Skip to main content

मुक्तपीठ

लेखक चुकार यांनी रविवार, 11/02/2018 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवास खडतर, सापडेना वाट ती. वाटसरु नवे, हरदिवस भेटती. रोज नवा प्रश्न उभा समोर ठाके, थांब जरा, घे उसासा मन माझे सांगे. जुळता बंध नात्यांचे, कधी हेच धागे गुंतता, बाकी निसटून जाती एक सांधता साधता. वाटे व्हावे फुलपाखरू, मनमोकळे हुंदाडवे. स्वप्नांचे ओझे डोईपरी हलके व्हावे. विशाल आसमंत फिरुनी यावा एकदा, भरारीला बळ मिळावे मग पुन्हा एकदा. भुईचा भूचर कधीतरी पाखरू व्हावा, निर्भय, निश्चिंत, स्वच्छंदी, अनंत तो उडवा. वाटे द्यावे झुगारून सारे बंध. निखळून जावे साखळदंड. हुंदडणाऱ्या अल्लड मनास... मिळावे एक मुक्तपीठ....
काव्यरस

खेळ गाणी

लेखक प्रणित यांनी शनिवार, 10/02/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली. १. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी धम्मक लाडू.... तेल पाडू तेलंगीच्या.... तीन पुऱ्या चाकवताचं.... एकच पान धर गं बेबी.... हाच कान' २.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ, च्याऊ ला पैसे कुठून देऊ हंडी फोडून खापऱ्या देऊ ३. 'बदका बदका नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूलगा चुकला, छडी खाली लपला, छडी त्याला चावली विद्या देवी पावली' ४.

गूढ अंधारातील जग -८

लेखक सुबोध खरे यांनी शुक्रवार, 09/02/2018 21:08 या दिवशी प्रकाशित केले.
गूढ अंधारातील जग -८ खोल समुद्रातील जीव सृष्टी आपण समुद्रात खोल गेलो कि दर १० मीटरला १ बार(१४ psi pound per square inch) या दराने दाब वाढत जातो. तर साधारण १००० मीटर खोलीवर हा दाब १४००० psi. तुमच्या कारचे टायर प्रेशर ३० psi च्या आसपास असते. हा दाब म्हणजे एका चौरस इंचावर ८ टन किन्वा तुमच्या डोक्यावर १०० हत्ती उभे केले तर होईल तितका दाब आहे. महासागरातील सर्वात खोल मरियाना घळीची खोली १०००० मीटर असली तरी महासागराची सरासरी खोली ४००० मीटर असते. आणि बरेचसे जीव हे १००० मीटर पेक्षा खोल जात नाहीत. मग एवढा दाब काही सजीव कसे सहन करतात.

सर्वोच्च चढाईचा, कुलंग ( Kulang)

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 09/02/2018 20:12 या दिवशी प्रकाशित केले.
सरासरी सातशे मीटर उंची असलेल्या सह्याद्रीतील किल्ल्यावर चढाई म्हणजे कमीत कमी दोन ते अडीच तासाची निश्चिती. पण सह्याद्रीतील सर्व गडात सर्वाधिक वेळ लावणारी, म्हणजे तब्बल पाच तासाची चढाई असणारा किल्ला म्हणजे, "कुलंग". हेच ह्याचे वैशिष्ट्य म्हणता येईल.

आपला मानुसच्या निमित्ताने

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 19:18 या दिवशी प्रकाशित केले.
'आपला मानुस'च्या निमित्ताने आजच आपला मानुस प्रेक्षागृहात झळकला. सतीश राजवाडे दिग्दर्शित आणि नाना पाटेकर, सुमित राघवन आणि इरावती हर्षे अभिनित हा चित्रपट पहिल्याच दिवशी बघितलाच पाहिजे हे मी कधीच ठरवलं होत. अर्थात त्याच कारण अगदीच स्पष्ट आहे. सतीश राजवाडे सारखा सशक्त दिग्दर्शक साक्षात नाना पाटेकर सारख्या 'नटसम्राट' व्यक्तीला पडद्यावर कसं दाखवतो ही उत्सुकता तर होतीच. पण सोबत तेवढाच सशक्त अभिनय करणारा सुमित राघवन आणि स्वतःच वेगळेपण कायम सिद्ध करत आलेली इरावती हर्षे असे सशक्त कलाकार होते. खरच चित्रपट अप्रतिम जमून आला आहे यात वादच नाही. नानांच्या अभिनयाबद्दल काय बोलणार?

सर्वसामान्य आणि राजकारणी!

लेखक ज्योति अळवणी यांनी शुक्रवार, 09/02/2018 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
सर्वसामान्य जनता भावूक असते राजकारण्यांना ती मुभा नसते.. समोर होणारा अपघात बघूनही चाकरमानी पळतात.. लेटमार्कच्या भिती पुढे हृदय गहाण ठेवतात! त्यांच्या असहाय्यतेचे कौतुक होते... राजकारण्यांच्या उशीराचे वाभाडे निघते... हृदयशून्य... भावनाहीन... राजकारणी असतात... जणूकाही त्यांच्याकडे मनं नसतात! निवडून दिलंय तुम्हाला... तुमच्या प्रत्येक क्षणावर हक्क... कराच तुम्ही चूक... अपमानाचा चाबूक तुमच्यावर! म्हणतात ना हृदयशून्य... मग तसंच जगावं... तुमची मुलं... तुमचं कुटुंब... प्रायोरिटी कधीच नसावं.... म्हणून वाटतं माणसाने राजकारणी नसावं... किमानपक्षी राजकारणात भाऊक नसावं!!
काव्यरस

माझा जॉली होतो तेंव्हा

लेखक मित्रहो यांनी शुक्रवार, 09/02/2018 08:31 या दिवशी प्रकाशित केले.
"यावेळेस दिवाळीला फराळाचा एक पदार्थ तू बनवायचा." रविवारी सकाळी मी अंथरुणात लोळत पडलो असताना आमच्या हीने बॉम्ब टाकला. उंच धिप्पाड जोएल गॉर्नरने पहीलाच चेंडू शिवसुंदर दासला बाउंसर टाकल्यावर त्याची जी अवस्था होइल तशी काहीशी माझी अवस्था झाली होती. शाळा कॉलेजातले सारे खडूस मास्तर बायकोचे रुप घेउन माझी सरप्राइज टेस्ट घ्यायला उभे आहे असे वाटत होते. हा सारा त्या जॉली एलएलबी सिनेमाचा परिणाम होता. कुठुन दुर्बुद्धी झाली आणि तो सिनेमा बघायला गेलो असे झाले होते.

काहूर !!!

लेखक Sanjay Uwach यांनी गुरुवार, 08/02/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
काहूर !!! प्रत्येक माणसाचा एक मूळस्वभाव हा ठरलेला असतो .या स्वभावाला अनुसरून तो आपल्या आयुष्यातील अनेक निर्णय घेत असतो .कधी कधी मात्र छोट्याशा स्वार्था साठी तो कांहीतरी विसंगत असे निर्णय घेतो .या विसंगत निर्णयाची प्रेरणा देखील, त्याला त्याच्याच अंतर मनातून मिळाली असते . दिनूची गोष्ट हे याचे एक छोटेसे उदाहरण असू शकेल . दिनू तसा प्रामाणिक माणूस .त्याच्या आयुष्या बद्दल अधिक काय सांगणारा .लहानपणीच त्याच्या आईवडिलांचे छत्र हरपले . एकट्या म्हाताऱ्या आजीने, लोकांच्या घरी मोल मजुरी करून दिनूचा कसाबसा सांभाळ केला.

आटपाटनगर, पाटण, पाटील, पटेल इत्यादी

लेखक माहितगार यांनी गुरुवार, 08/02/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
मनो याम्च्या बाजीराव अ‍ॅट बिठूर लेखातील; राही, मनो, अरविंद कोल्हटकरां सोबतची एक अनुषांगिक उपचर्चा राजेलोकांची बसण्याची पद्धती आसने सिंहासन इत्यादी मार्गाने गेली . त्या चर्चेत सिंहासनास संस्कृतातील मंचक आणि भद्रासन हे शब्द पर्यायांचा विचार झाला . उर्दूतील तख्त , गद्दी शब्दाची चर्चा झाली तर मराठीतील गादी शब्दाचीही आठवण निघाली . पत > पट > पाट >आटपाटनगर, पाटनगर , पाटण, पाटील पटेल इत्यादी शब्द साधर्म्याचा शोध या निमित्ताने वेगळ्या धागा लेख चर्चेच्या माध्यमातून घ्यावा असा विचार केला.

तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 08/02/2018 13:36 या दिवशी प्रकाशित केले.
तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली गंध मनाचा उडाला नभी थेम्ब बनुनी खाली कोसळली तुझी आठवण साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली झिजूनी काय मिळवले, माउली ? चूल मोकळीच राहिली हात जरी असले मदतीस हजार तुझी चव मात्र आतच राहिली उत्तरे न मिळती कोड्याची सर्व दडले या अंतरी मनी साठले भंगार सारे अंगार बनुनी जाळी जीवा ज्वाला जिथे तिथे पोहोचली तुझी आठवण, साठवणींच्या कोंदणात अशीच पडून राहिली चूक घडली , क्षमा नाही , अक्षम्य अपराध हा आम्ही काशी नाही दाविली उभी हयात चिंतेत गेली चितेवरी ती लोपली गेली मित्रा, सोडूनि आम्हा कायमची माझी माउली सिद्धेश्वर विलास पाटणकर