Skip to main content

नवीन सायकल घ्यायची आहे

लेखक राहुल करंजे यांनी रविवार, 16/06/2019 12:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सर्वांना.... माझे वय 27 आहे, उंची 5फूट 6इंच आहे, वजन 88 किलो आहे, धावपळीच्या आयुष्यात शरीराकडे दुर्लक्ष झाले, डायट पाळता येत नाही , व्यायामाला वेळ मिळत नाही . त्यामुळे सायकल घ्यायचा विचार करतोय,घर ते ऑफिस 4 किलोमीटर अंतर आहे, सुट्टीच्या दिवशी फिरायला आवडते त्यामुळे 40ते 50 किलोमीटर होईल... म्हणून जे या प्रकारामध्ये तज्ञ आहेत त्यांना विनंती आहे की मार्गदर्शन करावे, अनुभव सांगावे... सायकल कुठली घ्यावी, कशी घ्यावी?? बजेट 8000-12000 आहे...घेताना आणि घेतल्यानंतर काय काळजी घ्यावी?

एका बापाचा जन्म

लेखक चंद्र.शेखर यांनी शनिवार, 15/06/2019 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
(मिपा आयडी घेतल्यावर प्रथमच लिखाण पोस्ट करतोय. लिहायला नुकतीच सुरुवात केली आहे, सुचना/मार्गदर्शन मिळाले तर नक्कीच उपयोगी ठरेल) “मने, काय पसारा केलायसं एवढा ?” ऑफिस मधून घरी आल्या आल्या फरशीवर पडलेली खेळणी, चित्रकलेचे पेपर, रंग आणि कागदाचे असंख्य कपटे बघून नेहमीप्रमाणे माझा पारा चढला. मनू मला दाखवण्यासाठी म्हणून तिने चितारलेलं चित्र घेवून माझ्याकडे येत होती, ती माझा चेहरा बघून तिथेच थबकली. चेहरा पडला तिचा, मग मी सुद्धा ओशाळलो अनं जवळ घेतलं तिला.

वटवटसावित्री

लेखक खिलजि यांनी शनिवार, 15/06/2019 16:36 या दिवशी प्रकाशित केले.
हे देवी वटसावित्री मी पण पूजेन तुला लपून छपून फेरे घेईन उद्या पौर्णिमेच्या रात्री माझे सर्व काळे धंदे अव्याहतपणे चालू देत सदैव कधी नजरेत येऊ नको देउ तिच्या नाहीतर होतील माझे वांदे मी साधाभोळाच राहू देत तिच्यासाठी फार कठीण गं , झेलणं तिला ती आहे एक सुशील गृहकृत्यदक्ष पण दुर्दैवाने वटवटसावित्री वटवट करूनच मारते माझ्या नावाने फेरे नेहेमी मागते देवाकडे मिळू देत याचे सर्व धागेदोरे इतकी वर्षे लोटली कळला नाही तुझा महिमा आज तुला मी शरण जातो बघ थांबव माझी दैना सूत घेऊनि, दिवा लावेन रोवेन मी पण एक फांदी पानसुपारीची व्यवस्था व्हावी जेणे होईल माझी चांदी हे वर

म. सु. पाटील : उत्तुंग समीक्षक आणि माणूस

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 15/06/2019 15:13 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे दिनांक 31 मे 2019 ला रात्री अकरा वाजता म. सु. पाटील सर उर्फ बाबा यांचं निधन झालं. ही दु:खद बातमी समजताच सरांशी झालेल्या पहिल्या भेटीपासून तर आतापर्यंतच्या त्यांच्या समग्र आठवणी अगदी कालच घडल्यासारख्या मनात सहज तरळून आल्या. म. सु. पाटील सरांशी माझी पहिली प्रत्यक्ष भेट मनमाडला 1985-86 च्या दरम्यान झाली. (त्या आधी सरांशी आणि पुपाजींशी मी आठवीत असतानापासून पत्रसंवाद होता. ‘अनुष्टुभ’ नियतकालिकामुळे.) मनमाड महाविद्यालयात सर प्राचार्य होते. त्यांच्या निरोपानुसार त्या रविवारी सटाण्याहून डॉ. मोहन माजगावकर दादा आणि आम्ही काही मित्र (प्रा. शं. क. कापडणीस, डॉ. एकनाथ पगार, डॉ.

खाण्यासाठी जन्म आपुला २ : बाजार आमटी खिलवणारं महावीर व्हेज

लेखक महासंग्राम यांनी शनिवार, 15/06/2019 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्या पाककृती विभागाचा परिचय करून देतांना मालकांनी लिहिलंय "शेवटी सगळी धडपड आणि कष्ट हे सुखाच्या दोन घासांकरताच तर आहेत! मग ते दोन घास खमंग आणि चवदारच असले पाहिजेत! " अगदी खरंय म्हणा हे खाल्लेले दोन घास काअसेना, ते परिपूर्ण असले तर जेवणाला अजून लज्जत येते. खाण्यासाठी जन्म आपुला या हि उक्ती कृतीत उतरवण्याची माझी कायम धडपड असते, त्यामुळे पुण्यनगरीत आल्यापासून इथले वेगवेगळ्या चवीचे पदार्थ चाखणं मस्ट असते आणि वेगळं काय खायला मिळेल याच्या शोधात असतो.

जर्नी इस द रिवॉर्ड

लेखक महासंग्राम यांनी शुक्रवार, 14/06/2019 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
जगातले काही शोध असे आहेत, ज्यामध्ये पूर्ण समाजाला बदलूंन टाकायची शक्ती असते. कम्प्युटरचा शोध या महत्वाच्या शोधांपैकीच एक. कम्प्युटर जेव्हा प्राथमिक अवस्थेत होते तेव्हा कोणी विचारही केला नसेल, कि येत्या काही दशकांत तुम्ही घरबसल्या दुसऱ्या खंडातल्या लोकांशी संवाद साधू शकाल, खिशात १००० गाणी ठेवून फिरू शकाल. खरं तर तेव्हा अशी कोणी कल्पना असती तर त्याला अगदी वेड्यात काढलं असतं, पण म्हणतात ना वेडी माणसंच इतिहास घडवू शकतात.

मी तुझा विचार करते

लेखक शिव कन्या यांनी शुक्रवार, 14/06/2019 00:36 या दिवशी प्रकाशित केले.
मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते.... माझे खळाळणारे हसू अनुभवांच्या भोवऱ्यांतून तरून सुशांत जलाशयातल्या शांत स्मितासारखे तुझ्या ओठांशी येऊन थांबेल...... मी तुझा विचार करते, मी तुझ्या वयात रमते......

माचीप्रबळ येथील कॅम्पिंग

लेखक saumitrasalunke यांनी गुरुवार, 13/06/2019 12:34 या दिवशी प्रकाशित केले.
पनवेल जवळील शेडुंगच्या साधारण दहा किलोमीटर पूर्वेला प्रबळगड स्थित आहे. यापूर्वीही अनेकदा इथे जाणं झालं होतं मात्र तेव्हा इथे येणाऱ्यांची संख्या तुरळक होती. पायथ्यापासून साधारण दीड तासांत आपण माचीप्रबळ या पाड्यावर/पठारावर येतो. कलावंतीण दुर्ग अथवा प्रबळगडावर जाण्यासाठी हा बेस. गडांवर जायचे नसेल तर या इथे मुक्काम करता येतो. निलेश भुतांबरा या स्थनिक युवकाने इथे निवासाची आणि भोजनाची उत्तम सोय केली आहे. माती आणि घराच्या ओढीने निलेशने चेन्नईतल्या नोकरीला रामराम केला आणि घरी परतला. प्रचंड शारीरिक मेहनत, कौशल्यपूर्ण योजना आणि चिकाटीच्या जोरावर या 'इको टुरीझम'ची स्थापना झाली आहे.

बालकथा- दुर्बिण

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 13/06/2019 09:52 या दिवशी प्रकाशित केले.
बालकथा- दुर्बिण ----------------------------------------------------------------------------------- ही बालकथा आहे . ( छोटा वयोगट ). मुलांसाठी आणि त्यांच्या पालकांसाठी . खास उन्हाळी सुट्टीनिमित्त . मला मुलांच्या प्रतिक्रिया कळवा हं . .. आणि तुमच्या सुद्धा . ------------------------------------------------------ बाबांनी काहीतरी खेळणं आणलं होतं. “ काय आहे बाबा ? “ मी विचारलं. “ दुर्बिण ! यामधून लांबवरचं दिसतं. वस्तू मोठ्या मोठ्या दिसतात. “ मला गंमतच वाटली. नेहा माझी मैत्रीण आहे . वयाने माझ्या एवढीच - पण मोठी आहे ! म्हणजे समजलं ना ? तर - दुर्बिणीतून तिच्याकडे पाहिलं तर ती कित्ती मोठी दिसेल ?

चोपता चंद्रशिला तुंगनाथ ट्रेक : १ : हरिद्वार

लेखक आकाश खोत यांनी बुधवार, 12/06/2019 23:06 या दिवशी प्रकाशित केले.
हिमालयात एकदा जाऊन आलं कि पुनःपुन्हा जाण्याची ओढ लागते. ते पर्वत आपल्याला साद घालत राहतात. हिमालय मी पहिल्यांदा अगदी जवळून पाहिला तो "व्हॅली ऑफ फ्लॉवर्सच्या" ट्रेकमध्ये. (त्याबद्दल वाचा या लेखमालिकेत) त्यानंतर एक दोन वर्षात "एव्हरेस्ट बेस कॅम्प" ट्रेक करण्याचा योग्य जुळुन आला. (त्याबद्दल लिहिण्याचा योग अजून जुळून यायचा आहे.) त्या अविस्मरणीय ट्रेकनंतर मी पुन्हा हिमालयात जाण्याची वाटच बघत होतो. ती संधी पुन्हा या वर्षी मिळाली.