Skip to main content

माझा कुकिंग एक्सपिरिमेंट

लेखक मृणमय यांनी सोमवार, 16/09/2019 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, मी आरती, आता कुणाची विचारू नका :) हा माझा लिहिण्याचा पहिला प्रयत्न. आमच्याकडे तसे कुणी लिहीत नाही, फक्त बोलतात आणि ते हि खूप जोरात. तर आज खास लिहिण्याचे कारण असे कि ऑफिस मध्ये काही फारसे काम नाही. ( ऑफिस मध्ये कुणालाही मराठी येत नाही ह्याचा हा फायदा) आता असा अलभ्य लाभ वर्षातू कधी तरीच होतो आणि जर हे दान पदरात नाही पाडून घेतलं तर आयुष्यात काय मिळवलं? ( आता साडी आणि पदर नसला तरी भाव महत्वाचा). तर मी आज माझ्या कुकिंग एक्सपिरिमेंट बद्दल लिहिणार आहे. सध्या युट्युब वर कूकिंग चे चॅनेल खूप जोरात चालू आहेत.

भिकार्‍याची संपत्ती

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी रविवार, 15/09/2019 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे काही दिवसांपूर्वी एक बातमी वाचनात आली: चेन्नईचा एक भिकारी रस्त्यावर मरून पडला. त्याचा पंचनामा करताना रस्त्याकडेच्या त्याच्या झोपडीत पैशांनी भरलेली काही पोती सापडली. पोत्यांत भरलेले पैसे पोलिसांनी मोजले तर ती रक्कम एक कोटी ८६ लाख आणि काही हजार इतकी होती. एवढी संपत्ती गोळा करून बिचारा भिकारी रस्त्यावर बेवारशी मरून पडला. या बातमीने विचारचक्र सुरू झालं: भिकार्‍याने आपल्या भिकारीच्या नोकरीतून स्वेच्छानिवृत्ती घेतली असती तर? (नोकरी हा शब्द इथं मुद्दाम वापरला आहे.) साचवलेल्या पैशांत तो मरेपर्यंत चांगलं खाऊन (पिऊन नव्हे) जगला असता.

आटा, तांदूळ, तूरडाळ आणि 'इत्यादि'..

लेखक आजी यांनी रविवार, 15/09/2019 14:35 या दिवशी प्रकाशित केले.
मला बोरिंग वाटणारी अनेक कामेआहेत. त्या सगळ्यांची नावे सांगत बसायला मला बोअर होतंय. पण काही नमुन्यादाखल सांगते. गूळ चिरणे, भाजी निवडणे, उरलेले अन्न काढणे, दरमहा लागणार्‍या वाणसामानाची यादी करणे. लिस्ट करायची म्हणजे, सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत, आपल्याला कायकाय लागते ते आठवणे. अगदी पेस्ट, साबण लायझॉल, गार्बेज बॅगपासून ते रात्रीच्या गुडनाइट रीफीलपर्यंतची यादी करायची.

तंबोरा' एक जीवलग - ५

लेखक गौरीबाई गोवेकर नवीन यांनी शनिवार, 14/09/2019 20:17 या दिवशी प्रकाशित केले.
न केलेल्या अभिनयाची गोष्टः अभिनय ही एक स्वतंत्र कला आहे. एखाद्याला गाता येतं म्हणजे अभिनयही येईलच असं नाही. ़़़जसे गाणे मुळात असायला लागते तसेच अभिनयाचेही आहे. तो रक्तात असावा लागतो. प्रत्यक्षात मात्र अनेक गायक गायिकांनी संगीत रंगभूमीवर अभिनय केला. यशही मिळवलं. परंतु त्यांना प्रारंभी नाटक कंपन्यांमध्ये अभिनयाचे धडे गिरवायला लागलेच. कंपन्यांच्या पदरी अभिनय शिकविण्यासाठी माणसे नेमलेली असत. एखाद्या गायक गायिकेला अभिनयात तयार करून घेण्याची त्यांची जबाबदारी. या शिवाय बुजुर्ग नट अशा गायकांना अभिनयाचे धडे देत.

अज्ञान (Ig) - नोबेल पुरस्कार : विनोदातून विचाराकडे !

लेखक हेमंतकुमार यांनी शनिवार, 14/09/2019 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
पुढच्या महिन्यापासून २०१९चे नोबेल पुरस्कार जाहीर होऊ लागतील. संपूर्ण संशोधक जगताचे त्याकडे लक्ष असते. ते पुरस्कार सन्मानाचे असतात. पण त्यापूर्वीच या महिन्यात एक विचित्र प्रकारचे पुरस्कार आपले लक्ष वेधून घेतात. त्यांचे नाव शीर्षकात दिलेच आहे. आता वळतो या Ig- नोबेल पुरस्कारांकडे. १९९१ पासून दरवर्षी सप्टेंबरमध्ये हे पुरस्कार अमेरिकेत दिले जातात. मार्क अब्राहम या संपादकाने हा अनोखा उपक्रम चालू केला. हा गृहस्थ एका शास्त्रीय विनोदाच्या मासिकाचा संपादक आहे. हे पुरस्कार उपरोधिक हेतूने दिले जातात. त्यासाठी १० संशोधने निवडली जातात, जी किरकोळ किंवा विचित्र प्रकारची असतात !

अनामिक ( Unknown)

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 14/09/2019 19:38 या दिवशी प्रकाशित केले.
तुझा नंबर unknown म्हणून सेव्ह केलाय. तू स्त्री की पुरुष काहीच माहीत नाही मला. वय माहित नाही, कुठे मुक्काम माहित नाही. काम काय करतोस/ करतेस ते माहीत नाही. तू म्हणावं की तुम्ही? माहीत नाही. आणि एकदम extreme बोलायचं झालं तर तू जिवंत आहेस नाहीस, हेही माहीत नाही. गेल्या आठ वर्षांत किती मोबाईल बदलले, किती नंबर डिलिट केले. किती माणसांना आयुष्यातून वजा केलं. पण तुझा नंबर अजूनही आहे. कधी हिंमत केली नाही मेसेज किंवा फोन करायची. आणि केला फोन तर काय सांगणार? आपण कधीच भेटलो नाही, एकमेकांना ओळखत नाही असं? पहिल्या वाक्याला फोन कट होईल. कारण मी कोण आणि तुझा नंबर माझ्याकडे कसा हे इतकं वेडेपणाचं आहे.

धन वर्षा...

लेखक दिनेश५७ यांनी शनिवार, 14/09/2019 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
एका मऊशार दुपट्यात लपेटलेला तो एवढासा जीव निगुतीने सांभाळत ती गाडीतून उतरली आणि थेट डॉक्टरसमोर जाऊन तिने दुपटं अलगद उघडलं. आतला जीव मलूल पडला होता. तळव्यावर जेमतेम मावेल एवढं लहानसं, तपकिरी रंगाचं कोणतीच हालचाल न करणारं आणि जिवंतपणाचं कोणतच लक्षण दिसत नसलेलं कासव टेबलावर डॉक्टरांच्या समोर पडलं होतं, आणि चिंतातुर नजरेनं ती डॉक्टरांकडे पाहात उभीच होती. डॉक्टरांनी तो जीव उचलून हातात घेतला, उलटा केल्याबरोबर त्याची बाहेर आलेली मान उलट्या दिशेने कलंडली. मग त्यांनी त्याच्या पायाला स्पर्श केला. निर्जीवपणे तो लोंबकळत होता. डॉक्टरांनी निराशेने नकारार्थी मान हलविली. ते कासव मेलं होतं.