Skip to main content

उन्हाळी भटकंती: वासोटा ( Vasota )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 13/04/2018 11:42 या दिवशी प्रकाशित केले.
कोयनेच्या घनदाट जंगलात एक गड, वाघासारखा दबा धरुन अरण्याचे रक्षण करतोय. दाट झाडीची झुल पांघरलेला हा वनदुर्ग आहे, "किल्ले वासोटा". वासोटा किल्ल्याच्या प्राचीनत्वाचा शोध घेता आपल्याला वसिष्ठ ऋषींच्या काळापर्यंत मागे जावे लागेल. असे मानले जाते की, वसिष्ठ ऋषींचा एक शिष्य, अगस्ती ऋषी यांनी विंध्य पर्वत ओलांडून दक्षिणेकडचा मार्ग शोधला, सह्याद्रीच्या कोयना काठच्या त्या शिखरावर राहण्यास आला व त्याने आपल्या निवासी डोंगराला आपल्या गुरूंचे नाव दिले. कालांतराने या देशीच्या क्षत्रियांनी त्या डोंगराला तटाबुरूजाचे साज चढवून लष्करी ठाणे केले. त्या डोंगराचे परंपरागत ’वसिष्ठ’ हे नाव अपभ्रंश होऊन ‘वासोटा’ झाले.

Dead Man's Hand - ९

लेखक स्पार्टाकस यांनी शुक्रवार, 13/04/2018 07:20 या दिवशी प्रकाशित केले.
रोहितचा चेहरा पाहताच काहीतरी भानगड आहे याची कदमना कल्पना आली होती. त्याने पुढे केलेल्या कागदावरच्या त्या मेसेजचा अर्थ लक्षात येताच ते सुन्नपणे त्याच्याकडे पाहतच राहीले. एक शब्दही न बोलता त्याने खंडाळा पोलीस स्टेशनला फोन केला आणि फोन आढळलेल्या जागेचं साधारण लोकेशन सांगून त्यांना चौकशी करण्याची विनंती केली. पाठोपाठ मुंबईला येण्यासाठी निघालेल्या देशपांडेंना खंडाळा गाठण्याची सूचना देण्यासही तो विसरला नाही. दरम्यान कदमनी किरणच्या मोबाईलला कॉल लावला होता. रिंग जात होती पण किमान पाच - सहा वेळा प्रयत्नं करुनही किरण फोन उचलत नव्हता.

एकमेवाद्वितीय ग्रेटा गार्बो

लेखक महामाया यांनी शुक्रवार, 13/04/2018 02:20 या दिवशी प्रकाशित केले.
ग्रेटा गार्बो आठवली अन् मन हळहळलं. कां...? कारण तिच्या मुळेच मला हालीवुडचा लळा लागला. 1990 साली जेव्हां गार्बो वारली, तेव्हां मला तिचं नाव देखील ठाउक नव्हतं. पण ती गेली, त्या दिवशी महाराष्ट्र टाइम्समधे तिच्यावरील गोविंदराव तळवळकरांचा अग्रलेख ‘एक सुंदर गूढ’ अप्रतिम असाच होता. त्याची सुरवात ‘AGE CANNOT WETHER HER; NOR CUSTOM STALE’ या वाक्याने झाली होती. त्या अग्रलेखात गार्बो सोबत इनग्रिड बर्गमनचा ओझरता उल्लेख होता. तो अग्रलेख वाचून मी गार्बोच्या प्रेमात पडलो. कारकीर्दीच्या शिखरावर असतांना तिने निवृत्ति पत्करली असल्यामुळे असेल कदाचित, पण तिच्याबद्दल मनांत उत्सुकता निर्माण झाली.

प्रदूषण (२५): महानगर - एक प्रदूषित कारागृह

लेखक विवेकपटाईत यांनी गुरुवार, 12/04/2018 19:06 या दिवशी प्रकाशित केले.

शेरखान जंगलाचा राजा. राजा असला तरी पोट-पाण्यासाठी त्याला शिकार करावीच लागायची. किमान दहा-बारा वेळी प्रयत्न केल्या वर त्याला शिकार गवसायची. कधी सांभर सारखे मोठे जानवर गवसले तर काही दिवस मेजवानी. तर कधी-कधी सस्या सारख्या छोट्या जनावरा वर ही गुजाराण करावी लागे. कधी-कधी कित्येक दिवस उपासमार ही व्हायची. तरी ही शेरखान खुश होता. कुठल्या जनावराचा शिकार करायची हे ठरविण्याचे स्वतंत्रता त्याच्या पाशी होती. आपल्या मर्जीचा तो राजा होता. तो जंगलात कुठेही फिरू शकत होता. पण म्हणतात न, काळ कधीच एकसारखा नसतो. एक दिवस शेरखान शिकारीला निघाला होता. त्याला एका पिंजर्यात लटकलेले जनावराचे मांस दिसले.

मिसळ अश्यांना 'पावा'यची नाही रे!

लेखक शाली यांनी गुरुवार, 12/04/2018 09:04 या दिवशी प्रकाशित केले.
हॉटेल मध्ये बायकोला घेवून जो मिसळ खायला जातो आणि टेबलवर बसल्यावर "दोन मिसळ" अशी ऑर्डर देतो, सॅंपलला रस्सा म्हणतो, आमच्याकडील लहान पोर सुध्दा सांगेल की हा खरा 'मिसळखाऊ' नाही म्हणून. मिसळ खायची असेल तर चार जिवाभावाचे मित्र आणि 'आपले मिसळचे' हॉटेल असेल तरच खरी गम्मत. मिसळ खायला जावून बसले की दहा-बारा मिनिटात ऑर्डर न देता मिसळच्या प्लेट समोर यायला हव्यात.

Dead Man's Hand - ८

लेखक स्पार्टाकस यांनी गुरुवार, 12/04/2018 08:17 या दिवशी प्रकाशित केले.
रिझवानच्या मृत्यूला पंधरा दिवस उलटले होते.... उत्तर प्रदेशात गेलेले रिझवानचे कुटुंबिय मुंबईत परतल्यावर त्यांनी एकच गोंधळ घातला होता. त्याच्या अंत्यविधीच्या वेळेस त्याच्या नातेवाईकांनी त्याचा मृतदेह बांद्रा पोलीस स्टेशनच्या आवारात आणून ठेवला आणि त्याचा मृत्यू हा आत्महत्या नसून खून आहे आणि पोलीस त्याच्या खुन्याला अटक करत नाहीत तोपर्यंत त्याचं दफन करणार नाही असा पवित्रा घेतला! रिझवान हा आमदार चव्हाणांच्या मुलाचा जवळचा मित्रं असल्याने विरोधी पक्षाच्या स्थानिक नेत्यांनी पोलीस स्टेशनच्या आवारात असलेल्या त्याच्या नातेवाईकांना चिथावण्यास सुरवात केली होती.

रातराणीचे सुगंधी फूल आहे ती!

लेखक सत्यजित... यांनी गुरुवार, 12/04/2018 04:56 या दिवशी प्रकाशित केले.
चांदण्या रात्रीस पडली..'भूल' आहे ती... रातराणीचे सुगंधी फूल आहे ती! वाढत्या पाऱ्यासवे तीही फुलत जाते... मोगऱ्याची मल्मली चाहूल आहे ती!
काव्यरस

माझी अ‍ॅमॅझॉनवर टाकलेली पुस्तके...

लेखक जयंत कुलकर्णी यांनी बुधवार, 11/04/2018 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार ! मी अजून काही पुस्तके अ‍ॅमॅझॉनवर टाकली आहेत त्याच्या लिंक्स खाली देत आहे. या पुस्तकांमधे बर्‍याच जणांनी उत्सुकता दाखवली होती. आता ती घेऊन जरुर वाचावीत. तसेच मराठ्यांची शौर्यगाथा हे पुस्तक मी कमी किंमतीस उपलब्ध केले आहे. १महा-अभियोग : द् ट्रायल मी फ्रॅन्झ काफ्काच्या तीन कथा त्याच्या लिखाणाची ओळख म्हणून येथे टाकल्या होत्या. त्याच्याच एका पुस्तकाचा मी अनुवाद केला आहे. - द् ट्रायल. - महा अभियोग.

गाणे कसे बनते?

लेखक arunjoshi123 यांनी बुधवार, 11/04/2018 11:31 या दिवशी प्रकाशित केले.
केवळ पद्यसंवादच करणारा समाज गोष्टींत ऐकला आहे, पण प्रत्यक्ष कधी होता का माहित नाही. जगात सर्व प्राचीन साहित्य मुख्यतः पद्य स्वरुपात कशामुळं असलं पाहिजे? काही वेद (कि वेदांचा काही भाग?) सोडले तर जवळजवळ सारा इतिहासच पद्य आहे असं वाटतं. समाजाला इतकी कवनप्रियता का असावी? छंदबद्धता आवश्यक असणे हा पद्द्यातिरेक होता का? असो. ------------- कविता आणि गाणे यांच्यात मूलभूत फरक काय? कायद्याची भाषा, सरकारची भाषा, मानवी व्यवहार करणारांची भाषा, सामान्य लोकांची भाषा, आपल्या सुहृदांची भाषा आणि आत्मसंवादाची भाषा हे सुलभीकरण पुढे नेत नेत शेवटी गाणे आणि अंततः कविता बनत असावी.

Dead Man's Hand - ७

लेखक स्पार्टाकस यांनी बुधवार, 11/04/2018 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
बांद्र्याच्या न्यू गार्डन व्ह्यू सोसायटीचा वॉचमन मिथिलेशकुमार भूमिया सोसायटीच्या गेटशेजारी असलेल्या आपल्या चौकीत बसून मोबाईलवर गाणी ऐकण्यात गुंग झाला होता. अठ्ठावीस वर्षांचा मिथिलेश गेल्या दोन वर्षांपासून ही वॉचमनची नोकरी करत होता. सतत येणार्‍या-जाणार्‍या गाड्यांमुळे आणि सोसायटीच्या इतर कामांमुळे दिवसभर धावपळ होत असली तरी नाईट शिफ्टला तसा आरामच होता, त्यामुळे तो नाईटलाच येणं पसंत करत असे. त्याचा जोडीदार असलेल्या बसंतकुमारलाही ते मान्यं होतं, कारण बसंत हा बालबच्चेवाला होता, त्यामुळे सहसा नाईटला तो नाखूश असायचा. गाण्याचा आवाज चिरत आलेल्या कारच्या कर्कश्श् हॉर्नमुळे मिथिलेशची तंद्री भंगली.