दीपोत्सवा, आज तरी तुझं इथे स्वागत!

३१ डिसेंबरचा दिवस होता. आम्ही सगळे न्यू इयर सेलिब्रेशनच्या तयारीत होतो. खाण्याचा एखादा मस्त बेत आणि टीव्हीवरचे कार्यक्रम बघत बसणं असा नेहमीचा प्लॅन. आज आमच्याकडे एक चित्रकार येणार होते. आजवर मी आमच्या घरी खूप लेखक, कवी मंडळी आलेली पाहिली होती, पण एका चित्रकाराला पहिल्यांदाच पाहणार होते. मला चित्रं काढण्याचं फार वेड, त्यामुळे मी फार खूश होते. वर्तमानपत्रात आणि टी.व्ही.मध्ये पाहून चित्रकारांविषयी काही कल्पना तयार झालेल्या होत्या - लांब केस, दाढी, झब्बा असं काहीतरी...
पाटील मालक.
".....या माणसाने एकही सल्ला न देता किंवा एका पैशाचीही मदत न करता मला अनेक गोष्टी शिकवल्या !" असे मी एखाद्याविषयी म्हणालो तर नक्कीच विचारात पडाल की याने नक्की काय केले असेल?
..विचारलं तर मलाही नीट सांगता येणार नाही, पण ओळख झाल्यापासून अवघ्या एक-दीड वर्षांतच या व्यक्तीने कांहीही न बोलता माझ्यावर प्रचंड प्रभाव टाकला.. आणि आज ओळख होऊन बारा तेरा वर्षे सहज झाली असावीत. आजही तो प्रभाव कमी झाला नाहीये.
त्या दिवसात मी कॉलेज करून पार्ट टाईम जॉब करत असे.
एक टिपिकल सकाळ. डोळ्यांवर अजूनही असलेली झोप. कोणीतरी हाका मारून उठवतंय. आपल्याला उठवत नाहीये, पण नाइलाज आहे. कसंबसं उठून, अर्धवट झोपेत ब्रश सुरू झालाय आणि तिकडे रेडियोवर 'भूले बिसरे गीत' सुरू झालंय. लता गातेय - कधी 'राजा की आएगी बरात...', तर कधी 'बरसात मे हमसे मिले तुम...'. सत्तरच्या दशकात जन्मलेल्यांच्या आणि खासकरून सकाळची शाळा असलेल्यांच्या घरातलं हे अगदी रोजचं दृश्य. सकाळपासून सुरू झालेला रेडिओ हा रात्री छायागीत, बेला के फूल ऐकूनच बंद व्हायचा.
अटलांटिक महासागराला पायाशी घेऊन उभा असणारा उत्तर स्पेन! लाखो वर्षांपूर्वी नष्ट झालेल्या डायनोसॉरच्या खर्याखुर्या पाऊलखुणा इथे पाहायला मिळतात, तशीच पस्तीस ते चाळीस हजार वर्षांपूर्वी मानवाने रंगवलेली गुफाचित्रंही. पण सोळाव्या शतकात अमेरिका खंडाहून युरोपला परतणार्या खलाश्यांसाठी या भागाचं वेगळंच महत्त्व होतं. जिवावर उदार होऊन केलेल्या सागरसफरीनंतर युरोपच्या भूमीचं प्रथमदर्शन त्यांना होत असे उत्तर स्पेनच्या एका पर्वतरांगेमुळे.
बदलापुरात अनंत हलवायाकडे श्रीखंड घेताना एकदा हा पदार्थ दिसला होता. खायला अगदी चविष्ट वाटला. खाताना, त्यात काय काय असावे याचा अंदाज घेत केलेली ही पाकृ.
साहित्यः
"सर कुठं जायचंय?"
"अरे, त्या पुलावरून घे ना"
मी टॅक्सीच्या ड्रायव्हरला सांगितले. त्याने मान डोलावली. त्याने गाडी पुलाच्या दिशेने वळवली. मी टॅक्सीच्या मागच्या सीटवर एकटाच बसलो होतो. मी बाहेर बघितले. रात्र झाली होती, पावसाने जोर पकडला होता. बाहेर गाड्यांची संख्या तशी कमीच होती. बरे आहे, मी डोळे मिटले. दीर्घ श्वास घेतला. मी वाकून माझे डोके माझ्या दोन पायांमध्ये सरकवले. मी तसाच बसून राहिलो. ड्रायव्हरने माझ्याकडे नाराजीने बघितले. मी कण्हत होतो.
