Skip to main content

[[पण होत नाही ना!]]

लेखक जव्हेरगंज यांनी रविवार, 18/09/2016 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा पण होत नाही ना! आपण जावं, अंगणात जरा सुखानं पाणी भरुन घ्यावं फुलांच्या बहरात पाखरांची गाणी ऐकत, मऊशार गवतावर बसून राहावं, डोळे मिटून. पण होत नाही ना! आधी कसं, जमिनीतच सगळं अदृश्य व्हायचं कुठेतरी एखाद्या कोंब यायचा पण तोवर माजलेलं तण आपणच नकळत काढून टाकावं तरीही होत नाही ना! आपण नुसतं बसावं, करण्यासारखं आहे काय? शिंपडू थोडा ओलावा तेवढीच मनाला शांतता च्यामारी आज होत का नाही? फसवणुक झाल्यासारखं निष्ठुर बसायचं धुमसत राहिलेल्या वेदनेला आतल्याआत संपवून टाकायचं? उद्या येईल ना येईल पण आजची चंदेरी झालर विणल्याशिवाय कसं उठायचं? न जाणो उद्याचा उद्या नसलाच तर?
लेखनविषय:

वाचने 2387
प्रतिक्रिया 6

प्रतिक्रिया