अनवट किल्ले २५: धुळ्याचा शेजारी, लळींग ( Laling )
महाराष्ट्रात अनेक शहरांना किल्ल्यांची पाश्वर्भूमी लाभली आहे. अशाच अनेक शहरांपैकी एक शहर धुळे शहर आहे, अहिराणी ही या शहराची मुख्य भाषा आहे. या भागातील किल्ले फिरण्याची मजा काही औरच कारण दिवसा येथील तापमान ४० पर्यत जाते, तर रात्री तेच १० ते १२ पर्यंत खाली उतरते. येथील किल्ले फिरतांना एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते ती म्हणजे येथे झाडांचे प्रमाण फारच कमी आहे. मुंबई-आग्रा महामार्गाने धुळय़ाहून नाशिकच्या दिशेने जाऊ लागलो की, अदमासे दहा किलोमीटरवर एक डोंगररांग आडवी येते. या डोंगररांगेला छेदत हा महामार्ग वाहतो. खरे तर तो इतिहासकाळापासून उत्तरेकडील इंदूर, आग्रा, दिल्ली शहरांकडे धावतो आहे.
मिसळपाव
सकाळचे सात वाजले होते सुर्य बर्यापैकी वर येऊनही थंडी काही कमी झाली नव्हती आणि गार वारेही वहात होते.
भात तोडणी झाली होती.