Skip to main content

उर्वरित जीवनसत्वे व लेखमालेचा समारोप

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 06/08/2018 10:40 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत आतापर्यंत आपण ६ जीवनसत्वांचा स्वतंत्र लेखांतून आढावा घेतला. उरलेल्यांपैकी काहींचा धावता आढावा या लेखात घेत आहे. या सर्वांना एका लेखात कोंबले आहे म्हणून त्यांना ‘चिल्लीपिल्ली’ समजू नये ! आरोग्यदृष्ट्या ती सर्वच महत्वाची आहेत. फक्त त्या प्रत्येकावर स्वतंत्र लेख लिहीण्याइतका मजकूर नाही. K जीवनसत्व : जीवनसत्वांची ऐतिहासिक नावे इंग्रजी वर्णमालेनुसार A ते E अशी दिलेली होती. जेव्हा या नव्या जीवनसत्वाचा शोध लागला, तेव्हा वर्णमालेचा क्रम बिघडवून संशोधकांनी एकदम Kवर का उडी मारली असावी याचे वाचकांस कुतूहल वाटेल.

लहानपणाची आठवण

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 06/08/2018 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
पावसाळी ढग आकाशात होते. समोर जॉगींग ट्रॅक आणि मधले खेळाचे मैदान होते. आज कुणीच खेळत नसल्याने मोकळे होते ते. त्या शांत वातावरणात मी भरभरून मोकळा श्वास घेतला. शहरातल्या त्या जॉगींग ट्रॅकवर पावसाळ्यामुळे गर्दी बरीच कमी होती. एका कोप-यात बसलो. लहान मुलं खेळत होती. काही व्यक्ती चालत होत्या. काहीपावसाळ्यामुळे, ग्रीन जीम करत होत्या. मी पावसाळ्यात तयार झालेल्या हिरव्यागार गवताच्या काठावर बसलो होतो. समोर असणारे रानटी गवत पाहून मला माझ्या लहाणपणाचे दिवस आठवले. सहावी सातवीत असेन तेव्हा. आमच्या घराच्या पुढच्या गल्लीत तालूक्याचे न्यायालय होते. तेथे मोठे मोकळे आवार होते.

फेस्टिव्हल डायरीज..!! - कथा : ७

लेखक रा.म.पाटील यांनी सोमवार, 06/08/2018 00:02 या दिवशी प्रकाशित केले.
फेस्टिव्हल डायरीज..!! (Decorate your love..) कथा - ७ वारी.. प्रेमाचे रिंगण.. ती बावरली होती.. तिच्यासाठी हा अनुभव नवाच होता शहरात.. पण तोच तिला तो दिसला आणि तिला बरे वाटले.. पुढे तो एकटाच चालत होता.. हा आपल्या ऑफिसमधला तर नाही ना.. ती विचार करतच होती की हाक तरी कशी मारायची.. तोच त्याने मागे वळून पाहिले.. तो तोच होता ह्याची तीला खात्री पटली.. तोही तिच्याकडे पाहून हसला.. चला कोणीतरी सोबतीला भेटले नाहीतरी एवढं अंतर चालणे तेही एकट्याने.. तिला जीवावरच आले होते..

फूटपट्टी

लेखक चाणक्य यांनी रविवार, 05/08/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्याकडे ना भेंचोद एक फूटपट्टी आहे कायम असते माझ्या सोबत.. विशेषतः चार लोकात जायचं असेल तर, न विसरता घेतो मी तिला. . . माझ्या फूटपट्टीने अनेक गोष्टी मोजू शकतो मी उदाहरणार्थ, समोरच्याची लायकी... त्याची अक्कल... त्याची दांभिकता... त्याची एकूणच समज... वगैरे वगैरे. . . फूटपट्टीचा अजून एक उपयोग म्हणजे, मला माझ्या रेषेशेजारी दुस-याची लहान रेष काढता येते बरोब्बर ......बरं असतं ते. . . कधी कधी माझी फूटपट्टी तोकडी वाटू लागते मला पण डगमगत नाही मी माझ्याकडे असणा-या अनेक चष्म्यांपैकी एखाद्यातून बघत राहतो मी माझ्या फूटपट्टीकडे ....ती मोठी वाटेपर्यंत . . गरज नसते तेव्हा फूटपट्टी पाठीच्या कण्याला बांधून ठेव
काव्यरस

काळी मांजर

लेखक जयंत कुलकर्णी यांनी रविवार, 05/08/2018 16:28 या दिवशी प्रकाशित केले.
Simple, Free Image and File Hosting at MediaFire

काळी मांजर

मी आता जे लिहिणार आहे ते थोडेसे खाजगी स्वरुपाचे आहे आणि तुम्ही त्यावर विश्वास ठेवावा असा माझा बिलकूल आग्रह नाही. आता मी ज्याचा पुरावा देऊ शकत नाही त्या गोष्टीवर तुम्ही विश्वास ठेवावा असे मी तरी कुठल्या तोंडाने म्हणणार ? आणि समजा म्हटले तर तुम्ही मला वेड्यात काढणार नाही का ? पण मी वेडा नाही आणि स्वप्नेही पाहात नाही.

आरशाला एक पत्र !

लेखक फिझा यांनी रविवार, 05/08/2018 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
आरशाला एक पत्र ! ( आज तुला गेलेला तडा पाहताना , तू विखुरण्याच्या आधी , एवढंच सांगावंसं वाटतं ! ) नेहमीच का सगळ्यांनी माझ्या आधी निघून जायचं ? आज तू तरी थांब, आणि मी आधी जाते..... म्हणजे कधीतरी असं होईल कि कुणाच्यातरी आयुष्यातून, ‘मी’ आधी निघून गेले ! रोज सकाळी तीच स्वप्ने घेऊन तुला पाहताना स्वतःचे प्रतिबिंब पाहून तुझ्यावरच हसतांना , तूझ्या मध्ये दिसलेले पाणीदार डोळे पुसतांना मी स्वतःला शोधत आहे कि अजून कुणाला तुला हे कळत असेल सगळं ... म्हणून जरा थांब !

दोसतार - १५

लेखक विजुभाऊ यांनी रविवार, 05/08/2018 05:02 या दिवशी प्रकाशित केले.
मागील दुवा https://www.misalpav.com/node/42996
आम्ही भूगोल आणि नागरीक शास्त्र एक करत समुद्राला उधाणाची भरती आणि ओहोटी येताना लोकप्रतिनीधींची कामे वाचून हसू लागलो. मराठी आणि भौतीक शास्त्रातील न्युटनचा गतीविषयक तिसरा नियम क्रीया आणि प्रतिक्रीया या नेहमीच समान परंतु एकमेकंच्या विरुद्ध दिशेने घडतात. तुका म्हणे ऐशा नरा मोजोनी माराव्या पैजारा. हे वाचत राहीलो. मधली सुट्टी संपून नव्या तासाचे सर वर्गावर आले तरीही आमचे वाचन चालूच राहीले.
पुस्तकं उपलब्ध नसणं याचा दोनतीन दिवसातच सगळ्यांना कंटाळा आला.

रानभाजी महोत्सव2018

लेखक त्रिवेणी यांनी शनिवार, 04/08/2018 11:33 या दिवशी प्रकाशित केले.
एका धाग्यावर श्रीमंत पेशवे यांनी विचारणा केलीय म्हणून इकडे वेगळा धागा काढला आहे. रानभाजी ४ थे वर्ष चिंब पाऊस अल्लड वारा, धुंद हवा मृदगंध नवा l रानातुनी बहरे रानमेवा, तयाचा मज आस्वाद हवा ll या वर्णनासारखे अगदी नितांत सुंदर, श्यामल आणि पावसाळी व सर्वात महत्वाचे म्हणजे प्रदूषण मुक्त अस्सल नैसर्गिक वातावरण आपल्या आदिवासी गावात दर पावसाळ्यात असते. या अशा गावात गेली ३ वर्षे जनजाती कल्याण आश्रमातर्फे, आदिवासी समाजातील आपल्या बंधू/भगिनींसाठी ""रानभाजी महोत्सव"" अशी एक नाविन्यपूर्ण स्पर्धा घेतली जाते. आपल्याला माहीतही नाहीत अशा काही उत्तम पालेभाज्या या भागात श्रावण मासात उगवतात.

आज जडी-बूटी दिवस

लेखक विवेकपटाईत यांनी शनिवार, 04/08/2018 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
वर्षाऋतुत आकाशातून अमृत धारा बरसतात. धरतीच्या कोखातून जीवनदायनी वनस्पती प्रगट होतात. भारतात १८,००० च्या वर औषधी वनस्पती आहेत. पण दुर्भाग्य या घटकेला फक्त ११०० वनस्पतींचा उपयोग आयुर्वैदिक औषधीत वापर होतो. याचा विपरीत चीन मध्ये तिथल्या १३००० वनस्पतींचा उपयोग चीनी हर्बल मेडीसीन मध्ये होतो. आज आयुर्वैदिक औषधींना जागतिक मान्यता नाही. कारण आधुनिक विज्ञानाच्या कसौटीवर औषधी वनस्पतींना पारखण्याचा प्रयत्न झाला नाही. जास्तीस्जास्त फूड सप्लीमेंट रुपात आयुर्वेदिक औषधी निर्यात होतात. देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर हि आयुर्वेदावर अनुसंधानचे कार्य फारच कमी झाले.

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 04/08/2018 08:06 या दिवशी प्रकाशित केले.
पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग २ मागील भागात आपण बिस्मार्कच जर्मनीत उदय (म्हणजे तेव्हाचा प्रशिया) आणि त्याचे जर्मन एकीकरणाच्या दृष्टीने सुरु असलेले प्रयत्न इथपर्यंत आलो होतो.