Skip to main content

तंबोरा' एक जीवलग - ४

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शुक्रवार, 06/09/2019 12:33 या दिवशी प्रकाशित केले.
घरोघरी गणपती आले. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या उत्साहालासुद्धा उधाण आलं असेल. गल्लोगल्ली बसलेल्या गणपती मंडपातून कानठळ्या बसतील इतपत वाजणार्‍या हिडीस गाण्यांबद्दल ओरड होत असते. ती रास्तच. उत्सव म्हणाजे आनंद. त्यात त्रासदायक असे काही नसावे खरं तर. पण हल्ली आनंदाच्या व्याख्याच बदलल्या आहेत. हिडीस कान फुटणारी थिल्लर गाणी वाजवणे, ऐकणे, कानाचे पडदे फुटतील इतक्या मोठ्या आवाजात ढोल बडवणे हाच आनंद; असे मानणार्‍या पिढीचे हे उत्सव त्यांच्या त्यांच्या दृष्टीनं 'साजरेच' असतात.

InShort १ - Afterglow (शॉर्ट-फिल्म)

लेखक मनिष यांनी शुक्रवार, 06/09/2019 11:32 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या शॉर्ट-फिल्मविषयी वाचण्यापुर्वी एकदा Afterglow पहावा आणि मग वाचावे ही विनंती. आवडलेल्या, थोड्या अनोळखी शॉर्ट-फिल्मविषयी इतरांना सांगावे; त्यात काय भावले, काय स्पर्शून गेले ते लिहावे हा हेतू. लिखाणाच्या ओघात काही स्पॉइलर्स येतील, त्याची वेगळी सूचना नाही. कोर्‍या मनाने फिल्म पाहूनच हे वाचावे ही पुन्हा एकदा विनंती.

कला

लेखक क्रांती यांनी शुक्रवार, 06/09/2019 06:05 या दिवशी प्रकाशित केले.
h3 { font-size: 22px; font-family: 'mu

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

लेखक शशिकांत ओक यांनी शुक्रवार, 06/09/2019 00:28 या दिवशी प्रकाशित केले.

भाग २ - जब वी मेट - ताठ मानेचा सार्जंट तादळे...

1 'आजचा दिवस माझा' सिनेमा ज्यांनी पाहिला असेल त्यांना वरील अंध गायकांना महाराष्ट्राचे एक मुख्यमंत्री एका रात्रीत कलाकार कोट्यातून राहायला घर द्यायला सरकारी यंत्रणा कामाला लावून चंग बांधतात आणि प्रत्यक्षातआणतात. ते ज्या कारणाने घडते त्याच्या मुळाशी त्यांचा अहंकार दुखावतो... कारण त्या रात्रीच्या एका कार्यक्रमाला उपस्थित बडे बडे धनी, प्रतिष्ठित उच्चभ्रू त्यांचा आगमनाप्रित्यर्थ मान राखत उभे राहून अभिवादन करत असतात.

शं नो वरुण: । एक अनावृत्त पत्र

लेखक मायमराठी यांनी गुरुवार, 05/09/2019 22:37 या दिवशी प्रकाशित केले.
शं नो वरुण: । प्रिय विश्वव्यापीजनमुदितेश्वरा, तुझ्या सुयोग्य असा मायना नाही शिकलो. उगाच औपचारिकता कशाला? जन्मापासून नातं आहे तुझ्याशी. आई सांगते की कंबरेएवढ्या पाण्यातून मामा डबा घेऊन यायचा तिला माझ्या वेळेला. फक्त मीच कशाला? या वसुंधरेवर कोणाच्या जन्माला तू साक्षी नव्हतास? पंचमहाभूतांच्या खेळांत भाग घ्यायला खूप आधीपासूनच तू भूत होऊन तयार होतास, तेव्हापासून आजतागायत तसाच आहेस. मी तेव्हा नव्हतो असं तुझ्या मनांत तरी कसं आलं? जेव्हा सगळी भूतं रचली जात होती तेच तर आमच्या सर्वांचे बेगडी जन्माचे क्षण.

दोन आण्याची ( पैशाची ) गोष्ट

लेखक तमराज किल्विष यांनी गुरुवार, 05/09/2019 20:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या लहानपणी ही गोष्ट माझा आजा मला रोजच सांगायचा. बाबा म्हणजे माझा आजा विड्या वळायचं काम करायचा. बाबा विड्या वळत असायचा, अन् कोठूनही माझी स्वारी आली की लगेच " बाबा गोष्ट सांग" ऑर्डर सुटायची. बाबा म्हणायचा. " थांब, सांगतो." मी " नाही, आता लगेच सांग". मग बाबाची गोष्ट सुरू व्हायची. एक होती म्हातारी. ती चालली कुपाटी कुपाटीना. तिला सापडले दोन पैसे. दोन पैशाचं तिनं दूध आणलं. ते ठेवलं तापायला. ते गेलं उतू. म्हातारी गेली उतरायला. हाताला आले तीन फोड. फोड फुटले. एकात निघली सकू. एकात निघली बकू. एकात निघला डिंगऱ्या. सकू पाणी आनती का? मी नाही आनीत जा. बकू पाणी आनते का? मी नाही आनीत जा.

वयास माझ्या पैंजण घालित....

लेखक शिव कन्या यांनी गुरुवार, 05/09/2019 17:40 या दिवशी प्रकाशित केले.
शुभ्र रुपेरी हव्यात लाटा बटाबटांच्या डोक्यावरती नकोच तेव्हा काळीकुरळी बट डोळ्यावर सळसळणारी शेलाटीशी रेघ वक्रशी हातावरती उमटून जावी टिचकी मारून गिरकी घेता झोका माझा खाली यावा डोळ्यांवरती जरा खालती ग्रहण हवे मज चंद्राचे त्या ग्रहणाला मोक्ष नसावा, केवळ अनुभव साक्ष असावा नाजुक साजुक पेरांवरती खोडावरचे रिंगण यावे साल कोवळी मधुमासाची गंध फुलांचा उडून जावा पोटामधले उदंड पाणी खळखळ अवघी डोळ्यांमधली एक मोजता दुजी उठावी लाट बोलकी मिटून जावी पाठीवरच्या पानावरचा रंग केशरी विराट व्हावा त्यावर हलते माळ मण्यांची ताठ कण्याची पाठ रहावी हळुच यावे जरा बसावे आस्ते आस्ते कवेत घ्यावे वयास माझ्या

अखेर मराठी वेबसाईटसाठी गुगल ऍडसेन्स सुरु

लेखक onlinetushar यांनी गुरुवार, 05/09/2019 15:42 या दिवशी प्रकाशित केले.
google-adsense-for-marathi-languages बहुप्रतीक्षित गुगल ऍडसेन्स आता मराठीसाठी देखील सुरु झाले आहे. मराठी डिजीटल प्रकाशक गेल्या अनेक वर्षांपासून गुगल ऍडसेन्स मराठी वेबसाईटसाठी सुरू होण्याची वाट पाहत होते. सध्या गुगल, फेसबुक यासारख्या कंपन्यांनी स्थानिक भारतीय भाषांवर लक्ष केंद्रीत केले आहे. गेल्या वर्षी जून महिन्यात पुण्यात सर्च कॉन्फरन्स झाली होती. त्यावेळीच लवकरच मराठी संकेतस्थळांची गुगल ऍडसेन्सची सुविधा देईल अशी चर्चा सुरु होती.