Skip to main content

दोसतार - ३१

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 07/01/2020 08:04 या दिवशी प्रकाशित केले.
कौरवांच्या चक्रव्युहात अडकावा तसा तो प्रश्नांच्या गराड्यात अडकला होतात. शाळेत नक्की काय झालंय ते त्याला माहीत होते. या सगळ्यातून शाळेत वाघ आला होता. तो पाण्याच्या टाकी च्या आसपास फिरताना कोणीतरी पाहिले होते हे समजले . आमचे चेहरे या वेळेस कोणी पाहिले असते तर त्याला त्यावर भिती आनंद उत्सुकता गम्मत असे सगळे काही नाचताना दिसले असते. मागील दुवा : http://misalpav.com/node/45852 शाळेत वाघ आला होता. हे सगळ्यांना कळाले. पण वाघ शाळेत का आला ते मात्र कळत नव्हते. शाळेतच का आला ? का म्हणजे ? वाघाला जायला कित्तीतरी ठिकाणे आहेत गावात. तो तिकडे का गेला नाही.

कूर्ग डायरीज १

लेखक अभिरुप यांनी सोमवार, 06/01/2020 19:13 या दिवशी प्रकाशित केले.
कूर्ग डायरीज बरेच दिवस माझ्या आणि माझ्या कुटुंबाच्या मनात होते कि कुठे तरी बाहेर फिरायला जावे पण ठिकाण नक्की होत नव्हते. तसा माझा प्रवासाचा अनुभव मर्यादितच आहे. माझा बहुतेक प्रवास हा माझ्या गावाच्या आजूबाजूलाच जास्त झाला आहे म्हणजे सातारा , पुणे ,सोलापूर आणि कोल्हापूर व कोकण इतकाच. मुळात मला स्वतःला फिरायला खूप आवडते. कॉलेजला असताना पिकनिक आणि ट्रेकिंगमुळे काही पर्यटनस्थळे फिरण्याचा योग्य आला होता , अर्थात तो अनुभव सुद्धा भन्नाटच होता. परंतु गृहस्थाश्रमात प्रवेश केल्यानंतर कुटुंबासमवेत प्रवास हा मर्यादित स्वरूपाचाच राहिला. त्यामुळे हि सहल प्लॅन करणे थोडे कठीणच वाटत होते.

मन्या व्हर्सेस अंबानी..

लेखक चिनार यांनी सोमवार, 06/01/2020 17:48 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या मन्यानी नवीन वर्षाचा संकल्प वगैरे करणं कधीच सोडलं आहे. वारंवार संकल्प करून तो पूर्ण न करणं, मग त्याची लाज वाटणं,मग स्वतःला दोष देणं आणि ह्यातून हळूहळू निगरगट्ट होण्याकडे झुकणं अन फायनली निगरगट्ट होणं ह्या सगळ्या स्टेजेस मन्याने पार केल्या आहेत. आता त्याच्यासमोर कोणी न्यू इयर रिझोल्युशन वगैरे गोष्टी सुरु केल्या की मन्या मनातल्या मनात हसतो. तरीसुद्धा खूप वर्षांपासून मनात असलेला पण कधीही पूर्णत्वास न गेलेला, सकाळी नेहमीच्या वेळेपेक्षा पंधरा मिनिटे लवकर उठण्याचा निर्णय यंदा मन्याने घेतला होता.

"स्पॉंजी दहीवडा "

लेखक पियुशा यांनी रविवार, 05/01/2020 17:50 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी , कसे आहात ? सगळयांना हॅपी वाला न्यूइअर _/\_ एकेकाळी मिपाचा पाककृती विभाग नुसता ओसंडून वाहत होता. त्यात माझ्या पण बर्याच रेसेपी यायच्या लगोलग ;) एकतर मिपावर नवीन त्यात भारीचा उत्साह ! केलं काही का टाक मिपावर ! आणि प्रतिसाद आले कि जाम भारी वाटायचं रात्री अपरात्री मोबाईल चेकवून किती प्रतिसाद आलेत ते पाहिलं जायचं, कमी असतील तर काउंट वाढवण्यासाठी लोकांच्या खरडीत जाऊन " ओ माझी रेसेपी नाही वाचली का ?

हम जो चलने लगे, चलने लगे हैं ये रास्ते! (चिपळूण - कोळथरे - चिपळूण सायकल फेरी )

लेखक मालविका यांनी रविवार, 05/01/2020 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
तर हि कथा आहे एका कुटुंबाची त्यातल्या मुख्य माणसाला अर्थात कर्त्या पुरुषाला सायकल चालवण्याचं भरपूर वेड आहे. त्याचं हे वेड बघून त्याचा मुलगा देखील त्याच्याच पावलावर पाऊल ठेवून सॉरी पॅडल वर पॅडल मारून ते वेड सार्थ ठरवतोय. सायकल चालवणं तब्येतीसाठी कसं चांगलं आहे हे पटवून या माणसाने त्याच्या बायकोला देखील नादी लावलं आहे. आता जमेल तेव्हा हे तिघे जण सायकलवरून चकरा मारत असतात. तर हि अशी वेडी ‘’The Cycling Family’’ म्हणजेच आम्ही तिघे… मी, नवरा श्रीनिवास नि मुलगा ईशान (वय वर्ष ८ पूर्ण).

पंखा

लेखक मायमराठी यांनी शुक्रवार, 03/01/2020 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
।। पंखा ।। एप्रिल- मे मधील दहावीचे सुट्टीतले वर्ग सुरू होते. गरागरा फिरणाऱ्या पंख्याखाली बसूनही घामाच्या धारा लागलेले विद्यार्थी , त्या धारांशी रुमालांनी लढत होते. मधेच वहीच्या पुठ्ठ्यांनी वारा घ्यायचा फुका प्रयत्न. आजकालचे पुठ्ठेही तसे तकलादूच. मुलंमुली भिजलेल्या चोळामोळा झालेल्या रुमालाने कसेबसे स्वतःला गोळा करत करत अभ्यासाकडे नेत होते. एरवी तसाही गणिताने घाम फुटतोच त्यात उन्हाळ्याच्या नवीन समीकरणांची भर पडली होती! अचानक न जाणे कुठून एक बुलबुल पक्षी खिडकीतून पंख्याकडे झेपावला.

अनुवादित - अनिकेतन

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी शुक्रवार, 03/01/2020 18:21 या दिवशी प्रकाशित केले.
ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन रूप रूपांना ओलांडून कोटि नावांना पार करून छातीनी चीरून भावचा भाला ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन शंबर धर्मांचा भुसकट पाखडून सर्व तत्वांने मागे सोडून दिगंताचा शेवटपर्यंत चडून ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन कुठेही थांबू नको कधीही घर बांधू नको अंत्याना कधी पोहोचू नको ओ अनंत ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन अनंत ही अनंत होवत तो नित्ययोगी अनंत तू अनंत ह्वा ह्वा ह्वा ह्वा ह्वा ओ माझा चेतना ह्वा तू अनिकेतन - मूल कन्नड राष्ट्रकवि 'कुवेम्पु' अंग्रेजि The Song Of the Universal Man Be unhoused, O my soul ! Only the infinite is your goal. Leave those myriad forms

अनुवादित मंकु तिम्मन कग्ग - १

लेखक रोहित रामचंद्रय्या यांनी शुक्रवार, 03/01/2020 17:09 या दिवशी प्रकाशित केले.
गवत ह्वा डोंगरा खाली घराला मोघरा ह्वा दगड ह्वा कष्टांचा पाऊस पडला तरी गुळ साखर ह्वा दीन दलिताला सर्वांत मिसळून जा मंकु तिम्मा - कन्नडा मूल 'डी वि गुंडप्पा'

दिल की बाते

लेखक अनाहूत यांनी शुक्रवार, 03/01/2020 09:11 या दिवशी प्रकाशित केले.
खुद को आईने में देखकर जरूर इतराना जिनके हम जैसे दिवाने होते है उनका खुदपर गुरूर करना लाजमी है और हाँ खुबसुरत तो तुम हो ही पर आज तो रोजसे ज़ादा हसीन दिख रही हो क्या करू प्यार ही इतना है के तुझे देखे बिना तेरा चेहरा पढ लेता हूँ इसका मतलब ये ना समझ लेना की तुझे देखे बिना ही खुश हूँ मेरी तो हर सुबह तेरा चेहरा देख कर ही शुरू होती है और तेरा चेहरा देख कर ही सो पाते है हम चैन से मेरा प्यार है तू हमेशा मुस्कुराती रहना तेरा मुस्कुराता चेहरा जीने की वजह है मेरी कभी तेरे चेहरे पे मायूसी ना आने देना मेरी जीने की वजह को मिटने ना देना हा तुझे गुस्सा देता रहूँगा बार बार क्या करू ऐसे ही बहुत हसीन हो पर

जगभर संकल्पज्वराच्या साथीचे थैमान, "कोण" चा इशारा

लेखक चामुंडराय यांनी गुरुवार, 02/01/2020 00:15 या दिवशी प्रकाशित केले.
जागतिक स्वास्थ्य संघटना (कोण) यांनी सूचित केल्याप्रमाणे सध्या जगभर संकल्पज्वराची साथ आलेली आहे. संघटनेने पत्रक काढून असे जाहीर केले आहे की ही साथ अतिशय वेगाने पसरणारी आणि संसर्गजन्य आहे. विशेषतः आरंभशूर मंडळींना ह्या साथीच्या ज्वराची लागण लगेच होते असे निरीक्षण नोंदवले आहे. आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे कित्येकदा ही लागण सामूहिक असते असे मत व्यक्त केले आहे. या आजारासाठी कोणत्याही उपचाराची गरज नसून फक्त थोडा वेळ जाऊ द्यावा लागेल आणि साथीची तीव्रता कमी होत जाईल. सामूहिक लागण असेल तर एक एक सदस्य ह्या आजारातून आपोआप बरे होत अंतिमतः केवळ एक किंवा दोन सदस्यांना उपचाराची गरज असेल.