Skip to main content

मोहीम - १ पॅम्प्लेट्स इन्सर्शन

लेखक अभ्या.. यांनी रविवार, 29/01/2017 08:05 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्यासाठी ५.०० एएम म्हणजे लेट नाईट असते बर्‍याचदा पण अर्ली मॉर्निंग कधीच नाही. तरीही ह्या पंचपंचऊ:षकाले अ‍ॅक्टीव्हाला किका मारुन वैतागलोय. बटनस्टार्ट तर होतच नाहीये, किक अ‍ॅणि स्टॅन्डमधला फरकही कळत नाही. स्वतःची नेहमीची बाईक देऊन मागून घेतलीय मित्राची अ‍ॅक्टीव्हा. कारणही तसेच. धंदा हो. दुसरे काय. इन्सर्शन्स टाकायचेत एक लाखभर. ......................... इन्सर्शन्स म्हणजे आपले पॅम्पलेटस हो. फ्लायरपण म्हणतात बरेच क्लायंट. ते नसतात का शन्वार रविवारच्या पेपरच्या पानात. पेपरची घडी उलगडताना सुळ्ळकन सांडतात. एकदा बघितले की पुड्या बांधायला, विमान करायला नाहीतर काचा पुसायला उपयोगी येतात ते.

इस्रायल आणि मोसाद. भाग १

लेखक आदित्य कोरडे यांनी रविवार, 29/01/2017 07:47 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire (मध्यपुर्वेतले इस्रायलचे स्थान आणि उपग्रहातून दिसणारा इस्रायल) हा संक्षिप्त इतिहास आहे जन्मापासून सतत संघर्षरत असलेल्या एका चिमुकल्या देशाचा.

पुन्हा श्रावण आला

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 29/01/2017 03:30 या दिवशी प्रकाशित केले.
चुलीत निखारा जळत राहतो. जवारीच्या ताटाचं शेंडं जळावं तसं. उलथलेला तवा हसत राहतो. तो खूप मजेदार हसतो. घराच्या सांधीवाश्यात दडलेलं दारिद्र्य तो शोधून काढतो. हा अपशकून आहे. बिऱ्हाडं येतात, जातात, जगतात, भुईला टेकतात. नव्या पायवाटांची गणितं मात्र मागे सोडतात. हे जंगल नाही. हे माजलेलं कुसळ आहे. हिरवा वारा इथेही वाहतो. वैशाखात इथं मृगजळांची भरमार असते. रौद्र भीषण उन्हाळ्यात जीव करपून जातो. कुण्या डोंगराच्या गावात गेलेला नवरदेव, नवरी घेऊन परत आला. चार दिवस नवरी नांदली आणि यानं हाकलून लावली. रत्नाबाईनं आयुष्यभर जीवाला जाच लावून घेतला. मग ती मरुन गेली बिचारी. वावटळींसारख्या वावटळी उठतात.

द मॉडेल मिलियनर -ऑस्कर वाईल्ड (भावानुवाद)

लेखक वहाटूळ यांनी शनिवार, 28/01/2017 20:21 या दिवशी प्रकाशित केले.
श्रीमंतीशिवाय सौंदर्याला किंमत नाही. प्रेम करणं हा श्रीमंतांचा प्रांत आहे, ते बेकारांचं कुरण नव्हे. गरिबाने नेहमी वास्तववादी आणि निर्मोही असावं. कमाई गलेलठ्ठ असण्याऐवजी आधी नियमित असणं आवश्यक. आधुनिक आयुष्यातली ही महान सत्ये ह्युई अर्स्किनला कधीही कळली नाहीत; बिच्चारा ह्युई! तात्विक पातळीवर विचार केला तर ह्युई हा काही फारसा महत्वाचा माणूस होता असं प्रामाणिकपणे आपल्याला म्हणता येणार नाही. तो कधीही काही ‘उच्च’ सोडा पण वाह्यात असंही काही बोलला नसावा. पण शेवटी तो एक नीट कापलेल्या तपकिरी केसांचा, अचूक शरीरसौष्ठव आणि भुरे डोळे असलेला अतिशय देखणा माणूस होता हे मात्र तितकंच खरं.

मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -2

लेखक दाह यांनी शनिवार, 28/01/2017 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
Survival Series चा दिवस उजाडला. मॉन्ट्रीयालमधल्या फॅन्समध्ये प्रचंड उत्साह होता. सर्वजण "त्या" सामन्याची वाट पाहत होते. ब्रेटच्या नावाने जयघोष करत होते. शॉनच्या नावाने "बू" करत होते. त्यातल्या काहींना ब्रेट कंपनी सोडून जात असल्याची कुणकुण लागलेली होती. असेच काही कट्टर WWF समर्थक ब्रेटला " you sold out" म्हणून खिजवत होते. सामन्याच्या सुरुवातीला शॉन मायकल्सची एंट्री झाली. नेहमीप्रमाणे त्याने कॅनडाच्या ध्वजाचा अपमान केला आणि खिल्ली उडवली. प्रेक्षक भडकले. "बूज" वाढले. आणि तितक्यात एंट्री झाली ब्रेटची.

मॉन्ट्रीयाल स्क्रू जॉब- फ्री स्टाईल रेसलिंगच्या इतिहासाला कलाटणी देणारी घटना -1

लेखक दाह यांनी शनिवार, 28/01/2017 12:25 या दिवशी प्रकाशित केले.
टीप- जे WWF अजिबात पाहात नाहीत त्यांना कदाचित या सर्वात रस न वाटण्याची शक्यता आहे WWF. वर्ल्ड रेसलिंग फेडरेशन. नव्वदच्या दशकात लहानपण-तरुणपण घालवलेल्या अनेकांना हे नाव चांगलंच परिचयाचं आहे. मुळात अमेरिकन असणाऱ्या या फ्री स्टाईल रेसलिंग कंपनीने नव्वदीत टेलिव्हिजनवर जगभरात प्रचंड धुमाकूळ घातलेला होता. भारतातही लहान मुलं आणि तरुणांच्यात हा प्रकार लोकप्रिय होता. रॉक, स्टोनकोल्ड, केन, अंडरटेकर अशी नावं सर्वांच्या तोंडावर असायची. पोरं इतकी वेडी झालेलीे की एकमेकांशीही wwf स्टाईलने कुस्तीची तालीम चालायची. तिथल्या मूव्हस मित्रांवर मारल्या जायच्या.

ब्रम्मा

लेखक पराग देशमुख यांनी शनिवार, 28/01/2017 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
निराकार, निर्विकार, अनासक्त आणि एकूणच सांगायचं झाल तर अनामिक असा मी एक नदीपात्रातील गोटा. तसा मुळात मी घाटी पण सह्याद्री, मंद्राद्री, निलगिरी नि सातपुडा वगैरे कौतुक आमच्या नशिबात अपवादानेच सापडतील. महाराष्ट्राच्या हृदयस्थानी असणाऱ्या मराठवाड्याच्या मध्यबिंदूशी माझी मुळ अजून घट्ट रुजलेली आहेत.

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया

लेखक स्पार्टाकस यांनी शनिवार, 28/01/2017 08:01 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ल्ड कप क्लासिक्स - १९७५ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध ऑस्ट्रेलिया २१ जून १९७५ लॉर्डस्, लंडन मिडलसेक्स काऊंटीचं आणि इंग्लिश क्रिकेटचं माहेरघर असलेल्या ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानात वेस्ट इंडी़ज आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वर्ल्डकपची फायनल मॅच रंगणार होती. पाकिस्तानविरुद्धच्या एकमेव मॅचचा अपवाद वगळता सेमी फायनल गाठण्यास वेस्ट इंडीजला फारसे प्रयास पडले नव्हते. सेमी फायनलमध्ये त्यांनी न्यूझीलंडला १५८ मध्ये गुंडाळत दिमाखात फायनल गाठली होती. वेस्ट इंडीजविरुद्धच्या मॅचमध्ये पराभव पत्करावा लागला असला तरी पाकिस्तान आणि श्रीलंकेविरुद्धच्या मॅचेस जिंकून ऑस्ट्रेलिया सेमी फायनलमध्ये आली होती.

म्हणून हा पाऊस मला आवडत नाही.....

लेखक पराग देशमुख यांनी शुक्रवार, 27/01/2017 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
अजून एक काव्यकथा घेऊन आलोय, अजून एक हृदयव्यथा घेऊन आलोय. वेदना जुनीच..., पावसामुळे पुन्हा फुललेली, कॉफीच्या वादळासह, पुन्हा मनात सललेली. अंगणभर पसरलेला पाऊस, कुंपणाशी गुंतलेला गारवा, उंच भिंतीच्या आडोशाला, गारठलेला पारवा | गारठलेला मी, अन् थिजलेल्या स्मृती, जुन्या जखमा पालवण्याच्या, पावसाच्या या जुन्याच रिती || म्हणून हा पाऊस मला आवडत नाही..... रेडिओवर लागलेला मल्हार, नि स्वयंपाकघरातील खमंग वास ऊबदार शालीत लपेटलेला मी, पण आठवणींच्या हुद्क्यांनी विखुरलेला श्वास | निरवलेले डोळे, अन् मनात पावसाच्या सरींचे मंथन भिजण्याच्या भीतीने धावणारी पावले, अन् हळूच किणकिणणारी पैंजण|| त्या दिवशी सार आभा