Skip to main content

जपमाळ

लेखक शैलेन्द्र यांनी शुक्रवार, 17/11/2017 20:14 या दिवशी प्रकाशित केले.
हेही बरेच आहे, तेही बरेच होते, आपापल्या परीने, सारे खरेच होते मोजून पाप माझे जपमाळ ओवलेली, मोक्षास गाठण्याला, तितके पुरेचं होते, आयुष्य तारकांचे मोजीत रात्र होती मोहक असे मनाला भूलवीत बरेच होते खाणीत नांदण्याचा कोळश्यास शाप आहे नसते ठिसूळ तुकडे तर तेही हिरेच होते सरणास भेटताना गेली नजर मागे चेहरे ओळखीचे हसरे सारेच होते -शैलेंद्र
काव्यरस

दवणीय अंडी - अंडे ४थे - सुविचारी सकाळ

लेखक आदिजोशी यांनी शुक्रवार, 17/11/2017 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
आजचा सुविचारः न पिणार्‍याला जबरदस्तीने पाजता येईलही, पण त्याला बेवडा बनवता येणार नाही. दारूची ओढ रक्तातच असावी लागते. अंडी घालण्यासाठी सगळ्यात उत्तम वेळ म्हणजे सकाळ. सूर्य काही तासांपूर्वीच उगवलेला असतो, मेंदू मस्त रिकामा असतो, मन मात्र भावनांनी ओथंबलेले हवे. रात्री नंतर रोज येणारी सकाळ हँगओवर सोबत इतरही अनेक गोष्टी घेऊन येते. प्रत्येक सकाळ ही एका नव्या आयुष्याची सुरुवात होऊ शकते. रोज नवं आयुष्य. नवी बायको/नवरा, नवी नोकरी, नवे आई-बाप, नवे शेजारी, नवे मित्र, नवे कपडे... साबण मात्र जुनाच असावा. शरीरावर चढलेली पुटं घालवण्याचं पुण्यकर्म साबणच करतो.

वैज्ञानिक घडामोडी - भाग १

लेखक arunjoshi123 यांनी शुक्रवार, 17/11/2017 12:54 या दिवशी प्रकाशित केले.
प्रिय मित्रहो, आपण विज्ञानशासित जगात राहतो. खालच्या पानावर scientific revolution शास्त्रीय समजुती कशा बदलतात हे कुन या लेखकाने मांडले आहे. वैज्ञानिक ज्ञानाच्या स्वरुपाबद्दल त्यांचं वरच्या लिंकमधे दिलेलं पुस्तक महत्त्वाचं मानलं जातं. त्यात खालचा उतारा महत्त्वाचा वाटला -
Normal scientific progress was viewed as "development-by-accumulation" of accepted facts and theories.

अनवट किल्ले २२: सांगली, मिरज, दंडोबा, जुना पन्हाळा, रामगड, बागणी, बत्तीस शिराळा ( Sangli, Miraj, Dandoba, Juna Panhala, Ramgad, Battis Shirala, Bagani )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 17/11/2017 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
अनवट किल्ल्यांच्या या मालिकेतील सांगली जिल्ह्यातील उर्वरीत किल्ल्यांचा घेतलेला हा एकत्रित आढावा. अपवादात्मक प्रसंग सोडले तर फार मोठ्या एतिहासिक घटना या परिसरात झालेल्या नाहीत. तसे हे छोटे भुईकोट आहेत. यांचा आढावा आपण या एकाच भागात घेउ आणि दक्षिण महाराष्ट्राची दुर्गयात्रा संपवू. मिरजः- मिरजेचे उल्लेख ई.स. दहाव्या शतकापासून येतात. कोल्हापूरच्या शिलाहार घराण्याचा चौथा शासक जट्टिगा दुसरा (१०००-१०२०) याला घोषित केले. त्याचा मुलगा मारसिंह (१०५०-१०७५) याच्या ताब्यात करहाटक (कऱ्हाड), मिरींजा (मिरज) आणि कोकण हा परिसर होता.

पुणे ते लेह (भाग 2 - पुणे ते शामलजी)

लेखक अभिजीत अवलिया यांनी शुक्रवार, 17/11/2017 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते लेह (भाग १ - पूर्वतयारी) २४ ऑगस्ट तर रात्री ९ ला पुण्याहून (कोथरूड मधून) निघालो आणि लगेच चांदणी चौकातून बायपासवर गेलो. आजचे लक्ष होते फक्त १३५ किमीवर असलेले नवी मुंबईतील कोपरखैरणे. रस्त्याची मुंबईहून पुण्याकडे येणारी बाजू वाहनांनी खचाखच भरलेली होती. दुसऱ्या दिवशी गणेश चतुर्थी असल्यामुळे रस्त्यावर प्रचंड गर्दी अपेक्षितच होती. साडेनऊच्या सुमारास एक्सप्रेस वे वर पोचलो. माझा सर्वात आवडता रस्ता. पाऊस देखील नव्हता त्यामुळे ११ ते ११:१५ पर्यंत कोपरखैरणेला पोचू असा अंदाज होता.

||संत ज्ञानेश्वर ||

लेखक वैभवदातार यांनी शुक्रवार, 17/11/2017 11:00 या दिवशी प्रकाशित केले.
काल संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज यांचा संजीवन समाधी दिवस होता .

infinity

लेखक जव्हेरगंज यांनी शुक्रवार, 17/11/2017 02:50 या दिवशी प्रकाशित केले.
त्या पटरीवर अंधाराचे साम्राज्य होते. काळोखी झुडपे भयाण भासत होती. बोचऱ्या थंडीने पाय लटपटत होते. दूरवर कुत्री भुंकत होती. मधूनच एक रानडुक्कर पळालं आणि मी सिगारेट काढली. सिगारेट! एक सिगारेट! बस एक सिगारेट! सालं पेटवायला माचीस नाही. चरफडत चालत राहिलो. इथली शांतता किती भयाण आहे. कुण्या एकेकाळी वापरात असलेली आणि जिचा भयानक अपघात झाला असावा अशी वाटणारी एक मालगाडी यार्डात उभी होती. प्लॅटफॉर्मवर एक माणूस दिसेल तर शप्पथ. दिवे मात्र अजूनही जळत होते. लख्ख प्रकाश. बघितलं तर एक छोटसं स्टेशन पण टापटीप दिसत होतं. मी प्लॅटफॉर्मवर चढलो. एका बाकड्यावर एक मुलगी बसलेली आढळली. पॉश वाटत होती.

गाज २

लेखक अबोली२१५ यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
गाज१ http://www.misalpav.com/node/41462 विश्वा आता हाताशी आला हाय. आता त्याच लगीन करून दिल पाहिजे. म्हणजी तो वाया जाणार नाय, आजकाल काही चांगल्या लोकांशी संगत नाय हाय. तो आजकाल अण्णा मलबऱ्याशी संग करतु. विश्वला फकस्त त्याच्या अंगावरच दागिनं आणि त्याचा पैका दिसतु. त्यो अण्णा कुठं कुठं फिरत असतोय. कधी तालुका, कधी मुंबई, कधी मद्रास भिंगरीचं अस्तेय त्याच्या पायाला. एक दोन वेळा पोलीस पण आल्ती होती त्यांचा घरला. गंणप्याची विचारांची लडी तात्यांच्या हाळीने तुटली "काय र ! कधी पासून हाका देतुया पण, लक्ष कुठं हाय तुज" "आर !

ग्राम"पंचायत" लागली..!! -7

लेखक विशुमित यांनी गुरुवार, 16/11/2017 18:00 या दिवशी प्रकाशित केले.

पाहिले मी जेव्हा तुला ( भाग ३ )

लेखक अनाहूत यांनी गुरुवार, 16/11/2017 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
" अग म्हणजे अशी प्रत्येक गोष्टच नाही कळत पण तरीही आपण समजतोच ना एकमेकांना . " " म्हणजे selective गोष्टी समजतात आणि बाकीच्या नाही . पण कोणत्या समजतात आणि कोणत्या नाही ? " " अग काय हे ? असं असत तुझं , मी काय बोलतोय आणि तुझं काहीतरी वेगळच . understanding आहे ना आपल्यात . " " कसलं understanding जे कळायला हवं ते तर नाही कळत आणि बाकीचं समजून काय फायदा "... ती अस्पष्टसं ओठातल्या ओठात काहीस बोलली . " काय ते ? मी ऐकलं नाही . " " तू राहू दे तुला न बोलता सगळं कळत आणि बोललेलं ऐकूही येत नाही . " " अगं असं का सांग ना काय ते ? " " ते राहू दे, ते मी असाच बोलत होते .