मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

पीळ

अनन्त्_यात्री · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
कवितेच्या काही ओळी जरी सहज सुचल्या दोन चुकल्या मात्रेत दोन वृत्तात गंडल्या यतिभंग एकीमध्ये एकीमध्ये रसभंग दोष दूर करण्यास पछाडिले जंग जंग मात्रा, वृत्तांची बंधने पाळताना दमछाक झाली-आली कुठूनशी मुक्तछंदाची झुळूक मुक्तछंदाच्या स्पर्शाने ओळ ओळ थरारली कोष कोंदट फोडून फुलपाखरे उडाली खळखळा तुटताना बेड्या आनंदे म्हणती लघु, गुरू, मात्रा यांची मुक्तछंदी ना गणती वेध लागला मुक्तीचा बंधी कोंडल्या ओळींना सुंभ जळला-पण का पीळ जळता जळेना ? :)

वाचने 1925 वाचनखूण प्रतिक्रिया 4

चौथा कोनाडा Wed, 01/17/2024 - 18:20
व्वा ... मस्तच ! खुप छान ! मुक्तछंदावरची गेय कविता आवडली ... उत्तम कविता जुळवण्याची अवस्था ते मुक्तछंदाची झूळुक हा प्रवास चित्रदर्शी आहे ! पु.क,शु.