Skip to main content

कादर खानः कलाकार नंबरी, लेखक दस नंबरी!

लेखक फारएन्ड यांनी गुरुवार, 03/01/2019 18:58 या दिवशी प्रकाशित केले.
हा माणूस गेली अनेक वर्षे हिंदी चित्रपटातून वेगवेगळ्या रूपांत आपल्याला भेटत होता. "बाप नंबरी बेटा दस नंबरी" तर आम्ही केवळ याच्या आणि शक्ती कपूरच्या केमिस्ट्रीकरता पाहिला होता. त्यातले ते फ्रॉड वाले २-३ सीन्स अत्यंत धमाल आहेत. माझे ऑल टाइम स्ट्रेसबस्टर्स! गोट्या पोट्या मॅनपॉवर एजन्सी नट बोल्ट सोडा बॉटल ओपनरवाला जाली नोट छापनेकी मशीन हे तिन्ही सीन्स मी असंख्य वेळा पाहिले आहेत.

बालक-पालकः एक चिंतन...

लेखक समीरसूर यांनी गुरुवार, 03/01/2019 17:04 या दिवशी प्रकाशित केले.
मुलांच्या समस्यांविषयी काही चर्चा सध्या इथे चालू आहेत. त्या अनुषंगाने काही अनुभव, निरीक्षणे मांडण्यासाठी हा लेख लिहावासा वाटला. आम्हाला लग्नानंतर जवळपास बारा वर्षांनी मूल झाले. आमच्या (मी आणि बायको) वयाच्या अनुक्रमे चाळीस आणि छत्तीसाव्या वर्षी आम्ही आई-वडील झालो. बाळ घाई-घाईने सातव्याच महिन्यात या जगात आले; त्यामुळे ते दीड महिने अतिदक्षता विभागात होते. त्याआधी मी बर्‍याच मुलांचे, त्यांच्या आई-वडीलांचे निरीक्षण केले. मला हे निरीक्षण आवडायचे. अजूनही हे निरीक्षण चालूच असते. खूप गोष्टी खटकायच्या आणि खटकतात पण सांगणार कुणाला आणि कसे?

(तनुने नानास मी टू म्हणणे )

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी गुरुवार, 03/01/2019 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
पेरणा अर्थात तनुने नानास मी टू म्हणणे रसिकांच्या मनी अदम्य लवथव पडद्यावरचे विश्व विभ्रमी कल्पिताहुनीही अद्भुत वास्तव नटसम्राटासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती मिडीयाची लाईक डीस्लाईक मोजुनी थकती व्हॉटसाप ट्विटरच्या थिट्या मिती हलकट स्पर्शी फोडा मुस्काट जागेवराती लंपटाचे मौन रहाणे अनेक वर्षे विणती जाळे संशयाचे पैजारबुवा,

जनुक जिन्याची सर्पिल वळणे

लेखक अनन्त्_यात्री यांनी गुरुवार, 03/01/2019 12:11 या दिवशी प्रकाशित केले.
जनुक जिन्याची सर्पिल वळणे अणुगर्भातिल अदम्य लवथव सूक्ष्माच्या प्रत्येक विभ्रमीे कल्पिताहुनी अद्भुत वास्तव अथांगासही क्षुद्र ठरविते असीम व्याप्ती विश्वाची प्रकाशवर्षे मोजुनी थकती स्थलकालाच्या थिट्या मिती शून्यस्पर्शी अन् अपार- व्यापक ताणे-बाणे गहनाचे तरल तलम सूक्ष्माचे तंतू विणती वस्त्र विराटाचे
काव्यरस

मुंबईचे धडे - ३

लेखक मालविका यांनी गुरुवार, 03/01/2019 07:52 या दिवशी प्रकाशित केले.
मी ठाण्याला राहत होते. माझी आत्या पार्ल्याला राहायची. तिच्याकडे तिची जाऊ दीर एकत्र राहायचे.त्यामुळे आत्याची दोन शिवाय जावेची दोन अशी ४ साधारण माझ्याच वयाची मुलं तिच्याकडे होती. त्यात माझा कोकणातला चुलत भाऊ नोकरीसाठी तिच्याकडे येऊन राहिलेला. त्यामुळे तिकडे मजा यायची. वेळ मजेत जायचा. म्ह्णून मला तिकडे राहायला जायला खूप आवडायचं. पण लोकलने फक्त विद्याविहारला जायची सवय होती. दुसरीकडे कधी गेले नव्हते. अशीच एकदा शनिवार रविवार क्लासला सुट्टी मिळाली म्हणून आत्याकडे जायची जाम इच्छा झाली. पण जाणार कसं? आत्याला फोन केला कि यायचंय पण कशी येऊ? तिने सोप्पा उपाय सांगितला.

शवविच्छेदन...... भाग - ४

लेखक जयंत कुलकर्णी यांनी गुरुवार, 03/01/2019 06:59 या दिवशी प्रकाशित केले.
शवविच्छेदन...... भाग - १ शवविच्छेदन...... भाग - २ शवविच्छेदन...... भाग - ३ ....जी साठ वर्षाची म्हातारी मेली होती ती एका बाटलेल्या जमिनदाराची बायको होती. अर्थात त्या गावातील जमिनदाराची ! म्हणजे फार काही श्रीमंत नव्हती पण ते कुटुंब खाऊनपिऊन सुखी होते. घरी गाई म्हशी होत्या आणि ती शरीराने चांगली सुदृढ होती. तिने आयुष्यभर विजापूरला जाऊन गोलघुमट पाहण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते पण तेही तिला शक्य झाले नव्हते.

Sbi क्रेडिट कार्ड वापर

लेखक डोके.डी.डी. यांनी बुधवार, 02/01/2019 18:57 या दिवशी प्रकाशित केले.
सर्व मिपा सदस्यांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा. डिसेंम्बर 2018 मध्ये मी HDFC व sbi या दोन्ही बँकेत माझे बचत खाते आहे . या दोन्ही बँकेत क्रेडिट कार्ड साठी अर्ज दिले होते. त्यातील sbi चे सिम्पली सेव्ह हे क्रेडिट कार्ड मला काल मिळाले. मी क्रेडिट कार्ड पहिल्यांदाच वापरणार आहे तरी नेमके कोठे वापर करावा , कोठे वापरू नये, आणि त्याचा जास्तीत जास्त फायदेशीर वापर कसा करता येईल याविषयी जर आपल्या सूचना आणि अनुभव असतील तर नक्की द्या. धन्यवाद!!!

सकाळी सकाळी

लेखक प्रमोद पानसे यांनी बुधवार, 02/01/2019 12:28 या दिवशी प्रकाशित केले.
ग्लोबल इंटरनॕशनल स्कुलच्या प्री प्रायमरी सेक्शनच्या गेटवर आज एक नाट्य बघायला मिळालं.मी नेहमी सकाळी कामाला जाताना धवल मधे चहा प्यायला थांबतो .आजही चहा घेत असताना.समोर एक गाडी थांबली.आतुन एक पारोसा झोपाळलेला ,केस विस्कटलेला बाबा त्याचं गोंडस पिल्लु घेउन बाहेर पडला.गुबगुबीत जर्कीनच्या आतलं तेवढंच गोंडस गोरंगोरं बाहुलं बापाच्या गळ्याला मिठी मारुन बसलं होतं.एका खांद्यावर त्या बाहुल्याचं शिक्षण बांधलेली धोपटी आणी दुसर्या खांद्यावर बाहुली असा लवाजमा घेत कसंबसं गाडीचं दार लावुन आणी बाहुल्याची पप्पी घेत गप्पागोष्टी करत बाप शाळेच्या गेटकडे पोहचला.गेटवरच्या वॉचमन कडे सॕक देत बापाने लेकराला खाली उतरवले.चि

आरंभशूर

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 02/01/2019 10:42 या दिवशी प्रकाशित केले.
``तूच ठरवतेस, आज व्यायाम सुरू करायचा. आज डायरी लिहायला सुरुवात करायची, आजपासून कामात जास्त लक्ष द्यायचं, टाइमपास करायचा नाही, सोशल मीडिया कमी वापरायचं, व्हर्च्युअल जगात जास्त वावरायचं नाही, सकाळी लवकर उठायचं, माती नि मसणं करायचं!`` ``मग?`` ``मग` काय `मग`? तू मागचापुढचा विचार न करता संकल्पांना होकार देऊन टाकतेस आणि आम्हाला ते पाळत बसावे लागतात ना!``