मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

फूटपट्टी

चाणक्य · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
काव्यरस
माझ्याकडे ना भेंचोद एक फूटपट्टी आहे कायम असते माझ्या सोबत.. विशेषतः चार लोकात जायचं असेल तर, न विसरता घेतो मी तिला. . . माझ्या फूटपट्टीने अनेक गोष्टी मोजू शकतो मी उदाहरणार्थ, समोरच्याची लायकी... त्याची अक्कल... त्याची दांभिकता... त्याची एकूणच समज... वगैरे वगैरे. . . फूटपट्टीचा अजून एक उपयोग म्हणजे, मला माझ्या रेषेशेजारी दुस-याची लहान रेष काढता येते बरोब्बर ......बरं असतं ते. . . कधी कधी माझी फूटपट्टी तोकडी वाटू लागते मला पण डगमगत नाही मी माझ्याकडे असणा-या अनेक चष्म्यांपैकी एखाद्यातून बघत राहतो मी माझ्या फूटपट्टीकडे ....ती मोठी वाटेपर्यंत . . गरज नसते तेव्हा फूटपट्टी पाठीच्या कण्याला बांधून ठेवतो मी त्यामुळे होतं काय, की समोरासमोर दिसत नाही ती कुणाला आणि माझा कणाही राहू शकतो ताठ . . . फूटपट्टी अमर रहे

वाचने 5526 वाचनखूण प्रतिक्रिया 17

खिलजि 06/08/2018 - 19:47
आज शिणलों असलो जरी बघुनी तुझी नववारी पुन्हा उठली शिरशिरी ठेवला बासनात बांधून तो च्यवनप्राश नि मुसळी फेकून दिली काठी हातातली नि कवळी तो आधीच उठलेला पण मी उठता उठता पडलो पडल्यावर दिसली साक्षात छोटी फुटपट्टी लावली पाठीला , ताठ केला आधी कणा नि मारला सूर पुन्हा यौवनात यौवनाफुटपट्टी अमर रहे

नाखु 08/08/2018 - 21:06
कविता आवडलीच आहे खरडपट्टी ते रखडपट्टी मधला नाखु पांढरपेशा