Skip to main content

मिस शलाका B.A.

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 28/11/2018 08:22 या दिवशी प्रकाशित केले.
"शलाका!" बसस्टॉपवर काकांनी एका पाठमोर्‍या मुलीला हाक मारली. त्या मुलीनं मागे वळून पाहिलं. "देशपांडे काका! काय म्हणताय? बर्‍याच दिवसांनी गाठ पडली." "हो.हल्ली फारसं येणं होत नाही इकडे!" "हो.बाबा बोलले मला.काळजी घ्या बरं तब्येतीची!" "हो तर घ्यायलाच पाहिजे.तुझ्या लग्नात हिंडता फिरता यायला हवं मला.काका हसत हसत म्हणाले." "लग्न!" शलाकाच्या कपाळावर आठ्या! का गं? काय झालं? "नै काही नाही!" "अगं योग्य वयात लग्न झालेलं चांगलं" "हो काका पण मनासारखं स्थळ तरी यायला पाहिजे ना?" "कसं स्थळ हवंय तुला?

वैद्यकातील प्रभावी नोबेल-विजेते संशोधन : भाग ७

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 27/11/2018 19:41 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखमालेत १९०१च्या पुरस्कारापासून सुरवात करून आपण २०व्या शतकाच्या अखेरच्या दशकात आलो आहोत. आता १९९०च्या पुरस्काराची माहिती घेऊ. विजेते संशोधक : जोसेफ मरे आणि डोनाल थॉमस देश : अमेरिका (दोघेही) संशोधकांचा पेशा : मरे (सुघटन शल्यचिकित्सा), थॉमस (औषधवैद्यक) संशोधन विषय : इंद्रिय व पेशींच्या प्रत्यारोपणाचे उपचार आपल्या शरीरात अनेक महत्वाची इंद्रिये आहेत – जसे की हृदय, फुफ्फुस, यकृत, मूत्रपिंड इत्यादी. अनेक प्रकारच्या आजारांत त्यांच्यावर विपरीत परिणाम होतो. परिणामी त्यांचे कार्य ढासळते.

लाड

लेखक वन यांनी मंगळवार, 27/11/2018 09:42 या दिवशी प्रकाशित केले.
गुबगुबीत बाळाचा पहिला वाढदिवस वाटतोय अगदी प्रदर्शनीय उत्सवच चिमण्या नजरेने टिपलेली लठ्ठ श्रीमंती देतीय भविष्यातील ऐश्वर्याची हमी पुढच्या टप्प्यात दिसतंय सुखासीन बालपण मागेल ते मिळतंय कारण कमी नाही धन बागडणाऱ्या गोंडसाचा काढून टाकलेला लगाम खुणावतोय की व्हायचे नाहीच कधी गुलाम धोधो ओतलेल्या पैशातून अंकुरलेले शिक्षण कमीच पडतंय की लावायला चांगले वळण केलेल्या गुंतवणुकीतून हवी असलेली वसुली शोधाया लावतेय कोणा सावजाची टुमदार हवेली गडगंज विपुलतेतून अंगात आलेला माज करू नाही शकत बौद्धिक दुबळेपणावर मात आणि अखेर प्रश्न पडतो मनाच्या कवाडात की खरंच करायला हवेत का नको इतके लाड ? ...............
काव्यरस

मी घेतली यॉट

लेखक पाषाणभेद यांनी मंगळवार, 27/11/2018 08:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी घेतली यॉट ढिसक्लेमरः केवळ हलके घेण्यासाठी. कुणाही व्यक्ती, शक्ती, राजकीय पक्ष-पुढारी, मुळशी पॅटर्न, वाढदिवस बॅनरवाले यांचा उपमर्द करण्याचा हेतू नाही. मी तर घेतली बाबा यॉट फेरारी पेक्षा फार मोठ्ठा तिचा थाट मी तर घेतली ब्वॉ यॉट || धृ || नकोच कसले रस्ते आता धुळभरी ट्रॅफीकचे अन नकोच ते लफडे आता पार्कींगसाठीचे मध्यमवर्गीयाला सांगतो त्याला आहे माझ्याशी गाठ ||१|| इंग्लीश मेडीअम मधला मी कॉन्व्हेंट एज्यूकेटेड मराठी हिंदी धेडगुजरी भाषा म्हणजे कटकट मराठी शाळेची मुले म्हणजे आहेत नुसतीच माठ ||२|| आय.आय.टी., आय.आय.एम.
काव्यरस

मी आज अनुभवलेला 'ठग ऑफ हिंदुस्थान'

लेखक कलम यांनी सोमवार, 26/11/2018 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
माझं ऑफिस घरापासून २० किमी वर आहे आणि तिथपर्यंत पोहोचायला स्कूटर वरून ४५ मिनिटं लागतात. तर आज सोमवार असल्यानं अगदी जीवावर येऊन उठून, आवरून सकाळी ऑफिसला माझ्या स्कूटर वरून येत होते.ऑफसच्या रस्त्यावर एक सिग्नल लागतो आणि तो पार केला तर जवळपास ५ किमी पर्यंत जंगलासारखा एअर फोर्स चा भाग आहे जिथं आजूबाजूला काहीच नाही. तर त्या सिग्नल वरून १ कमी पुढं पर्यंत पोचले असताना दोन माणसं त्यांच्या दुचाकीवरून आली आणि माझ्या स्कूटर च्या मागच्या चाकाकडं खुणा करून काहीतरी सांगू लागली.

खिला-रे एग्ज कॅफे, पुणे ... एक रिव्यू

लेखक उपेक्षित यांनी सोमवार, 26/11/2018 12:36 या दिवशी प्रकाशित केले.
खूप दिवस झाले अंडा भुर्जी खावीशी वाटत होती किंवा अस म्हणा अंड खूप दिवसा पासून खाल्ल नव्हत अर्थात घरी आपण करतोच पण बाहेरची चव ही काहीतरी वेगळीच असते.... मग विचार केला की आता जावं कुठ.. आणि त्यात आपल्या पुण्यात खास फॅमिली ला घेऊन जावं असं फक्त एग च कुठल हॉटेल किंवा कॅफे नाहीये रादर कमी आहेत म्हटलं इट आऊट वर जाऊन विचारावं की चांगली भुर्जी कुठे मिळेल.. बघतो तर काय इट आऊट वरच खिला-रे एग कॅफे ची पोस्ट दिसली.. जहा चाह वहा राह झाल तर मग खाली पत्ता दिला होताच जवळच कर्नाटक हायस्कूल पाशीचा पत्ता होता आणि पोस्ट वाचून वाटलं की हा गडी पण खवैया असेल.. पत्ता शोधत शोधत गेलो...

उत्कृष्ट खाद्यपदार्थ विका आणि कमवा

लेखक आपला निखिल यांनी सोमवार, 26/11/2018 11:27 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पैकी बरेच बंधू, भगिनी उत्कृष्ट खाद्यपदार्थ घरात तयार करतात, एकमेकान सोबत शेअर करतात जसे आपण मिपा वर शेअर करतो. परंतु हेच घरात तयार केलेले खाद्यपदार्थ जर विकून काही पैसे कमावता आले तर उत्तमच. हाच विचार घेऊन आम्ही एक मोबाइल आप्लिकेशन तयार केले आहे ज्याचे नाव आहे "MAKE AT HOME" ह्या अँप्लिकेशन द्वारे तुम्ही आपले घरात तयार केलेल्या उत्कृष्ट खाद्यपदार्थांची खरेदी तसेच विक्री करू शकता. हे अँप्लिकेशन फक्त खाद्यपदार्थां पुरतेच मर्यादीत नसून तुम्ही घरात तयार केलेल्या कोणत्याही गोष्टीनची खरेदी तसेच विक्री करू शकता.

अवघे धरू सुपंथ...

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 26/11/2018 11:11 या दिवशी प्रकाशित केले.
काल मला माझ्या मित्राचा हा मेसेज आला. कोणत्याही आजाराने त्रस्त असलेल्या मुलांची मनोवस्था काय असेल याची कल्पना करणे शक्य नाही, पण तिच्या काळजीने पालकांची अवस्था काय होते, याची मात्र या मेसेजवरून कल्पना येऊ शकते. एका विचित्र आजाराने या मित्राची मुलगी गेल्या काही महिन्यांपासून आजारी आहे. तिच्यावर उपचार करून तिला लवकरात लवकर या आजारातून बाहेर करण्यासाठी कितीही कष्ट घेण्याची या मित्राची तयारी आहे. जगाच्या पाठीवर कुठेही या आजारावरील उपचार करण्यासाठी तिला घेऊन जाण्याचीही त्याची तयारी आहे, असे त्याने मला सांगितले, आणि मला या धाग्याची आठवण झाली.

आकाशातील भुते

लेखक हेमंत ववले यांनी रविवार, 25/11/2018 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
भुत प्रेत ही कल्पना, फक्त भारतातच नव्हे तर अगदी (आपण ज्यांना पुढारलेले म्हणतो अशा) पाश्चात्य देशांमध्ये देखील होती किंबहुना आज देखील आहे. म्हणुनच वेगवेगळ्या टीव्ही चॅनेल्स वर घोस्ट हंटर्स सारखे रीयॅलिटी कार्यक्रम दाखवले जातात आणि करोडोंच्या संख्येने लोक हे कार्यक्रम आवडीने पाहतात देखील. आणि आपल्याकडील काही तथाकथित पुढारलेले लोक अंधश्रध्दा निर्मुलनाच्या नावावर भारताला आणि भारतातील चालीरीतींना ढिगभर शिव्या शाप देऊन मोकळे होतात. माझ्या लेखांमध्ये मी कधीही अंधश्रध्दांचे समर्थन करीत नाही, करणार देखील नाही.

अरण्यबंध -छापील प्रत

लेखक नूतन यांनी रविवार, 25/11/2018 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या पहिल्या ई पुस्तकासाठी केलेल्या अभिनंदन आणि शुभेच्छां साठी आभार. 'गतीशील' यांच्याप्रमाणे आणि माझ्या काही परिचितांनी केलेल्या मागणीमुळे मर्यादित संख्येत छापील प्रती काढण्याचे ठरवले आहे. छापील प्रत हवी असल्यास मला व्य नि ने कळविल्यास प्रतींची संख्या ठरवता येईल. तसेच प्रत आपल्यापर्यंत कशी पोहचेल हेही बघता येईल. मिपावरील आधीचा दुवा खाली देत आहे. https://www.misalpav.com/node/43651