Skip to main content

बहिणीला जपणारी मारग्रेट

लेखक महामाया यांनी बुधवार, 12/02/2020 19:31 या दिवशी प्रकाशित केले.
Music For Millions ---------------------- गेल्या शतकांत बॉलीवुड प्रमाणेच हॉलीवुड मधे देखील अविस्मरणीय चित्रपट आले. पैकी काही चित्रपट बघतांना वाटलं की आपण हिंदी चित्रपट इंग्रजीत बघताेय की काय...अंतर होता तो सादरीकरणाचा. इथे अशाच काही इंग्रजी चित्रपटांमधील तो अविस्मरणीय प्रसंग, जो त्या इंग्रजी चित्रपटाला आपल्या बाॅलीवुडच्या चित्रपटाहून वेगळा ठरवतो... आठवणीतला हॉलीवुड रवींद्र दत्तात्रय तेलंग अकल्पितपणे घडून आलेल्या योगाची लज्जत न्यारीच असते. सारखं कथानक असलेले दोन चित्रपट बारा तासांच्या आत बघण्याचा योग असाच एकदा मिळाला-एक हॉलीवुडचा, एक बॉलीवुडचा.

कोण कुठली रोहिणी

लेखक Rohini Mansukh यांनी बुधवार, 12/02/2020 10:05 या दिवशी प्रकाशित केले.
अगणित आकाशगंगा अगणित सूर्य गगनी अगणित असती धरणी त्यातून कोण कुठली रोहिणी? काय तिचे सुख नि काय तिचे दुःख विश्वाच्या उलाढालीपुढे आहे ते नगण्य काय तिचे हेवे नि काय तिचे दावे एवढ्या भव्य संसारापुढे क्षुद्र ते ठरावे काय तिचे ज्ञान काय तिचे विज्ञान चराचराच्या गूढापुढे नाही त्याला स्थान म्हणूनच नम्र रहावे तिने गर्व नको तिच्या मनी अगणित मानवांमधून एक आहे कोण कुठली रोहिणी - सौ. रोहिणी विक्रम मनसुख
काव्यरस

एकदाच ओलांडून अंतर...

लेखक प्राची अश्विनी यांनी बुधवार, 12/02/2020 09:07 या दिवशी प्रकाशित केले.
एकदाच ओलांडून अंतर पोहोचले मी तव हृदयाशी, आठवते का तुला अजुनी घडले जे जे काही नंतर? उभी राहुनी टाचांवरती, ओठ भिडवले धिटपणाने. दात पकडती अलगद हल्लक ओठांमधली मधाळ साखर.. वितळून गेले सभोवतालच, विसरून गेले काळवेळ मी. हात शोधती अधीर काही स्पर्शही झाला हळवा कातर... नको घडाया भलते काही मनावरी ठेवलास पत्थर पण... मिठी अशी ती कातील होती अजून होते तनात थरथर...
काव्यरस

गावाकडच्या गोष्टी 1

लेखक प्रमोद पानसे यांनी मंगळवार, 11/02/2020 22:35 या दिवशी प्रकाशित केले.
गावाकडल्या गोष्टी 1 लहानपणी म्हणजे तिसरी चौथीत असताना पतंग नव्हती उडवता येत.पण कटलेल्या पतंगी पकडण्याचा आणी मांजा गोळा करण्याचा भयंकर सोस होता. एखादी पतंग पकडली की मी तीचा मांजा वितावर आठ्या घालुन घरी आणायचा .आणी काकाच्या आसारीला तो गुंडाळायचा.माझ्या काकाला पतंग उडवायचा नाद होता.पण त्याच्या आसारीला असलेला सगळा मांजा मीच आणलेला असायचा.त्याबदल्यात निलकमल थिएटरात बच्चनचे सिनेमे बघायला मिळायाचे.काकाची वट होती तीथे.दर शुक्रवारी मला न्यायचा . एकदा घराच्या वर्हंड्यावर असलेल्या पत्र्यावर उतरुन जांभळात अडकलेली पतंग सोडायच्या प्रयत्नात गंजलेला पत्रा फाटुन दहा फुटावरुन वर्हांड्यात ढुंगणावर आपटलेलं आठव

शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग ३

लेखक AKSHAY NAIK यांनी मंगळवार, 11/02/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेगाव सोडण्यास साधारण दुपारचे १२ वाजत आले होते. शेगाव ते माहूर अंतर साधारण २०० किमी असल्यामुळे चार ते पाच तासात माहूर मध्ये पोहचू असे असे ग्रहीत धरले होते. मात्र शेगाव ते माहूर हा रस्ता माझ्या ड्रायविंग ची परीक्षा पाहणारा होता असे म्हणले तरी वावगे ठरणार नाही. गुगल वाल्या काकूंनी रेकमेंड केल्यामुळे मी शेगाव-उमरखेड-वाशीम-पुसद-माहूर हा मार्ग निवडला. शेगाव सोडल्यानंतर साधारण पन्नास एक किमी रस्ता चांगला वाटला. मात्र त्यानंतर रस्त्यांची अर्धवट चालू असलेली कामे आणि हातभर खड्डे यांचा सामना करीत मार्ग काढावा लागला.

दोसतार- ३६

लेखक विजुभाऊ यांनी मंगळवार, 11/02/2020 07:41 या दिवशी प्रकाशित केले.
शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते. तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन. मागील दुवा : http://misalpav.com/node/46058 मंगळवारची तयारी शनिवारपासूनच चालू झाली. शनिवारी शिक्षकांकडून त्या त्या विषयाची पुस्तके घेणे आणि काय शिकवायचे आहे हे समजून घेणे ही पहिली पायरी. प्रत्येकानेच पार पाडली. मी ऑफ तास घेणार होतो. ऑफ तास म्हनजे कोणी शिक्षक रजेवर असतील किंवा आजारी असतील शाळेत आलेले नसतील त्यांच्या ऐवजी वर्गावर जाऊन बसायचे.

प्रतिमांचे शिकार

लेखक सर टोबी यांनी सोमवार, 10/02/2020 18:19 या दिवशी प्रकाशित केले.
आपण वेगवेगळ्या प्रतिमांचे नकळतपणे शिकार होत असतो. कुठले तरी ठिकाण, एखादा सिनेमा, एखादं हॉटेल खूप छान आहे अशी प्रसिध्धी असते. त्या ठिकाणी आपण जातो परंतु कित्येक वेळेला येणार अनुभव जे काही ग्रेट वगैरे ऐकलेले असते त्याच्या जवळपास तर सोडाच पण भिकार म्हणावा इतका वाईट असतो. आपण किती भिडस्त किंवा फटकळ आहोत त्यानुसार आपण जमेल तसा आपला अनुभव व्यक्त करतो. पण काही प्रतिमा तर त्याहून बळकट असतात. म्हणजे इतक्या कि जर आपल्याला सर्वमान्य अनुभव आला नाही तर आपल्यातच काही तरी उणीव आहे म्हणून आपण स्वतःला दोष देतो.

भाग २ - भोपाळचा सापळा - 'या सम हा' ग्रंथातील समराचे प्रस्तूतीकरण

लेखक शशिकांत ओक यांनी सोमवार, 10/02/2020 13:16 या दिवशी प्रकाशित केले.

भाग २ - भोपाळचा सापळा - 'या सम हा' ग्रंथातील समराचे प्रस्तूतीकरण

मेजर जनरल शशिकांत पित्रे यांच्या लेखनातून निर्माण होणारे समर पॉवर पॉईटने आजच्या काळातील नकाशांच्या मदतीने साकारता येईल का? असेल तर कसे करता येईल? यावर आधारित आहे. लेखकाचे कथन काही ठिकाणी स्लाईड्सच्या आकाराला पुरक व्हावे इतपत संकलित सादर केले आहे. कोणतेही नवे संशोघन केल्याचा दावा खुद्द लेखक करत नाहीत. मस्तानी व अन्य कौटुंबिक व्यक्तींचा, घटनांचा समावेश ग्रंथात नाही. उपलब्ध माहितीच्या आधारे प्रत्येक लढाईचे लष्करी मोजमापातून विश्लेषण हा प्रमुख उद्देश आहे.

शेगाव दर्शन व माहूर यात्रा भाग २

लेखक AKSHAY NAIK यांनी रविवार, 09/02/2020 19:09 या दिवशी प्रकाशित केले.
दिवस ०२/०२/२०२० शेगाव दर्शन आणि माहूर कडे प्रस्थान २ तारखेची ती पहाट खूपच रम्य वाटत होती.वडील तर पहाटे सहा वाजता सर्व आवरून दर्शनासाठी जाण्यास तयार झाले होते. सकाळी लवकर गेल्यास दर्शन लवकर होईल व गर्दी नसेल असा त्यांचा कयास होता. शेवटी मी माझी लहान मुलगी आणि पत्नी आम्ही देखील सगळे लवकर उठून ७ वाजेपर्यंत तयार झालो, तोपर्यंत माझे वडील व आई यांचा आनंद विहार चा एक फेरफटका मारून झाला होता. सकाळी साधारण सव्वासात च्या दरम्यान आम्ही सगळे रूम मधून बाहेर पडलो. खाली येवून पाहतो तर नजारा काही औरच होता, आपण कोणत्या युरोपीय देशात तर नाहीत ना असे सारखे वाटू लागले.

सनकी भाग १०

लेखक शब्दांगी यांनी रविवार, 09/02/2020 08:44 या दिवशी प्रकाशित केले.
शिवीन आणि रिचा आज लवकरच घरी गेले. शिवीनने रिचाला तिच्या घरी सोडले व तो घरी गेला. त्याच्या आईने हाताला पट्टी पाहून काय झाले म्हणून विचारले.शिवीनने आईला सगळा वृत्तांत सांगीतला. शिवीनची आई काळजीत पडली. तिने रिचा कशी आहे? तिला तर जास्त लागले नाही ना? मग तू हॉस्पिटलमध्ये का नाही गेलास?डॉक्टरला बोलावू का? पोलीसात तक्रार केली का?अशा अनेक प्रश्नाचा शिवीनवर भडिमार केला. शिवीनने तिला खुर्चीत बसवले व काळजी करण्याचे काही कारण नाही असे म्हणून तिची समजून काढली.हो पोलीसात तक्रार केली आहे. पण गाडीला नंबर प्लेट नव्हती त्या मुळे काही उपयोग नाही झाला.अस त्याने सांगीतले.