Skip to main content

मी अजिबात घाबरत नाही....! - ३

लेखक मृणालिनी यांनी मंगळवार, 15/10/2019 18:02 या दिवशी प्रकाशित केले.
जमेल तितक्या वेगाने गाडी पळवत मी पलाश मार्गावर पोचलो. तिची कार तिथेच बंद अवस्थेत उभी होती. माझ्या उरात धडकी भरली. मी जवळ गेलो आणि जीवात जीव आला. ती आत बसली होती. मोबाईल कानाला लाऊन. मी बाहेरून खिडकीवर मध्यमा आणि तर्जनीच्या पाठमोऱ्या बाजूने टकटक वाजवलं आणि ती चांगलीच दचकली. काहीतरी बोलली आनंदानी. मी तिला काच खाली घ्यायची खूण केली आणि तिने सरळ दार उघडून मला घट्ट मिठी मारली. घामाघूम झाली होती अक्षरश: "बरं झालं आलास. तुझा फोन का लागत नव्हता रे? किती घाबरले होते! बघ गाडी बंद पडली अचानक." त्या पक्याला मी सोडणार नाही. मागच्या वेळी माझी गाडी बंद पाडली.

काउन्टिंग (Counting)- शशक.

लेखक प्राची अश्विनी यांनी मंगळवार, 15/10/2019 14:22 या दिवशी प्रकाशित केले.
शंभर, नव्व्याण्णव, अठ्ठ्याण्णव आई म्हणायची राग आला की उलटे आकडे मोजायचे. एकुणनव्वद, अठ्ठ्याऐशी..सत्त्याऐशी मग राग पळून जातो म्हणे... एक्क्याऐशी, ऐंशी .... ऐंशीच्या आधी काय?? नेहमीच चुकतं माझं इथे. अंअं आठवलं, सत्तर, एकोणसत्तर.. पण मग बाबा का नाही म्हणत उलटे अंक कधी ? बाबांना मात्र आई कध्धीच काही सांगत नाही की रागवत नाही. सगळी शिकवणी काय ती मलाच. चव्वेचाळीस, त्रेचाळीस... तरी बाबा रागावतात तिला. मारतात सुद्धा. हे काय आत्ता पण किती मारलं. किती हलवलं तरी उठतच नाहीये ती. चोवीस, तेवीस... मग? मला राग नाही येणार बाबांचा?

झोपा ग्राहक झोपा...

लेखक आजी यांनी मंगळवार, 15/10/2019 13:11 या दिवशी प्रकाशित केले.
मी महिला मंडळाच्या एका पिकनिकला गेले होते. रस्त्यात मी एक दुकान पाहिलं. त्यात अनेक वस्तू होत्या. वेगवेगळी मशिन्स होती. अननसाची सालं काढायचं मशीन, त्याच मशीनमधे त्याच्या गोल चकत्या सुद्धा होत होत्या. बटाट्याच्या चकत्या करायचं मशीन होतं. सुईत दोरा ओवायचं मशीन, पुढच्या १०० वर्षांचं कँलेंडर, सफरचंदाच्या कमळासारख्या पाकळ्या करायचं मशीन. काही विचारु नका. मला इतकी भुरळ पडली की मी हरखून गेले. तो विक्रेता प्रात्यक्षिक करुन दाखवत होता. पिकलेल्या टोमॅटोचे बाहेर रस न सांडता पातळ काप करुन दाखवत होता. त्याचं ते करणं म्हणजे मला अशक्यप्राय चमत्कार वाटत होता.

आमार कोलकाता - भाग ५

लेखक अनिंद्य यांनी मंगळवार, 15/10/2019 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
लेखमालेचे यापूर्वीचे भाग इथे वाचता येतील : भाग १ - http://www.misalpav.com/node/45320 भाग २ - http://www.misalpav.com/node/45361 भाग ३ - http://www.misalpav.com/node/45433 भाग ४ - https://misalpav.com/node/45481 आमार कोलकाता - भाग ५ कोलकाता शहराची खास अशी जी लक्षणे आहेत त्यात शहरवासियांचे नाट्यवेड हे प्रमुख आहे आणि ते

जोकर

लेखक श्रीरंग यांनी मंगळवार, 15/10/2019 07:06 या दिवशी प्रकाशित केले.
जोकर.. DC चित्रपट विश्वातील सुपरहिरो इतकंच प्रचंड लोकप्रिय पात्र. किंबहुना, आजवरच्या सर्वात लोकप्रिय खलनायकांपैकी एक. अत्यंत विक्षिप्त, विदूषकाच्या मुखवट्याआडून थंडपणे गुन्हे करणारा, अंगावर काटा आणणारा खलनायक हिथ लेजर यांनी डार्क नाईट चित्रपटातून एका वेगळ्याच उंचीवर नेऊन कल्पनेपलिकडे लोकप्रिय करून ठेवला आहे. टॉड फिलिप्सने दिग्दर्शित केलेला "जोकर" हा चित्रपट याच जोकरचे पूर्व कथानक, म्हणजेच आर्थर फ्लेचर याची विकृत क्रूरकर्मा जोकर बनण्यापुर्वीची कथा आहे. आर्थर फ्लेचर हा एक साधा सरळ मध्यवयीन इसम. गॉथम शहरात, आपल्या आईबरोबर अगदी बेताच्या परिस्थितीत दिवस काढणारा.

गंदीकोटा आणि बेलम गुहा - १

लेखक एक_वात्रट यांनी सोमवार, 14/10/2019 21:43 या दिवशी प्रकाशित केले.
मला फिरायला प्रचंड आवडतं. आणि फिरण्याखालोखाल मला काही आवडत असेल तर ते प्रवासवर्णनं वाचणं. हाताशी भरपूर रिकामा वेळ असावा, एखाद्या सुंदर जागेचं रसाळ भाषेत केलेलं प्रवासवर्णन समोर असावं, आणि हातात कॉफीचा कप असावा, अहाहा, क्या बात है! असाच एकदा मी (ऑफिसात काम करण्याऐवजी) प्रवासवर्णनं धुंडाळत बसलेलो असताना अचानक एक वेगळं प्रवासवर्णन समोर आलं. ‘गंदीकोटा आणि बेलम गुहा’ या दोन जागांचं. ही नावं तेव्हा मी पहिल्यांदाच ऐकत होतो. मी ते फोटो पाहिले आणि वेडाच झालो. अशा काही जागा आपल्या भारतात आहेत यावर ते फोटो समोर नसते तर मी विश्वासच ठेवला नसता. तेव्हा लगेच सुरू झालं त्यांची माहिती काढायचं काम.

गुण्या-गोविंदा

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 14/10/2019 13:52 या दिवशी प्रकाशित केले.
दोन भाऊ होते. एक मोठा होता, आणि दुसरा धाकटा होता. कारण ते जुळे नव्हते. अगोदर जन्माला आलेला भाऊ सुरुवातीला काही दिवस मोठा भाऊ होता. नंतर धाकटा भाऊ म्हणाला, आता मी मोठा भाऊ! मोठा म्हणाला, ठीक आहे. मग या वेळी मी धाकटा!... अशा रीतीने दोघे भाऊ गुण्यागोविंदाने रहात होते. पुढे काही वर्षे गेली आणि पोटापाण्याचा व्यवसाय म्हणून काहीतरी करावयास हवे असे दोघांनाही वाटू लागले. पण दोघेही स्वतंत्र विचाराचे आणि स्वाभिमानी बाण्याचे असल्याने, आपला निर्णय आपणच घ्यायचा हे दोघांनीही ठरविले होते.

समीक्षा

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी सोमवार, 14/10/2019 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
रविवार दिनांक 13-10-2019 च्या ‘महाराष्ट्र टाइम्स, संवाद’ पुरवणीत डॉ. सयाजी पगार यांनी लिहिलेले ‘मी गोष्टीत मावत नाही’ या कादंबरीवरचे परीक्षण: व्यापक मनोविश्वाची प्रायोगिक कादंबरी - डॉ. सयाजी पगार एकविसाव्या शतकाच्या प्रारंभ काळात प्रयोगात्मक मूल्यांच्या बंदिस्त जोखडात जखडलेल्या कादंबरी लेखनाला नवा आयाम देत नव्याने क्रांती करत डॉ. सुधीर देवरे यांनी ‘मी गोष्टीत मावत नाही’ ही कादंबरी सिद्ध केली आहे. या कादंबरी लेखनाचे वैशिष्ट्य म्हणजे मराठीत ‘यमुनापर्यटन’ या पहिल्या कादंबरीपासून ते आजतागायत ज्या कादंबर्यात लिहिल्या गेल्यात त्या सर्वच सलग लेखनात आहेत; त्याला ही कादंबरी अपवाद ठरते.

जुळे नवरे, जुळ्या नवर्‍या

लेखक पाषाणभेद यांनी रविवार, 13/10/2019 22:54 या दिवशी प्रकाशित केले.
एका पुरूषांच्या जुळ्यांच्या जोडीचे स्त्री जुळ्यांच्या जोडीशी जुळले (जोड्या स्त्री-पुरूषांच्या होत्या. आधीच खुलासा केला.