Skip to main content

[शशक' १९] - दखल

लेखक शब्दसखी यांनी मंगळवार, 19/02/2019 11:47 या दिवशी प्रकाशित केले.
तो जितक्या वेळा समोरून जाईल तितक्या वेळा अपेक्षेने त्याच्याकडे बघणारी ती. ओळख वाढवण्यासाठी कळेल ना कळेल असा प्रयत्न करणारी. जगातल्या घडामोडींची काडीचीही फिकीर न करता कायम स्वतःमध्ये रमलेला तो. तरीही प्रत्येक वेळी आज काहीतरी प्रगती होईल अशी आशा करत राहणारी ती. पण आजचा दिवस बहुतेक वेगळा असावा. आजसुद्धा आधी त्याने डोळ्याच्या कोपऱ्यातून बघून तिच्याकडे दुर्लक्षच केलं. पण मग एका क्षणी हळूच त्याने तिच्या नजरेला नजर दिली. काही सेकंदांसाठी त्याच्या नजरेत ओळख दिसली. ती मिटलीसुद्धा लगेच.

असे षंढ आम्ही कैसे निपजलो

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी मंगळवार, 19/02/2019 09:18 या दिवशी प्रकाशित केले.
आज शिवजयंतीच्या निमित्ताने शिवरायांच्या चरणी मी हे काव्य विनम्र भावाने अर्पण करतो... पुलवामा निषेधे कॅन्डल लावून आलो | “उरी” पाहताना, “जय हिंद” म्हणालो || पण, बलोपासनेची, महती विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || सायंकाळी हवी आम्हा दारूची बाटली | संडे टू संडे खातो मटणाची ताटली || पोहणे धावणे नव्हे, चालाणेही विसरलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || स्वराज्य गुढी रोविली, शिवबाने | स्फुलिंग जे चेतले, जिजाउने || स्मार्टफोन लेकरांच्या, हाती देऊन बसलो | असे षंढ आम्ही कैसे निपजलो || ज्ञानातुकयाची, शिकवणी व्यर्थ गेली | स्वार्थाने आमुची, मती अंध केली || आम्ही बाजीरावाची, जात शोधित बसलो | असे षंढ आ
काव्यरस

श.श.क. झडप

लेखक सत्य धर्म यांनी सोमवार, 18/02/2019 21:33 या दिवशी प्रकाशित केले.
मनात विचारांचे काहूर घेऊन ती रानातून वाट काढत वस्तीवरच्या घरी चालली होती. महिना झाला तरी गण्या तीचा पिच्छा काही सोडत नव्हता, त्यामुळे घरातून बाहेर निघणं तिच्या जीवावर येत होतं. एकुलती एक मुलगी शिकावी या बापाच्या एका इच्छेसाठी सर्व भीती वाऱ्यावर सोडून ती कॉलेजला जात होती. आज गावात "बेटी बचाओ बेटी पढाओ" कार्यक्रमासाठी तालुक्याची माणसे आली होती पुरा गाव तिथंच जमला होता. स्त्री चळवळीने जोर धरला होता. सरपंचाचे भाषण ऐकतच ती चालली होती. बामनाच्या मळ्यापाशी दबा धरून बसलेला तो एका झडपेत समोर आला आनी तिला उसात घेऊन गेला " बेटी बचाओ बेटी पढाओ" च्या जयघोषात एक किंकाळी हवेत विरून गेली.

संथ वाहते...

लेखक पिवळा डांबिस यांनी सोमवार, 18/02/2019 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
"संथ वाहते, कृष्णामाई..." कृष्णातीरावरील एक संथ पहाट... सूर्योदयापूर्वी सांगलीचे सर्वेसर्वा आपल्या दैनंदिन मॉर्निंग वॉकसाठी कृष्णातीरावर निघालेले... त्यांच्यापाठोपाठ त्यांचे चार-पाच प्रशंसक... पहाटेचा फेरफटका, आन्हिकं आणि देवपूजा उरकायच्या आत काहीही न खाण्यापिण्याचा सर्वेसर्वांचा कित्येक वर्षांचा दंडक.... चालताचालता सर्वेसर्वा काही 'गोष्टी सांगेन युक्तीच्या चार' करताहेत आणि प्रशंसक त्यावर दुजोरा भरताहेत... नदीकिनार्‍याशेजारीच सांगली एमायडीसीचे नवीन प्लॉटस आखलेले, सर्वेसर्वांचाच नवा उपक्रम, सांगलीत नवे उद्योग उभारण्यासाठी... पाडलेले प्लॉट्स बहुतांशी अजून मोकळेच, क्वचित कुठे एखादी शेड उभारलेली.

पूर्व आफ्रिका भटकंती - इथियोपिया लाईव्ह ब्लॉग

लेखक समर्पक यांनी सोमवार, 18/02/2019 09:42 या दिवशी प्रकाशित केले.

माझ्या पूर्व आफ्रिकेतील भटकंतीचा त्यावेळी लाईव्ह प्रकाशित केलेला वृत्तांत. मुख्यतः इथियोपिया देशांतील प्रवास पण दक्षिणेत सीमेवरील आदिवासी भागांत केनिया व दक्षिण सुदान प्रांतातही फेरफटका मारला. अफगाणिस्तानभेटीप्रमाणेच लाईव्ह ब्लॉगिंग चा हेतू जोखमीच्या भागातून भटकताना आवश्यक ती माहिती काही लोकांसाठी प्रकाशित करत राहणे व बाकी वाचकांनाही आडवाटेवरच्या भटकंतीची एक व्हर्चुअल सफर. तसा आफ्रिकेतील हा दुसरा प्रवास, गेल्या वेळी फ्रेंच भाषिक पश्चिम आफ्रिकेत भटकंती झाली त्यात आफ्रिकेची तोंडओळख झाली, आता यावेळेस कैक पटींनी कठीण व दुर्गम भागातून प्रवास...

दुबई फिरण्यासाठी -- मार्च महिना

लेखक रिग पिग यांनी सोमवार, 18/02/2019 02:15 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मार्चच्या 3ऱ्या आठवड्यात सहकुटुंब दुबई फिरण्याचा विचार आहे. भेट देण्याची मुख्य स्थळे, १. लेगो लॅण्ड (રૂपार्क / ३ दिवस) २. डेझर्ट सफारी (१ रात्र) ३. डॉल्फिन मत्स्यालय / स्की दुबई ४.

अवकाश स्पर्धा (अमेरिकन बाजू) -भाग १

लेखक सतिश म्हेत्रे यांनी रविवार, 17/02/2019 23:14 या दिवशी प्रकाशित केले.
टीप 1. या व येणार्‍या लेखांमध्ये सोविएत यूनियन ला रशिया म्हणून संबोधण्यात येईल. 2. अग्निबाणाला रॉकेट म्हटले जाईल. पार्श्वभूमी(थोडक्यात)

[शशक' १९] - पैशाचा धूर

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 17/02/2019 04:39 या दिवशी प्रकाशित केले.
पैशाचा धूर निघतो माझ्या बंगल्यातुन. दिसतो सगळ्यांना, पण त्याकडे वाकड्या नजरेने बघायची हिम्मत नाहि कोणाची. सरकारी यंत्रणेत योग्य ठिकाणी तेलपाणी, आमच्या कम्युनिटी लॉबीचा सपोर्ट, आणि रक्तातच असलेला बिझनेस सेन्स... असा मी स्वाभावीक बिझनेस बादशाह. पौण्ड्स ते दिनार अशा सगळ्या करन्सीची गंगाजळी आहे माझ्या बुडाशी. सोनं-चांदी, हिरे-जडजवाहर, ह्युमन ट्रॅफिकींग, हत्यारं, दारुगोळा, असं सगळं करतो मी. माझ्याच धंद्याचं हीत सांभाळणारी आमची बँक आहे.

[शशक' १९] - स्ट्रेट ?

लेखक साहित्य संपादक यांनी रविवार, 17/02/2019 04:37 या दिवशी प्रकाशित केले.
चालत्या ट्रेनच्या प्रथम श्रेणीमध्ये बाकावर बसून तो जीनीच्या साडी नेसण्याच्या धडपडीकडे बघत तिला न्याहाळत होता... "जीनी... आपण पुन्हा भेटणार ना?" "नाही...." "काल पहिल्यांदयाच भेटलेल्या मला... तू तुझं सर्वस्व दिलंस मग आता का लाजतेस?" तिने फक्त जालीम कटाक्ष टाकला आणि आपली बॅग आवरायला लागली "बोल ना...! का नाही भेटू शकत आपण? भावनिक न गुंतता आपण संबंध ठेऊ शकतोच, जसं आज...." तो पुढे काही बोलणार तेवढ्यात तिने त्याचे बोलणे तोडले. "आज..... आज मला फक्त सहा महिन्यापूर्वी झालेल्या शश्त्रक्रियेनंतरचा माझा "परफॉर्मन्स" बघायचा होता, म्हणून मी........." "शश्त्रक्रिया...!!

[शशक' १९] - व्हॅलेंटाईन इव्हिनिंग

लेखक साहित्य संपादक यांनी शनिवार, 16/02/2019 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
कितीतरी दिवस सोफिया सरळच पडून राहायची. ऊन तिला सहन व्हायचं नाही आणि रात्री कधीकधी तर पायही वाकडे व्हायचे. आज व्हॅलेंटाईन डे. तो आज येणार अशी कुजबुज तिच्या कानी पडली होती. याच दिवसाची वाट बघत तिनं कितीतरी रात्री एकटीनं काढल्या होत्या. आज मात्र तो येऊच नये असं तिला मनोमन वाटत होतं. अखेर तो आलाच. लिलीची पांढरी फुलं घेऊन!!! तिनं घट्ट मिठी मारत विचारलं, "दुखलं?" तो: "...हो. थोडंसं....छातीत. ...व्हेंटिलेटर बंद केला तेव्हां." त्याच्या नवीन सुटावर तिचे अश्रू ओघळले. त्यांच्या लग्नाच्या दिवशी ओघळले होते तसे... ---------------------------------------------- सोफियाच्या थडग्याशेजारी असलेल्या त्याच्य