Skip to main content

ऑपरेशन

लेखक समीर१२३४५६ यांनी गुरुवार, 31/12/2015 या दिवशी प्रकाशित केले.
आज रोहित हॉस्‍पीटलमधून लवकर घरी अाला, त्‍याची तब्‍येत ठिक नव्‍हती. येताक्षणीच त्‍याने आपला राग श्‍वेतावर व अश्विनवर काढायला सुरवात केली. श्‍वेता ही रोहितची दुसरी बायको होती, तर अश्विन त्‍याच्‍या पहिल्‍या बायको रंजनाचा मुलगा होता. होता.काही महिन्‍यांपूर्वी एका अपघातात रंजनाचा मृत्‍यु झाला होता, तेव्‍हापासून तोच आश्विनचा सांभाळ करत होता. आईच्‍या सांगण्‍यावरुन त्‍याने दुसरे लग्‍न केले होते,परंतू आल्‍या दिवसापासून त्‍याची दुसरी बायको श्‍वेता अश्विनचा छळ करीत होती, ती त्‍याला दिवसभर रगाडयाला लावत असायची आणि धड त्‍याला काही खायला ही देत नसे. रोहितने याबददल श्‍वेताला एकदोनदा फटकारले होते, परंतू त्‍याचा श्‍वेतावर काहीच परिणाम होत नव्‍हता, त्‍यामुळे तो निराश झाला होता. रोहितचेच कशाला त्‍याच्‍या आईच्‍या सांगण्‍याला सुध्‍दा श्‍वेता जुमानत नव्‍हती. कामाच्‍या रगाडयामुळे काही वेळा अश्विनची शाळाही बुडत असायची. दररोज काहीतरी कारण सांगून रोहितला अश्विनला शाळेत सोडायला जावे लागायचे. अश्विन सध्या दहावीत असल्‍याने त्‍याचे अभ्‍यासात लक्ष असणे जरुरीचे होते, परंतू वारंवार त्‍याचे अभ्‍यासातून लक्ष हटत चालले होते, आणि दुसरीकडे रोहितवरही या सर्वांचा ताण वाढला होता.होता.रोहित दररोज घरी उशिरा येत असायचा, घरी श्‍वेता धड स्‍वयंपाकही करत नसायची त्‍यामुळे तर तो अधिकच वैतागत असायचा. नाईलाजाने दुपारचे शिळे अन्‍न गरम करुन तो खात असायचा. अश्विनची मात्र तो खुप काळजी घेत असे, रोहितच्‍या प्रयत्‍नांमुळे त्‍याने अश्विनला काहीही कमी पडू दिले नव्‍हते. रोहित स्‍वतः एक निष्‍णात डॉक्‍टर होता, त्‍याने आपल्‍या वैदयकिय व्‍यवसायातील ब-याच समस्‍यांचा मोठया जिददीने सामना केला होता, परंतू अलिकडे तो खुपच चिडचिड करत असायचा,साध्‍या साध्‍या कारणांवरुन रागवायचा, त्‍यामुळे त्‍याचे इतर सहकारी मित्र बरेच चिंतीत झाले होते. (क्रमशः)
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 4633
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

पुढ्यील भागआचया परतीकशेत

कथा ६ भागात प्रकाशित होईल याची संबंधीत मंडळींनी नोंद घ्यावी.

In reply to by तुषार काळभोर

सु छे एटले? तमे सु कहवा मांगो छो पैल्वानभाई ?