Skip to main content

बिरादरीची माणसं - भाऊजी काका

लेखक लोकेश तमगीरे यांनी मंगळवार, 16/07/2019 10:24 या दिवशी प्रकाशित केले.
ही गोष्ट १९७६ च्या आसपासची असेल. आनंद बुनियादी प्राथमिक शाळा, आनंदवन (वरोरा) येथील पहिली-दुसरीचे विद्यार्थी चार भिंतीच्या आतील पुस्तकी शिक्षणाला कंटाळून बाबांना आर्जवाने म्हणाले, “ बाबा, आम्हाला रोज श्रमदान करायचं आहे; कृपया आम्हाला मार्गदर्शन करा”. यावर बाबा म्हणाले, “ बघा मुलांनो, शिक्षण तर तुमच्या भवितव्यासाठी अत्यंत आवश्यक आहे, ते पूर्ण करण्यावाचून तुम्हाला पर्यायच नाही. पण मी तुमचा श्रमदान करण्याचा उत्साह मोडू शकत नाही.” आणि असे म्हणून बाबांनी या विद्यार्थ्यांसाठी श्रमदानाची व्यवस्था केली. खुश होऊन सर्व मुलांनी बाबांना बनविले त्यांचे “सेनापती” आणि स्वतः झाले त्यांची ‘वानर सेना’.

पर्वती

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 08:50 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वती चढत होतो साथीला ५-६ तरुणाईचे टोळके होते ते गप्पा मारत पर्वती चढत होते मध्यावर आल्यावर तरुणाई दमली व बाजूला विश्रांती साठी बसली मी त्यातल्या एका तरुणाला म्हणालो अरेतुम्ही जवान तरुण मुले दम्लात एव्हढ्यात ? पर्वती एका दमात चढायची असते मी तर अजूनही एका दमात चढतो त्यावर तो तरुण म्हणाला " काका तुमची पिढी साजूक तुपावर मोठी झाली आमची पिढी रिफाईंड ऑइल वर -तेव्हढा फरक तर पडणारच ना " त्याच्या उत्तराची गंमत वाटली व त्या कडे पाहून हसलो व पाय-या चढायला सुरवात केली

मंतरलेले दिवस – १

लेखक सुधीर कांदळकर यांनी मंगळवार, 16/07/2019 08:41 या दिवशी प्रकाशित केले.
दुसर्‍या महायुद्धातली गोष्ट. लंडनवर जवळजवळ रोज बॉंबवर्षाव. अशा काळात शहरात ‘ब्लॅक आऊट’ पाळतात तसा लंडनमध्येही तेव्हा होता. रस्त्यावरचे दिवे बंद. प्रत्येक घराच्या प्रत्येक खिडकीला जाड पडदे. प्रकाशाचा कवडसा देखील बाहेर येता नये. रात्री शहर कुठे आहे हे बॉंबफेक्या विमानांतून नुसत्या डोळ्यांनी दिसू नये म्हणून घेतलेली दक्षता. नाईट व्हीजन गॉगल्स अजून आले नव्हते. असेच कडक ब्लॅक आऊटचे दिवस. एके सायंकाळी एका घरातून प्रकाशाची तिरीप बाहेर येत होती. गस्त घालणारा एक पोलीस त्या घराचा दरवाजा अधीरतेने ठोठावतो. दार उघडणार्‍या व्यक्तीला पोलिसी खाक्याने दरडावत काळजी घेण्यास सांगतो.

"चूल बंद की अक्कल बंद "

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी मंगळवार, 16/07/2019 06:38 या दिवशी प्रकाशित केले.
पर्वाची गोष्ट आहे सायंकाळचा समय होता मी व हिने चितळ्यांच्या दुकानात खरेदी केली चितळे दुकाना समोर नूर भाई भाजीवाल्याचा ठेला आहे नुरभाई भाजी वाल्याकडून भाजी घेतली जवळच रिक्षा होती रिक्षा केली व घरी यायला निघालो वेळ संध्याकाळची डेक्कन वर मरणाची गर्दी लकडी पूल सिग्नल ला रीक्षा थांबली होती तेव्हढ्यात मोग-याचे गजरे विकणारी मुले रिक्षा जवळ आली मोग-याचे गजरे म्हणजे जीव कि प्राण कसे दिले ? १० ला एक ४० ला ६ दे -हि म्हणाली ५ देईन -गजरे वाला मुलगा ठीक आहे दे -त्याने ५ गजरे हिच्या कडे दिले हिने गजरे सुंगले व माझ्याकडे दिले अन पैसे देण्यासाठी पर्स मध्ये हात घातला तेव्हढ्यात सिग्नल सुटला व रिक्ष

निर्झर

लेखक पाषाणभेद यांनी सोमवार, 15/07/2019 20:01 या दिवशी प्रकाशित केले.
निर्झर निर्झर होता एक बारीकसा; हिरव्या डोंगरातून वाहतसा असुनी तो लहान छोटा; ठावूक नव्हत्या पुढल्या वाटा || धरतीवरच्या वर्षावाने; जीवन त्याचे सुरू जहाले धरणी जाहली माता ती; अल्लड खट्याळ उदकाची || नित नवीन भरून जलाने; ठावूक त्याला भरभरून वाहणे चंचल उत्कट उल्हासीत पाणी; घेवूनी जायी दो काठांनी || पुढेच मिळाली सरिता त्याला; सवे वाहण्या पुसे खळाळा विचारही न करता तो मिळाला; निर्मळ नदीत एकरूप जाहला || - पाषाणभेद १५/०७/२०१९
काव्यरस

माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो

लेखक खिलजि यांनी सोमवार, 15/07/2019 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
माफ करा राजे आम्ही पितो , होय आम्ही पितो पिता असलो जरी कुणाचे तरी आम्ही पितो होय राजे , हे राज्य जरी तुम्हामुळे लाभले आमची मुलेबाळे सुखशांतीने नांदत असली तरी आम्ही पितो , आम्ही धुंदित मस्तीत बेफाम पितो पिताना बरेच फोन वाजतात , घरच्यांचे आम्ही दुर्लक्ष करतो , आणि बिनधास्त पितो मग आम्ही धडपडत सावरत कसेबसे उठतो तुम्हीच राखून दिलेल्या घराकडे वळतो तिथे आमची माँसाहेब , असलीच तर पत्नी डोळ्यात प्राण आणून वाट बघत असते आम्ही गडाच्या मुख्य दरवाजाशी पोचतोच तोपर्यंत दार उघडलेले असते स्वागतासाठी माँसाहेब , आमच्या सौ आणि मुलेबाळे सर्वजण अगदी शेलके चेहरे घेऊन उभे असतात आम्ही जग

साहित्य निर्मितीची प्रक्रिया

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 15/07/2019 16:20 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे साहित्य, वाङमय, काव्यu या संज्ञा स्थूलपणे समान अर्थाच्या समजल्या जातात. या संज्ञांच्या अंतर्गत कथा, कविता, नाटक, कादंबरी, आत्मकथन, ललित लेखन, वैचारिक लेखन, आस्वाद, समीक्षा आदी प्रकार येऊ शकतात. साहित्य म्हणजे काय, वाड्‍.मय म्हणजे काय, काव्य म्हणजे काय असे प्रश्न साहित्य व्यवहारात वेगवेगळ्या परिप्रेक्षात विचारले जाणे साहजिक आहे. साहित्य- वाङमय हे वास्तवच असते असे नाही, तसेच ते पूर्णपणे मिथक असते असेही नाही. म्हणजे साहित्यात वास्तव असूनही त्याच्या व्यतिरिक्‍‍त त्यात अजून खूप काहीतरी असते. वर्तमानपत्रातल्या बातम्या वा वृत्तांत हे वास्तव असतात.

जमिनीखालची धरणे (Underground Dams) आणि पाण्याचे कारखाने

लेखक सुनिल प्रसादे यांनी सोमवार, 15/07/2019 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
तिवरे, ता. चिपळूण, जि. रत्नागिरी येथील धरण दोन जुलैला रात्री साडेनऊ वाजता फुटले आणि धरणाच्या खालच्या बाजूला वसलेल्या गावांमध्ये हाहाकार उडाला. धरण बांधताना वापरलेल्या सिमेंट, लोखंड, दगड, माती इत्यादी दृश्य घटकांबरोबरच त्यामध्ये मिसळलेल्या शासकीय आणि प्रशासकीय अनास्था, निष्काळजीपणा आणि बेफिकिरी ह्या अदृश्य घटकांचे दर्शनदेखील सर्वांना झाले. पाठोपाठ तिवरे धरणाच्या पावलावर पाऊल टाकून आणखी किती धरणांची वाटचाल चालू आहे त्याची यादीदेखील प्रसिध्द झाली. काही प्रतिक्षिप्त घोषणादेखील ताबडतोब झाल्या.

अभंग...

लेखक bhagwatblog यांनी सोमवार, 15/07/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
पंढरीच्या गावा| वैष्णवांचा मेळा| भक्तीचा उमाळा| अपरिमित || सोहळा कीर्तनाचा| नामाचा गजर| श्रद्धेचा महापूर| अखंडित|| पांडुरंग ध्यानी| पांडुरंग मनी| नाम संकीर्तन| प्रवाही|| टाळांचा नाद| मृदुगांचा हुंकार| विणेची झंकार| संगीतमय|| विटेवरी पांडुरंग| अठ्ठावीस युगं| भक्तांची रांग| अविरत||
काव्यरस

डार्क फॅन्टसी - सुपरनॅचरल - भाग 4

लेखक nishapari यांनी सोमवार, 15/07/2019 11:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग 1 - https://www.misalpav.com/node/44619 भाग 2 - https://www.misalpav.com/node/44807 भाग 3 - https://www.misalpav.com/node/44821 सुपरनॅचरल मालिकेचे काही एपिसोड खूप विनोदीसुद्धा आहेत.... आणि खरं म्हणजे भीती वाटण्यासारखी नाहीये मालिका ... पात्रांचे आपापसातले संबंध ह्या गोष्टीवर जास्त जोर दिला आहे .. दोन भावांना एकमेकांबद्दल वाटणारी काळजी , प्रेम हे जास्त हायलाईट केलं आहे ...