खेळ गाणी
मध्यंतरी व्हाट्सएप वर खेळगाण्यांचा एक मेसेज वाचायला मिळाला आणि लहानपणी म्हटली जाणारी काही खेळगाणी मी माझ्या मुलीला शिकवली.
१. 'आपडी-थापडी.... गुळाची पापडी
धम्मक लाडू.... तेल पाडू
तेलंगीच्या.... तीन पुऱ्या
चाकवताचं.... एकच पान
धर गं बेबी.... हाच कान'
२.च्याऊ म्याऊ च्याऊ म्याऊ
च्याऊ ची कोंबडी आपण खाऊ,
च्याऊ ला पैसे कुठून देऊ
हंडी फोडून खापऱ्या देऊ
३. 'बदका बदका नाच रे, तुझी पिल्लं पाच रे, एक पिल्लू मेलं, गाडीत घालून नेलं, गाडी गेली डोंगराला, आपण जाऊ बाजाराला, बाजारातून आणल्या पाट्या, साऱ्या मुलांना वाटल्या, एक मूलगा चुकला, छडी खाली लपला, छडी त्याला चावली विद्या देवी पावली'
४. च्याऊ म्याऊ
पितळीचं पाणी पिऊ
भुर्रकन उडून जाऊ'
कोणाला अजून गाणी आठवत असल्यास शेअर करा
याद्या
3824
प्रतिक्रिया
11
मिसळपाव
आईचं पत्र हरवलं ......
कोण तू रे... टंपिटोला
भारी. हे माहीत नव्हतं
In reply to कोण तू रे... टंपिटोला by ज्योति अळवणी
एका खेळातील गाणे
कोरा कागद निळी शाई
In reply to एका खेळातील गाणे by दीपक११७७
हे पण होतं
In reply to कोरा कागद निळी शाई by पिनू
शाळा सुटली
अटक मटक चवळी चटक
दोन उंदीर...
कापुस कोंड्याची गोष्ट.................
सातार्याचा म्हातारा,