रिमझिम पावसात बारवी धरण परिसरात!
या मंगळवारी मी काही कामानिमित्त बदलापूर ला गेलो होतो. तेव्हा रिमझिम पाऊस बरसत होता. सृष्टी हिरवेगार वस्त्र नेसून अतिशय सुंदर दिसत होती. मग काय? ठरवले बारवी धरण परिसर पाहण्याचे. त्याआधी काही मित्रांबरोबर गप्पा मारताना या मोसमात बदलापूर जवळील परिसर किती सुंदर असतो ही माहिती मिळाली.
तसेच बदलापूर हे नाव कसे पडले याची रंजक माहिती मिळाली ती अशी: शिवाजी महाराज रायगडावरून सुरत किंवा त्या दिशेला स्वारी करताना याच दिशेने येत. तेव्हा त्याचे घोडे अतिशय थकलेले असत. मग याठिकाणी घोडे बदलले जायचे आणि मग सुरत कडे प्रयाण सुरू. यावरून या ठिकाणाला बदलापूर असे नाव पडले.
मिसळपाव