Skip to main content

लव्हगुरू

लेखक बोबो यांनी सोमवार, 29/01/2018 12:13 या दिवशी प्रकाशित केले.
कंपनीच्या बसमध्ये फोनवर हळू आवाजात बोलत असताना आपल्या शेजारी बसलेल्या ऑफिसच्या सहकारी पूजा आणि रिया दोघी आपल्याकडे पाहात हसताहेत, हे अमितला जाणवलं आणि तो अस्वस्थ झाला. त्याने फोन ठेवला, तसं त्यांनी लगेच विचारलं,"काय मग काय म्हणत होती गर्लफ्रेंड?" "क...क...क...कोण...गर्लफ्रेंड? नुसती मैत्रीण होती एक." "अरे लाजू नकोस आम्हाला सांगायला?आम्ही तुला मदतच करू?" क्षणभर अमित विचारात पडला. "तुम्ही मदत करणार?" त्याने विचारलं. "अर्थात,"रिया हसून म्हणाली,"अरे ही पूजा तर तुला एकसे बढकर एक टिप्स देईल. लव्हगुरू आहे ती. तिच्या टिप्स पाळल्यास तर गर्लफ्रेंड पटलीच पाहिजे." "असं असेल तर पूजा, प्लिज.

वलय (कादंबरी) - प्रकरण ७

लेखक निमिष सोनार यांनी सोमवार, 29/01/2018 09:40 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण ६ ची लिंक: https://www.misalpav.com/node/41864 -- प्रकरण ७ सोनी, सुप्रिया आणी रागिणी रहात असलेले ते वर्किंग विमेन्स हॉस्टेल असल्याने तेथे जायला यायला वेळेची बंधने नव्हती कारण मुंबई सारख्या शहरात आजकाल कामानिमित्त लोक दूर प्रवास करतात आणि आजकाल स्त्रीयासुद्धा पुरूषांच्या बरोबरीने दिवस रात्रीच्या शिफ्टमध्ये काम करतात. पण हॉस्टेलवर कुणाला भेटायला बोलवायचं असेल तर मात्र नियम होते. त्या दिवशी सुप्रिया पुण्याला गेलेली होती आणि रागिणी गेले दोन दिवस सूरजच्या फ्लॅटवर होती. सोनी बनकर आज रूमवर एकटी होती.

सातारा छत्रपतींची २३३ हिऱ्यांची पगडी?

लेखक मनो यांनी सोमवार, 29/01/2018 06:53 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राच्या इतिहासाशी संबंधित अनेक मौल्यवान खजिने परदेशांत आहेत. दुर्मिळ चित्रे, मूळ हस्तलिखिते, पोथ्या, मूर्ती एवढेच नव्हे तर हिरे, माणके आणि सोन्याच्या वस्तूही त्यात आहेत. थोड्या दिवसांपूर्वी श्री. संकेत कुलकर्णी यांनी नाशिक-हिरा याच्याबद्दल एक संशोधन प्रसिद्द केले होते. या वेळी लंडनमध्ये नव्हें तर अमेरिकेतील अश्याच एक विशेष मौल्यवान वस्तूची ही कहाणी. आजच्या महाराष्ट्र टाइम्स मध्ये ही बातमी प्रसिद्ध होत आहे. माझा हा लेख इतिहासप्रेमी आणि संशोधकांसाठी इथे टाकत आहे. हा लेख मूळ स्वरूपात शेवटच्या तीन पॅराग्राफ्सकट सोशल मीडियावर अथवा इतर कुठे शेअर करण्यास माझी काही हरकत नाही.

डिजिटल भारतासाठी युजर एक्सपीरिअन्स डिजाईन

लेखक कल्पक यांनी रविवार, 28/01/2018 21:47 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या ५००० वर्षात माणसानी जेवढी वैज्ञानिक-तंत्रज्ञानविषयक प्रगती केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५०० वर्षात केली. जेवढी प्रगती गेल्या ५०० वर्षात केली त्यापेक्षा जास्त प्रगती गेल्या ५० वर्षात केली. माणसाच्या प्रगतीचा हा वेग दिवसेंदिवस वाढतच आहे. आज जगाच्या ७ अब्ज लोकसंख्येपैकी ३ अब्ज लोक इंटरनेट वापरतात, ६ अब्ज लोक मोबाईल फोन वापरतात (त्यात १ अब्ज भारतीय मोबाईल धारक आहेत) आणि ३ अब्ज लोक ईमेल वापरतात. जगात १ अब्ज वेबसाईट्स, २ अब्ज संगणक आणि ४० लाख पेक्षा जास्त मोबाईल ऍप्स आहेत.

चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली

लेखक चामुंडराय यांनी रविवार, 28/01/2018 05:25 या दिवशी प्रकाशित केले.
( सुरेश भट _/\_ ) चल उठ रे बेवड्या झाली सांज झाली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली उघडले कधीचे गुत्त्यांचे द्वार बंद अन्‌ चोरपावलांनी आला देशीचा गंध गल्ल्यावरी गुत्त्याच्या आंटी येऊन बसली... बाहेर दारू गुत्त्यांना हलकेच जाग आली चल लवकरी आता पहिल्या धारेचा सहारा मोसंबी नारंगी ठर्रा करती तुझा पुकारा सज्ज साथ देण्या पापड अंडी चकली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली तव याद करिती सारी बेवड्यांची मांदियाळी घे एक घोट नवटाक चिंता सर्व जाळी तुज शोधण्यास वेडी बायको पुन्हा निघाली... बाहेर दारू गुत्यांना हलकेच जाग आली

ग्राम"पंचायत" लागली..!! - 10

लेखक विशुमित यांनी शनिवार, 27/01/2018 17:33 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/41800 मन्या चिंगाट घराकडे सुटला. काही तासच उरले होते. त्याची अस्मिता सकाळी सकाळी पदवीची शेवटच्या वर्षाच्या परीक्षेची तयारी करण्यासाठी तिच्या माहेराला जाणार होती. ती परत दीड महिन्यांनीच येणार होती. मोठा ग्याप पडणार होता. पदवीचा विषय आहे भूगोल. भूगोलसाठी दीड महिना? मी तर आयुष्यात (म्हणजे शाळेत, १० वी पर्यंत) २ तासाच्या वर कधीच अभ्यास केला नाही भोगल्याचा. मला हर्षा भोगले आवडायचा पण भूगोल... ह्या. ती भूगोल घेऊन पुढे काय करणार आहे तो मन्याचं जाणे.

ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ४ - अंगकोर थोम आणि बायोन मंदिर

लेखक अरविंद कोल्हटकर यांनी शनिवार, 27/01/2018 03:15 या दिवशी प्रकाशित केले.
ख्मेर हिंदु संस्कृतीचे अवशेष : भाग ४ - अंगकोर थोम आणि बायोन मंदिर. भाग १ भाग २ भाग ३  
जयवर्मन् सातवा
अंगकोर वाटच्या ३ किमी उत्तरेस ’अंगकोर थोम’ (महान् नगर) नावाचे जुने नगर आह

या देशात नेमक चाललयं काय?

लेखक परशुराम सोंडगे यांनी शुक्रवार, 26/01/2018 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
या देशात नेमक चाललं तरी काय? *************************** स्वातंत्र्य त्यांनी मांडीखालीच काय गांडीखाली लपून ठेवलं. नि धर्मनिरपेक्षतेच्या मखमली झुलीत ते लोकशाही जातीवादाच्या उबीत उबवीत बसलेत. मग ते तांडेची तांडे निघालेत उरात जाती जातीची धग पेटती ठेऊन.... द्वेवेषाच्या आवेशान ओठाओठातून भंयकर ज्वाला फेकीत एखादया दैत्यासारखी .... स्वातंत्र्याचा सूर्य गिळायला आणि ... मानवतेची ,समतेची छान छान फुलपाखर कुठचं कशी दिसत नाहीत ? भूर्र उडून गेलेत की का धारदार तीक्ष्ण हत्यारानं ठार केलेत त्यांनी ? ठार केलेत म्हणावं तर त्यांची प्रेत नाही दिसत इथं कुठेचं. समता व मानवतेचे सुंदर सुंदर मुखवटे घालून समतेची
काव्यरस

ट्रॅव्हर्सची कातळपरिक्षा "अलंग" ( Alang )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 26/01/2018 19:22 या दिवशी प्रकाशित केले.
नाशिक आणि अहमदनगर जिल्ह्याच्या सीमेवर इगतपुरी विभागाच्या दक्षिणेस १०-१२ कि.मी. पसरलेल्या कळसुबाईच्या रांगेत १५०० मीटरपेक्षा जास्त उंचीचे एक कातळ त्रिशूळ आकाशात घुसलय. दुर्गभटक्यांच्या कौशल्याची परिक्षा पहाणारे हे गड आहेत, अलंग, मदन आणि कुलंग. Alang 1 आंबेवाडी गावातून दिसणारे अलंग, कुलंग, मदनची रांग ( प्रकाशचित्र आंतरजालावरुन साभार ) सह्याद्रीतील सर्वांग सुंदर आणि सर्वात कठीण मानली जाणार्‍या भटकंतीची आपण ओळख करुन घेणार आहोत.