
हातोळे
बदलापुरात अनंत हलवायाकडे श्रीखंड घेताना एकदा हा पदार्थ दिसला होता. खायला अगदी चविष्ट वाटला. खाताना, त्यात काय काय असावे याचा अंदाज घेत केलेली ही पाकृ.
साहित्यः
- साजूक तूप (मोहन आणि तळणीसाठी)
- मैदा साधारण एक वाटी
- साखर/पिठीसाखर एक वाटी
- खवा २५० ग्रॅम
- वेलदोडे
- सुका मेवा
कृती:
सारणासाठी खवा एका जाड बुडाच्या पातेलीत परतायला घ्यायचा. परतून साधारण तो असा दिसायला लागला की गॅस बंद करून त्यात आवडीप्रमाणे साखर दळून मिसळावी
ते थंड होईपर्यंत मैद्यात त्याच्या अंदाजे पाव भाग साजूक तूप गरम करून मोहन घालावे आणि घट्ट मळावे. गोळा साधारण असा दिसायला हवा.
मैद्याच्या सारख्या आकाराच्या लाट्या लाटून, एका लाटीत खव्याचे सारण भरावे आणि दुसरी लाटी त्यावर ठेवून पाण्याचे बोट फिरवून कडा नीट बंद कराव्यात. नंतर त्याला मुरड घालून हातोळे साजूक तुपात तळून घ्यावेत.
हातोळे तयार आहेत.
त.टी: ओरिजनल पाकृत हातोळे, चिरोटे पाकात घालतात तसे केले होते. हे मी वेळेअभावी थोडक्यात केलंय ;)

वाचने
11783
प्रतिक्रिया
23
मिसळपाव
प्रतिक्रिया
फोटो दिसत नाही
एकच लंबर रे सुडुक, मस्त जमलंय
वाह!
मस्त झाले आहेत हातोळे
क्लासच!
मस्त पाककृती
सुंदर
बरोबर!
In reply to सुंदर by सविता००१
फार सुरेख मुरड जमली आहे रे.
In reply to सुंदर by सविता००१
आता दिसतायेत का फोटो की
फोटो दिसत नाहीयेत.
नाही
अनंत हलवाईकडली हातोली हा
व्हिडीओ का अर्धवट दिसतोय? मी
In reply to अनंत हलवाईकडली हातोली हा by नूतन सावंत
मला फक्त व्हिडीओ दिसतो. पण
मस्त
ओक्के, यांना हातोळे म्हणतात
सर्वांचे आभार. मी फोटो पब्लिक
तुम्ही फोटो गुगल फोटोंवरून
In reply to सर्वांचे आभार. मी फोटो पब्लिक by सूड
फारच देखणे दिसताहेत हातोळे !
मस्त दिसताहेत हतोळे. ती मुरड
सुंदर..
फार च सुरेख झालेत ! मुरड