Skip to main content

भारतीय न्यायपालिकेची विक्षिप्तता

लेखक arunjoshi123 यांनी शनिवार, 28/04/2018 14:11 या दिवशी प्रकाशित केले.
कदाचित कोणतंच नियंत्रण नसल्यामुळं भारतीय न्यायपालिका रसातळाला गेलेली असू शकते. कदाचित इतर देशांच्या मानाने खूप चांगली असू शकते. कदाचित इतर अन्य संस्थांपेक्षाही बरबटलेली असू शकते. देशात न्याय आहे अशी सर्वसाधारण जनभावना केवळ एक चालत आलेली प्रथा म्हणून जीवंत असावी. तसं न्यायपालिकेच्या बाबतीत "संस्था विथ डिफरन्स" नावाचा काही प्रकार नसावा. मला इथे विक्षिप्त म्हणजे चांगल्या, वाईट, लॉजिकल, इल्लॉजिकल, परस्परविरोधी, आपल्याच अन्य न्यायालयाच्या वा बेंचच्या विरोधी, संविधानविरोधी, देशविरोधी, इ इ घटना अभिप्रेत आहेत.

कविची गाडी

लेखक प्रदीप यांनी शनिवार, 28/04/2018 11:56 या दिवशी प्रकाशित केले.
कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे गाडी माणसांना तुडवते आहे हाडांच्या चिंध्या करते आहे शब्द हवेत फेकते आहे कल्पनांचे भुंगे सोडते आहे कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे 'शब्द बापुडे केवळ वारा' म्हणून गेला एक येडा त्या येड्याला काय ठावी जालाची किमया नाही गावी आता वाराही न दवडावी फुकटात 'काव्ये' प्रसिद्ध व्हावी कवि गाडीत बसून आहे गाडी सुसाट धावते आहे
काव्यरस

अनवट किल्ले ३१: एश्वर्यसंपन्न गाळणा ( Galana )

लेखक दुर्गविहारी यांनी शनिवार, 28/04/2018 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
बहुतेकदा महाराष्ट्रातील किल्ले म्हणले कि पर्यटकांचा नाराजीचा सुर असतो, कि खुप पडझड झाली आहे, बघण्यासारखे काही शिल्लक नाही. वास्तविक या गडकोटांनी अखेरच्या सैनिकापर्यंत दिलेली झुंज हिच यांच्या लढाउपणाची पावती. पण तरीही एखादा सुस्थितीतील तटबंदी असणारा, बुलंद, भक्कम बुरुजांचे कवच बाळगणारा, फारसी, देवनागरी आणि चक्क ईंग्लिश शिलालेख असणारा, तुलनेने चढायला सोपा असणारा असा गड पहायचा असेल तर नाशिक जिल्ह्यातील गाळणा हा किल्ला तुम्हाला पाहिलाच पाहिजे.

हा असा राम की ज्याच्या हजार सीता

लेखक अनन्त्_यात्री यांनी शनिवार, 28/04/2018 09:43 या दिवशी प्रकाशित केले.
मुखवटे त्याचे दिखाऊ, प्रिय तुला प्राणाहुनी मात्र तो अपुलाच चेहेरा बघू न धजतो दर्पणी !   मृगजळाचे भरुनी  पेले पाजले त्याने तुला स्वार्थ अन भोगात त्याचा जीव पुरता गुंतला  प्रेषिताचे पाय कसले? मातीची ती ढेकळे ! पूज्य तो बनतोय केवळ आंधळ्या भक्ती मुळे अजुनी नाही वेळ गेली, सोड त्याची संगत सोड ते हतवीर्य जगणे,  सोड उष्टी पंगत  आतला आवाज सांगे, ऐक मग ते सांगणे "कवडीमोले विकू नको तू लाखमोलाचे जिणे"   ........(स्वयंघोषित बाबा, बापू, महाराज, माताजी यांच्या अंधभक्तांस समर्पित)

सालं, आज जीव कासावीस झालाय

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 27/04/2018 19:32 या दिवशी प्रकाशित केले.
सालं, आज जीव कासावीस झालाय तिकडं अकरा कळ्यांचा विनाकारण बळी गेलाय आज मी पण एक बाप आहे पण खरं सांगू मित्रानो या देशात बाप होणं , श्राप आहे केलं असेल त्यांनीही त्यांच्या मुलांना टाटा बाय बाय त्यांना थोडंच ठाऊक होतं पुढे होणार आहे काय ? त्या माउलींचा तीळतीळ तुटला असेल जीव पण इथे कोणालाच पडली नाही आहे त्याची जाणीव आजूबाजूच्या लोकांनी केली असेल चौकशी आपली मुलं कुठे आणि आहेत कशी ? जो तो आपापलं बघून सांत्वनाला गेला असेल थोडा वेळ रडेल तिथं आणि परत कामाला लागेल त्या मायबापाचे अश्रू असेच ओघळत राहतील बाराव्यानंतरही आणि भरणीलाही पुन्हा कुठे तरी अजून कळ्या खुरडल्या जातील बातम्

मला भेटलेले रुग्ण - १५

लेखक डॉ श्रीहास यांनी शुक्रवार, 27/04/2018 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
http://www.misalpav.com/node/42182 ६ वर्षाची मुलगी घेऊन आला होता , दम्याचा त्रास बराच वाढलाय म्हणून सांगीतलं आणि पुढे काय करायचं हे विचारतांना त्याला निघायची घाई झालेली होती ...... मी इन्हेलर्स कसे वाढवायचे सांगीतले आणि घाई असेल तर सवडीने या म्हणालो .... तर म्हणाला “डाॅक्टर हिच्या आईची डिलीव्हरी आहे आज म्हणून मधल्या सुटीत आलो मी , घरी एकटीच असते ही म्हणून घेऊन आलो....

अनघड शब्दांनो..

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 27/04/2018 09:12 या दिवशी प्रकाशित केले.
स्वप्नवास्तवाच्या हिंदकळत्या सीमेवरून खुणावणार्‍या, जिज्ञासेच्या तेज:पुंज आकाशातून दिपवणार्‍या, अज्ञाताच्या कडेलोट दरीतून उसळणार्‍या, अंतिम सत्याच्या मृगजळातून अथक ठिबकणार्‍या, स्थूलसूक्ष्माच्या अथांग वर्णपटातून विखुरणार्‍या, जडचेतनाच्या जटिल कोड्यातून उलगडणार्‍या, क्षुद्रतेतून बुजबुजणार्‍या, विराटाला वेधणार्‍या, कोलाहलातून गजबजणार्‍या, एकांतातून निनादणार्‍या, माणुसकीतून पाझरणार्‍या, अनावर भोगातून- वीतरागी वैराग्यातून हेलकावणार्‍या, जाणिवेतून- नेणिवेतून धपापणार्‍या, अनघड शब्दांनो... ...वेचून वेगळं करतोय तुम्ही उष्टावलेलं - आयुष्यासाठी तुम्ही कवेत घेतलेलं- कवितेसाठी
काव्यरस

सत्वर

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 26/04/2018 18:04 या दिवशी प्रकाशित केले.
सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा हे अंतर आता पाश म्हणू कि नाश जीवाचा करिल ऐसा तुझ्या रुपाचा तीर्थघटाचा जन्मजान्हवी, श्वास मिटावा नकोच आता वियोग असा कि दो तीरांचे वा हिमालयाचे बंध तोडूनी पाश टाकूनी माझे उरले संचित आता तुझ्या रुपाशी मिळून जावे जिथून आले हासत खेळत तिथेच माझे असणे नसणे... इतकेच होवो पुण्यसलीले, तुझ्या तटाशी भंजन व्हावे भस्मचिता अन् बंधमोक्षही उरू नये ते काही काही.... सत्वर ये तू निघोनी आता निबीड अरण्यी कंटक वाटा.... शिवकन्या

बाई पलंगावर बसून होती

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 26/04/2018 17:16 या दिवशी प्रकाशित केले.
बाई पलंगावर बसून होती गुलाबराव मस्त मळत होते मळता मळता बघत होते बाईकडं गिधाडावानी बाई टाकत व्हती ऊसाश्यावर उसासे कधी येतायत गुलाबराव आणि काढतायत एकदाची पिसे मळता मळता थाप मारली राळ उडालेली नाकात बसली शिंकेवरती शिंक आली शिंकण्यातच सारी रात गेली आवाजाने गावाला जाग आली बाई जाम उखडली वाहून शिव्यांची लाखोली चरफडत चोरपावलांनी निघून गेली रात बी गेली अन बाई बी थापा मारण्यातच वेळ गेली {{{{ सिद्धेश्वर विलास पाटणकर }}}}