Skip to main content

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: लाटा

लेखक निओ यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
aa एका तपानंतर आज ती भेटली. त्याच्याविषयीच्या प्रेमाबद्दल, जगाबद्दल भरभरून बोलली. रडली. तिच्या प्रेमसागराला पौर्णिमेचं भरतं आलं होतं. सर्व सीमा ओलांडणारं. तो सुन्न होऊन ऐकत राहिला. तिच्याविषयी आकर्षण असणाऱ्या भूतकाळात शिरला. तारुण्याच्या नकळत्या वळणावर त्यांची चूकामूक झाली होती. आज ती प्रेमाचा सागर असूनही त्याची तहान भागवू शकत नव्हती. सागर जवळ असूनही तो किनाऱ्यावरच्या वाळूसारखा कोरडा राहिला. तिने प्रयत्न सोडले नाहीत.

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: पैलतीर

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:48 या दिवशी प्रकाशित केले.
aa “या वयात असली थेरं?" सुनेचे जळजळीत शब्द आठवून आजोबांना कससंच झालं. बायकोच्या माघारी इकडंतिकडं न बघता मुलाला एकट्यानं समर्थपणं वाढवलं या कौतुकावर, अभिमानावर एका क्षणात पाणी पडलं असं वाटून राहिलं. मुलानं त्यांना पंचाहत्तरीला कौतुकानं स्मार्टफोन दिला होता. नातवानं कसा वापरायचा शिकवला आणि त्यांच्यासाठी नवीन विश्वाचं दार उघडलं.

शतशब्दकथा स्पर्धा२०१७: हत्त्या

लेखक शब्दबम्बाळ यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:45 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaaa "काय रे, आज चहा बदललास चक्क?" हॉटेलात आल्या आल्या पत्रकार अनिशने हसत आपल्या इन्स्पेक्टर मित्राला विचारले. "हम्म..." किंचित उदास स्वरात उत्तर आले "ऑल ओके?" "हो" तोच स्वर "ठीके, अरे परवाच्या त्या नवविवाहितेच्या हत्येच्या केसच काय झालं, काही प्रोग्रेस?" विषयाला हात घालत अनिश बोलला. "कबुली जबाब दिलाय तिच्या नवऱ्याने आजच" खिन्न नजरेने त्याच्याकडे पाहत इन्स्पेक्टर देसाई बोलले. "वाटलंच होत मला!

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: भेट समुद्रावरची

लेखक अंतु बर्वा यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:36 या दिवशी प्रकाशित केले.
aa खडकापाशी तो उदास बसला होता. इथेच ती महिन्याभरापुर्वी भेटली होती. तीनं जग पहिलेल नव्हतं पण गप्पांना अंत नव्हता, तासनतास बोलायचे दोघं. आमच्याकडे असं तुमच्याकडे कसं? प्रश्नांवर प्रश्न. तो म्हणायचा, चल माझ्याबरोबर. माझं जग आवडेल तुला. शेवटी कुणाला कळु द्यायचं नाही या अटीवर राजी झाली. पण गोष्टी लपत थोडीच असतात? कळलच शेवटी जगाला आणि तिलाही कळलं, सर्वच माणसं त्याच्यासारखी चांगली नसतात. असा परिकथेतला प्रकार लांबुनच पाहिल तो माणुस कसला?

शतशब्दकथा स्पर्धा २०१७: अपुर्ण इच्छा

लेखक वरुण मोहिते यांनी शुक्रवार, 03/02/2017 22:33 या दिवशी प्रकाशित केले.
aaaaaa आज जरा खुशीतच होतो.अनेक वर्षांनी माझी इच्छा पूर्ण होईल असे वाटत होते.माझ्या देशात नोटबंदी जाहीर झाली तेव्हापासून एकच विचार होता ह्या नवीन नोटांवरून तरी माझी प्रतिमा हटवावी. जितकी मानहानी माझी हयातीत झाली नाही तितकी मानहानी ह्या नोटांवरील प्रतिमेने केली. माझी मूल्य पायदळी तुडवली. काय काय पाहावं लागलं मला त्याआडून. हे जास्त क्लेशकारक आहे . तसही मी राष्ट्रदोही गुन्हेगार आहे तुमच्यासाठी . मला ह्या जबाबदारीतून मुक्त करा .

पळवाट - भाग १

लेखक रातराणी यांनी शुक्रवार, 03/02/2017 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
"अजून कशी आली नाही हो? जरा कोपऱ्यापर्यंत येता का जाऊन?" झोप लागल्याचं उगीच नाटक करणाऱ्या तात्यांना काकूंनी जरा घाबरतच विचारलं. "आता काय लहान आहे का ती? तीच तीला कळायला नको?" डोळे उघडून काकूंकडे पाहण्याचे कष्टही न घेता तात्या करवादले. "तरुण पोर आहे, माझ्या जीवाला घोर लागलाय फोन आल्यापासून.. कुठं काही बरंवाईट झालं तर कुणाला विचारता?" काकूंनी रडवेल्या सुरात विनवणी केली पण तात्यांवर काही परिणाम झाला नाही. दार उघडून काकू अंगणात चुळबुळ करीत उभ्या राहिल्या.

शेजाऱ्याचा डामाडुमा- सुगौली तह आणि सत्तेचा बदलता सारीपाट - नेपाळ भाग ५

लेखक अनिंद्य यांनी शुक्रवार, 03/02/2017 16:17 या दिवशी प्रकाशित केले.
=========================================================================== शेजाऱ्याचा डामाडुमा - भारताचे सख्खे शेजारी : प्रस्तावना... नेपाळ-०१... नेपाळ-०२... नेपाळ-०३... नेपाळ-०४... नेपाळ-०५... नेपाळ-०६...

भेळ पुराण

लेखक सौरभ पारखे यांनी शुक्रवार, 03/02/2017 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
भेळ पुराण ... मुरमुरे ,त्यात चुरलेल्या शेवपुरीच्या कडक पुऱ्या आणि बारीक शेव त्यावर लाल तिखट आणि खजुराची चटणी एव्हडेच घालून मुंबईची भेळ तयार होते ..पण चविष्ट असते (च असे नाही पण ;) ) पुण्यातली भेळ मात्र साग्रसंगीत मुरमुरे ,पापडी .भावनागरी ,एक नंबर शेव ,पापडी ,गाठी शेव , खारेदाणे, तिखट बुंदी ,मिरीचीचा ठेचा ,काळे मीठ, चिंच खजुराची चटणी वर कांदा टोमाटो हे सगळे मिश्रण एका स्टीलच्या पातेल्यात मोठ्या चमच्याने एकजीव केले जाते आणि त्यावर पुन्हा भुरभूरलेली बारीक शेव,कोथिंबीर आणि कांदा...

वर्ल्डकप क्लासिक्स - १९७९ - फायनल - वेस्ट इंडीज विरुद्ध इंग्लंड

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 03/02/2017 10:43 या दिवशी प्रकाशित केले.
२३ जून १९७९ लॉर्डस्, लंडन ऐतिहासिक लॉर्डसच्या मैदानातच १९७५ च्या पहिल्या वर्ल्डकपप्रमाणे दुसर्‍या वर्ल्डकपचीही फायनल रंगणार होती. पहिल्या वर्ल्डकपच्या विजेत्या क्लाईव्ह लॉईडच्या वेस्ट इंडीयन संघ दुसर्‍या वर्ल्डकपच्याही फायनलमध्ये येऊन धडकला होता. लॉईडच्या संघात स्वतः लॉईड, गॉर्डन ग्रिनिज, डेसमंड हेन्स, व्हिव्हियन रिचर्डस्, अल्विन कालिचरण असे बॅट्समन होते.

(वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने)

लेखक चतुरंग यांनी शुक्रवार, 03/02/2017 08:13 या दिवशी प्रकाशित केले.
विशाल भौंची नेहेमीप्रमाणेच सुरेख गजल वाचली 'वंचनांचे खर्चही पडताळणे आता नव्याने' आणि आमच्या काही वंचनांचा बांध फुटला!
काव्यरस