिवसांनी माझ्या बाबांनी विचारलं,' NEWS शब्द कसा तयार झाला माहितीये का?' माझ्या चेहऱ्यावरचे सपशेल शरणागतीचे भाव समजून म्हणाले, 'चारही दिशांची आद्याक्षरे घेऊन म्हणजे North चे N, East चे E, West चे W, South चे S घेऊन NEWS शब्द तयार झालाय. दहावीपर्यंत भूगोलात 'गोल' मिळाला नसला तरी भारतीय आणि वैश्विक भौगोलिक ज्ञान आजतागायत अगाध राखण्याची किमया मला साधली आहे.

माझी ट्रेन माझी प्रेयसी (३)

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 15/08/2023 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
भाग २ इथे .. नमस्कार सर्वांना स्वातंत्र्य वर्धापन दिनाच्या शुभेच्छा ! अजून चार दिवसांनी या धाग्याच्या मागच्या भागाला एक वर्ष पूर्ण होणार आहे. परंतु आजच्या दिनाचे औचित्य साधून हा नवा भाग चालू करत आहे. नव्या वाचकांसाठी : सन 2017 मध्ये चालू झालेले हे सदर रेल्वेविषयक कुठलीही माहिती व अनुभव लिहिण्यासाठी आहे.