चार थेंब
चार थेंबांत संपेल
मग पाऊस तो काय,
चार शब्दांत मावेल,
मग माणसाचं मन ते काय,
संपलाही असता तो,
जर
प्रत्येक थेंबाला आभाळ मिळालं असतं,
मावलेही असते ते,
जर
प्रत्येक शब्दाला आयुष्य लाभलं असतं,
पण मग उरल्या थेंबांचं आणि शब्दांचं काय ?
-अभिजीत
काव्यरस
सेकशन ३७० आणि संस्थानिकांचा तनखा काहि प्रश्न
वरवर पाहता दोनही वेगळे विषय ,एक तर देशभक्ती शी निगडित
पण साम्य पण बरेच आहेत
भारत स्वतन्त्र झाला तेव्हा ह्या दोन्ही अतिरिक्त सोयी मंजूर केल्या
तनखा पण एकदा रद्दबातल करायचे विधेयक नामंजूर झाले पण नंतर मंजूर केले
३७० तर बऱ्याच वेळा चर्चा झाली आज गेले
संस्थानिकांना तनखा मंजूर केला कारण त्यांनी संस्थाने विलीन केली व फक्त तिजोरीवर ओझे म्हणून रद्द केला केला माननीय इंदिराजी ह्यांकडून
ह्या निमित्ताने पडलेले काही प्रश्न
१) ज्या संस्थानिकांनी भारतात विलीन होण्यास नकार दिला त्यांना पण तनखा का दिला जात होता ?
युगांतर - आरंभ अंताचा भाग २१
पंडु वनवासाला कंटाळून परतेल अशी अपेक्षा करत भीष्म आणि विदुर त्याची वाट पाहत होते. पंडुची नाजूक तब्येत वैद्यांच्या देखरेखीशिवाय कशी नीट राहिल, हा प्रश्नही त्यांना सतावत होता. दासाने दिलेल्या वार्ता ऐकून पंडु परतण्याची शक्यता आता धुसर झाली होती. शेती करत पंडु वनातच रमल्याचे चित्र ही घोर निराशा होती.
'हा सोन्याने मढलेला राजमहाल, दास-दासी, सोयी-सुविधा, मान-सन्मान, अधिकार..... सगळं निर्जीव आहे! आधीही असतील... पण आता त्यांच निर्जीव असणं जाणवतयं! काय बदललं हस्तिनापुरात इतकं देवव्रता की तुझं मन लागत नाही इथे? एका क्षणात हे सुख सोडून गेलेला पंडुपरिवार! खरचं वाटलं तुला, की तुझा शिष्य पंडु परत येईल?
मर्लिन मन्रो....
५ ऑगस्ट १९६२ या दिवशी मर्लिन मन्रोचा मृत्यू झाला की तिने आत्महत्या केली ते तिलाच माहीत किंवा परमेश्र्वराला माहीत. या कविची ओळख झाली आणि त्याच्या कविता वाचताना ही मर्लिनवर त्याने लिहिलेली कविता सापडली... कार्देनालच्या कवितेत काहितरी वेगळे आहे हे मला सतत जाणवत होतं.... अर्थात कविता हा आपला प्रांत नाही...काव्यरस
श्रीकृष्ण
श्रीकृष्ण (महाभारतातील व्यक्तिचित्रे )
काही वर्षांपूर्वी " महाभारतातील व्यक्तिचित्रे " या लेखमालिकेत भीष्म, द्रौपदी, पार्थ, इ. पांच पात्रांचा; महाभारतात म. व्यासांनी त्यांच्याबद्दल काय लिहले याचा परिचय करून दिला होता. एका विषयावर किती लेख लिहावयाचे व असे लेख किती लांबवावयाचे याबद्दल मीच साशंक असतो त्यामुळे वाचकांचा आग्रह होता तरी थांबलो. पण हेही खरे की श्रीकृष्णाबद्दल लिहले नाही तर "महाभारताबद्दलच " लिहावयाचे राहिले असे म्हणावे लागेल ! कृष्ण व कर्ण समोर ठेवून तर महाभारत लिहले. श्रीकृष्णाविषयी म.
हे असे का असावं?
लहान असल्यापासून मी जरा एकलकोंडा मनुष्य आहे. फक्त नातेवाईक, शेजारपाजारच्या लोकांशी मनमोकळेपणाने मिसळू शकतो पण नवीन लोकांशी बोलायला, कुणाच्या घरी जायला मन तयार होत नाही. शाळेत, कॉलेजमध्ये एवढी अडचण आली नाही. ठराविक मित्रांबरोबर सुट झालो. नोकरी मध्ये सुद्धा आपण भलं आणि आपलं काम भलं.
जास्त संबंध कुठे वाढविले नाही, सासरच्या लोकांशी संबंध आलेल्यांचे स्वागत, चाललेल्यांचे आभार असे ठेवले.
बालपणापासून वाचनाची खूप आवड लागली, मिळेल ते वाचून काढले. बऱ्याचदा पुस्तकांमध्ये इतका गढून जायचो की आजूबाजूला कोण काय करतं, बोलतंय हे कळायचं नाही. कुणी किती हाका मारल्या तरी ऐकू यायच्या नाही.
मिसळपाव