Skip to main content

कविता पिंपळपान

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी सोमवार, 01/07/2019 15:24 या दिवशी प्रकाशित केले.
कविता सुचत नाही मन ही रितेच काही लिहू काय? म्हणता म्हणता सापडले ओले पान. ही कविता पिंपळपान! थेंब थेंबा जाग आली रेष रेषा बोलू लागली ना लिहिता आले कैसे मज लेखणिस भान? ही कविता पिंपळपान! हे असेच असते सारे ना सुचता हलते वारे पाचोळा नसता कोठे गर्द जागे होते रान ही कविता पिंपळपान! घरट्याच्या अवती भवती पाऊस थेंबांची गर्दी मी मिटून घेता दारे पाऊस करी मूकगान ही कविता पिंपळपान! म्हटले या पावसाला मन हळवे नकोच सोडू भिजवूनि जा चिंब मनाला मग लाभे पाऊस-दान ही कविता पिंपळपान!
काव्यरस

बिरादरीची माणसं - जगन काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी सोमवार, 01/07/2019 13:30 या दिवशी प्रकाशित केले.
मागील कैक वर्षांपासून बिरादरी मध्ये, रोज भल्या पहाटे ३ वाजता एका घरी अलार्म वाजतो आणि एक ८० वर्षाचा तरुण इसम जागा होतो. [८० वर्षाचा तरुण का म्हंटलं हे नंतर आपणा सर्वांना कळेलच.] एवढ्या पहाटे घरातील कुणालाही त्रास न देता स्वतःची सर्व कामे स्वतःच करतो. शेवटी मात्र प्रेमाने तयार केलेल्या आपल्या पत्नीच्या हातचा चहा पिऊन सकाळी ६ वाजता संस्थेच्या कामासाठी सज्ज होतो.

बिल देऊन आलो..

लेखक गवि यांनी सोमवार, 01/07/2019 10:38 या दिवशी प्रकाशित केले.
सांगावयास गेलो, ऐकून काय आलो? सुनावलेस तू, मी बिल देऊन आलो.. सैराट पावसाने पुरता.. भिजून आलो. त्या गोठल्या दुपारी बिल देऊन आलो.. हात होता तुझा अन कानशील माझे लोकां उमजण्याआधी बिल देऊन आलो. चालते होणे त्वरे सोपे गेले तुला वेटराने हटकले, मी बिल देऊन आलो. डोळे भरून आले.. पावसाच्या भरवशावर ना रोखले तयांना, अन बिल देऊन आलो.

असा पाऊस

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 30/06/2019 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
नभातून पडावा पाऊस मनात उतरावा पाऊस धरतीमध्ये थेंब थेंब रुजवावा पाऊस झाडांवरल्या थेंबातूनी झरावा पाऊस कौलांच्या पागोळ्यांतूनी ओघळावा पाऊस हातातल्या ओंजळीत पकडूनी प्यावा पाऊस अधिर ओठांचा स्पर्शाने हलकेच चुंबावा पाऊस ललनेच्या केसांतूनी झटकावा पाऊस गावा पाऊस घ्यावा पाऊस पाऊस घेवून आपणही व्हावे पाऊस - पाभे ३०/०६/२०१९
काव्यरस

झटपट पराठा

लेखक यशोधरा यांनी रविवार, 30/06/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
..तर, पराठे बनवायची लहर आली होती पण जास्त पसारा करायची तयारी नव्हती. झटपट काय करता येईल ह्याचा अंदाज घ्यायला पाककृती पुस्तकं, जमवलेल्या रेश्प्या वगैरे पाहून झाल्या पण सोपं पण मस्त असं पटकन् आवडून जाईल, असं काही सापडलं नाही. नेहमीचा साधा पराठा तर नको होता. काय करावं, काय करावं हा विचार करत आंतरजालावर धांडोळा घेताना ही एक मस्त चटपटीत आणि पटकन् करता येईल अशी पराठ्याची कृती सापडली आणि बनवलेले पराठे घरी आवडले, म्हणून इथे पण सगळ्यांसाठी लिहूया, म्हटलं. पाककृती आणि फोटो - आंतरजालावरून साभार.

कुरळ्या बटावर माझ्या

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:37 या दिवशी प्रकाशित केले.
तू" रेशमी सुगंधात माझ्या होऊनि सुगंध दरवळतोस तू कुरळ्या बटावर माझ्या होऊनि वारा ऊनाडतोस तू * टपो~या डोळ्यात माझ्या,होऊनि काजळ राहतोस तू गो~या भाळावरी माझ्या होऊन बिंदि विराजतोस तू * लाल अधरावरी माझ्या ,होऊनि गीत गुणगुणतोस तू गळ्यात माझ्या होऊनी मोतियाची माळ सजवतोस तू * रंगी बेरंगी चुड्यात माझ्या होऊनि सप्तरंग उतरतोस तू पायातील पैजणात माझ्या होऊन घुंघरु निनादतोस तू * गो~या तनुवर माझ्या होऊनी घननिळ बरसतोस तू रोम रोमात माझ्या होऊनी निशीगंध बहरतोस तू * हळव्या ह्या मनांत माझ्या होऊनी बेधुंद लहरतोस तू ह्रुदयातिल स्पंदनात माझ्या होऊनी सप्तसुर झंकारतोस तू आवि्ना

"व्रात्यस्तोम"

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:32 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वी ऋतुप्राप्ती होण्या अगोदरच मुलींची विवाह होत असत … पण ऋतुप्राप्ती झाल्यानंतर जर एखाद्या मुलिचे लग्न करायचे झाल्यास "व्रात्यस्तोम" विधी करावा लागे असा संदर्भ "उंच माझा झोका" मधे ऐकला.. ज्यांच्यावर अजिबात संस्कार झालेले नाहीत किंवा वेळेवर झाले नाहीत त्या लोकांना शुध्द करण्यासाठी व्रात्य स्तोम विधी केला जातो . ऋतू येण्यापूर्वी मुलीवर विवाह संस्कार झाला पाहिजे अशी कल्पना असण्याच्या काळात उशिरा विवाह झाल्याने म्हणजे योग्य वेळी संस्कार न झाल्यामुळे पतित व्यक्तीला यात शुध्द करून घेतले जाते . परधर्मीय , परदेशीय व्यक्तीबरोबर राहिल्यास जेवण केल्यास सुध्दा या विधीने शुध्द होता येते .

आयुष्य

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:31 या दिवशी प्रकाशित केले.
आयुष्य खूप साधे आणी सरळ आहे पण दिसते इतके सोपे पण नाही.. आयुष्य समजावून घेण्याच्या भानगडीत न पडलेले बरे.. मस्त जगत राहणे हाच एक मार्ग आहे.. ब्रह्मांडातल्या अदृश्य शक्ती तुम्हाला मदत करायला उत्सुक आहेत.. तुमचा ज्या प्रमा्णात विश्वास व श्रद्धा आहेत त्या त्या प्रमाणात तुम्हाला मदत मिळत असते. * आयुष्याचा उद्देश काय? मी इथे का आलो आदी प्रश्नाच्या जंजाळात अडकू नका.. कारण त्याची उत्तरे आपणास मिळणार नाहीत.. जीवन जगण्यासाठी आपण कारण निर्माण करायचे असते.. एखादी कला..विचार छंद यात स्वतःला झोकून द्या,,जीवन जगण्याचा तो उद्देश बनू शकतो..त्यांतूनच जीवनाचा अर्थ उमगत असतो.

यमदूत

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी रविवार, 30/06/2019 09:08 या दिवशी प्रकाशित केले.
हाय -कुणीतरी त्याला म्हणाले त्याने मागे वळून पाहिले पौराणिक सिरियल्स मध्ये घालतात तसे कपडे घालून तो उभा होता आपण कोण आयमीन ओळखलं नाही आपल्याला मी यमदूत आपल्याला घ्यायला आलो आहे हे ऐकताच त्याला घाम फुटला मला वेळ दे बायका मुलांना शेवटचं भेटू देत ते शक्य नाही -मला अनुमती देण्याचा अधिकार नाही पण लक्षात घे तु नेहमी ज्या खुर्चीवर बसतोस तिथे बसला कि तू तात्काळ गतप्राण होशील समजा मी बसलोच नाही खुर्चीवर तर ? तर तुला एक जीवदान मिळेल समजा मी पळून गेलो तर ? तसा विचार पण करू नकोस -ते अशक्य आहे तो अंतर्धान पावला जनरल स्टोर मध्ये माल देणे पैसे मोजणे त्याने चालू ठेवली तेव्हढ्या

(व्हिस्की पिऊन आलो...)

लेखक गड्डा झब्बू यांनी शनिवार, 29/06/2019 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
प्राची ताई, ज्ञानोबाचे पैजार व नाखु साहेबांची मनातल्या मनात क्षमा मागून भेटावयास गेलो, करून काय आलो ? बोलावलेत तुम्ही, व्हिस्की पिऊन आलो... ना थेंब दिला सोड्याचा चखना फुकट दिला... पाण्या सवेत केवळ, व्हिस्की पिऊन आलो... होते मित्र चार आणि... नव्हती कुणीही रमणी, बायकोस हे पटेना... व्हिस्की पिऊन आलो... प्याले जरी रिचवले... एका मागोमाग आठ, उलटी होऊ न देता... व्हिस्की पिऊन आलो...