रॉँग नंबर --१
‘What we think is impossible happens all the time.’
५ डिसेंबर २०१६.
‘What we think is impossible happens all the time.’
मी अमुक अमुक.
वय वर्षे अठ्ठावीस. लग्न? नाही केलेले अजून. केव्हा करेन? करेन कि नाही? का? तशी कोणी भेटली नाहीये अजून. भेटावी अशी इच्छा आहे. आणि भेटली.
शिक्षण. सी ए. स्वतःचा बिझिनेस आहे. तुम्हाला “आरखेडीया” ही पंचाहत्तरी मजल्यांची बिल्डिंग माहित आहे? तीच ती सेन्ट्रल बिझिनेस डिस्ट्रिक्ट मधली. त्या बिल्डिंगच्या बाविसाव्या मजल्यावर माझे ऑफिस आहे. मी माझ्या बळावर हे उभारले आहे. मला याचा अभिमान आहे. ऑफिस स्पेस सध्या भाड्याची आहे. विकत घ्यायची तयारी करतो आहे.
मिसळपाव