Skip to main content

हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश

लेखक milindd1782 यांनी सोमवार, 04/06/2018 16:22 या दिवशी प्रकाशित केले.
हंबीरराव,बहिर्जी आणि बहादूरखान कोकलताश नुकताच राज्याभिषेक सोहळा पडला होता...सहयाद्री आणि रायगड आनंदाच्या वर्षावात न्हाहून गेले...स्वराज्य अवतरले होते...रायगड आता सर्व सहयाद्री आणि किल्ल्याच्या राजा झाला होता...अनेक शूर-वीर योद्धे..देशोदेशीचे वकील..साधू संत...लहान थोर...

कणेकरसाहेब.... तुमनेच हमको बिघडव्या !

लेखक जे.पी.मॉर्गन यांनी सोमवार, 04/06/2018 16:03 या दिवशी प्रकाशित केले.
वो क्या है.... हमारे लहानपणी... जर वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका... वेळ मिळ्या कि पुस्तक वाचनेका. ऐसा. लेकिन... मगर (येस्स्स्स.. दोन्हीही).. उन दिवसोंमें पुस्तकोंमे जरा वरण भात जैसा लिखाण होता था. मला नक्की काय म्हणायचंय ते तुमच्यासारख्या interpretative analytical in-depth reporting करणार्‍या माणसाला एरवीच कळालं असेल. आमचं बालपण - आम्ही टिळक, आगरकर, सावरकर, आंबेडकर, फुले नाही... पण आम्ही पुण्याचे असल्यामुळे आम्ही टोणगेपण किंवा कार्टेपण वगैरे पार करून डायरेक्ट बालपणाला क्वालिफाय होतो. तर आमचं बालपण गेलं पुण्याच्या पेठांमधे. आमचा पुस्तकांचा खुराक म्हणजे पु.लं, द.मा. मिरासदार, भा.रा.

तुला साथ हवीय ना माझी ?

लेखक पथिक यांनी सोमवार, 04/06/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
तुला साथ हवीय ना माझी ? मन पाचोळा होवून पसरलंय रानोमाळ धूळ होऊन विखुरलंय चहुदिशा आण ते गोळा करून... नाही जमत ना ? मग शक्य असेल तर तुही हो सैरभैर मग भेटत जाऊ असेच अचानक कधीतरी अनवट वाटांनी

राजयोग - ८

लेखक रातराणी यांनी सोमवार, 04/06/2018 10:54 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रराय राजाबरोबर घरी परतत होता. आकाशात अजून कुठे कुठे प्रकाश दिसत होता. खालच्या जंगलात मात्र अंधार हळूहळू आपले हातपाय पसरत होता. उंच झाडांच्या फक्त माथ्यावरच उजेड दिसत होता. हळू हळू तेही अंधारात बुडून गेले की सगळं जंगल जणू अंधाराचं पांघरून घेऊन शांत झोपून जाईल. राजा महालाच्या दिशेने न जाता मंदिराच्या दिशेने चालू लागले. संध्याकाळची पूजा-आरती आटोपून, दिवा लावून रघुपती आणि जयसिंह दोघे झोपडीत बसले होते. दोघेही आपआपल्या काळजीत मग्न होते. मिणमिणत्या दिव्याच्या प्रकाशात दोघांच्याही चेहऱ्यावरचा अंधार फक्त दिसत होता. तिथे पोचल्यावर नक्षत्ररायचा रघुपतीकडे पाहण्याचा धीर झाला नाही.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 04/06/2018 07:56 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ४: अबू बकर मुहम्मद इब्न झकारिय्या अल राझी औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ https://www.misalpav.com/node/42703 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक २ https://www.misalpav.com/node/42705 औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ https://www.misalpav.com/node/42744 जसे क्लॉडीअस गॅलेनला टाळता येत नाही तसेच अल राझीला देखील टाळता येत नाही एवढे त्याचे कार्य महान आहे.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: ३

लेखक सुधीर कांदळकर यांनी सोमवार, 04/06/2018 07:17 या दिवशी प्रकाशित केले.
औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १ औषधशास्त्र, औषधे, वैद्यक ३ गेल्या लेखांकात क्लॉड गॅलेन हे नाव अनेक वेळा येऊन गेले. गॅलेनच्या कार्याचा परिचय करून घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही. क्लॉड गॅलेन वा लॅटीनीकृत क्लॉडिअस गॅलेनस. मी लॅटीनमध्ये लिहीत असतो तर सुधीरस कांदळकरस असे नाव लिहिले असते वा संस्कृतमधून लिहीत असतो तर सुधीरम कांदळकरम असे (सु)संस्कृत नाव धारण केले असते.

पूर्वा ( भाग २ ) (सत्यकथेवर आधारित )

लेखक अनाहूत यांनी सोमवार, 04/06/2018 07:13 या दिवशी प्रकाशित केले.
" अगं पूर्वा, ये ग जरा मदत करायला . " राहुलची आई तिला बोलावत होती . " हो येते ना काय करताय ? " - पूर्वा " अगं काय हा पसारा झालाय त्यातून काय करायचा सुचत नाहीये बघ राहुलला लाडू खायची इच्छा झाली होती म्हणून हे सगळं घेऊन आले पण या कामाच्या रगाड्यात काही करायचं होईना . आज जरा वेळ मिळाला तर हा सगळं पसारा झालाय . मी आवरून घेते मग आपण बसुया करायला. " अहो तुम्ही बसा काकू मी आवरते पसारा . " " अगं तुला कुठं हि काम सांगू . " " अहो असू द्या हो मी करते हे . तुम्ही बघा किती दमलाय आणि किती घाम आलाय तुम्हाला . थोडा वेळ बसा तोपर्यंत होईल माझं . " " बर बाई बसते मी .

बाहेरची भानगड

लेखक साहना यांनी सोमवार, 04/06/2018 01:30 या दिवशी प्रकाशित केले.
गोव्यांत External Affairs मिनिस्ट्री ह्या शब्दाचे भाषांतर भायल्या भानगडीचो मंत्री असे केले जाते. विनोद सोडून द्या. मिपा वर हार प्रकारच्या विषयावर लोक धुळवड उडवत असतात. काही दिवस आधी मी एक परिसंवाद ऐकायला गेले होते तिथे एक महिला "affairs expert" म्हणून अली होती आणि तिने त्या विषयावर पुस्तक सुद्धा लिहिले होते. लग्नाचे बंधन नसल्याने ह्या विषयावर माझी माहिती शून्य होती म्हणून मी जास्त माहिती घेण्याचा प्रयत्न केला. त्या संदर्भांत मिपा वरील जाणकार आणि एक्स्पर्ट लोकांसाठी काही प्रश्न . (अर्थानं आमच्या मित्राचे असे झाले हो ... म्हणून सुद्धा तुम्ही ऐकीव गोष्टी इथे चिकटवू शकता) १.

(येकदम) स्मार्ट पुणे

लेखक शेखरमोघे यांनी रविवार, 03/06/2018 21:12 या दिवशी प्रकाशित केले.
कथा आहे सध्या पुण्यांत चालू असलेल्या " Smart City" मोहिमेच्या एका भागाची - शितावरून भाताची परीक्षा होईलच! पुणे (आधीच "स्मार्ट" असले तरी "Smart City" मोहिमेखाली आणखी जास्त) "स्मार्ट" करण्याच्या प्रयत्नातली पहिली/प्रायोगिक पायरी (Pilot Project) म्हणून परिहार चौक, औंध, पुणे याच्या आजूबाजूचा काही भाग/रस्ता "Smart" करणे काही काळ चालू आहे.

वालाची उसळ

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 03/06/2018 20:52 या दिवशी प्रकाशित केले.
. ब-याचश्या गृहिणी कडधान्ये घरातच भिजवतात व त्याला मोड आणतात आमच्या कडे आम्ही दोघेच असल्याने तसे करत नाही मोड आलेली कडधान्ये विकत आणतो उसळी साठी डेक्कन वर डेक्कन पोस्ट ऑफिस आहे त्याला लागून एक गल्ली आहे तिथे एक माउली कडधान्ये विकते दर्जा उत्तम असतो पेरू गेट पोलीस चौकीला लागून एक दुकान आहे त्या तिथे पण एक जण कडधान्ये विकते मूग-मटकी-वाल-मसूर पांढरा व हिरवा वाटाणा अशी सारी कडधान्ये तिथे विक्रीला असतात काल तिच्या कडून बिरड्या (वाल) विकत घेतले ओलंखोबरे कोथिंबीर आलेलसूण हिरव्यामिर्च्यांचे वाटण केले कांदा टोम्याटो