Skip to main content

पुणे ते कन्याकुमारी - ३ : निपाणी ते कित्तुर

लेखक आबा पाटील यांनी शुक्रवार, 17/04/2020 12:30 या दिवशी प्रकाशित केले.
पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - पुणे ते कराड पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल) - २: कराड ते निपाणी 17 डिसेंबर 2018 सोमवार मला असे कधी वाटले नव्हते की आपण खरेच पुणे कन्याकुमारी सायकल प्रवास करू, बरेच महिने, दिवस चर्चा चालली होती आणि आम्ही चौघे खरोखरच प्रवासाला निघालो होतो, प्रवासाचा तिसरा दिवस सुरू झाला होता. काल रात्री पूजा हॉटेलला मस्त आणि चविष्ठ जेवण झाले आणि हॉटेल सूर्याला छान झोप झाली .

थायलंड डायरीज !!!! - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

लेखक अभिनाम२३१२ यांनी शुक्रवार, 17/04/2020 02:27 या दिवशी प्रकाशित केले.

भाग १ - मुंबई टू फुकेत वाया सिंगापूर

रात्री ११.३५ च फ्लाईट होत . घरापासून विमानतळ २० मिनिटावर होता म्हणून काही टेन्शन नव्हत. मॅडमच्या सवयी प्रमाणे ३ तास आधी छत्रपती शिवाजी मुंबई विमानतळावर पोचलो.

शटडाऊन

लेखक अभिनव प्रकाश जोशी यांनी गुरुवार, 16/04/2020 23:19 या दिवशी प्रकाशित केले.
थंडी संपून उन्हाळ्याचे संकेत देणाऱ्या थोड्याश्या गर्मीचे दिवस होते. कामतकाकांच्या जुन्या घड्याळाने दहाचा टोला दिला आणि तेवढ्यातच बरोब्बर १०:३० ला होणाऱ्या देवकीकृष्णाच्या आरतीला सुरुवात झाली. वास्तविकतः कामत काकांचे अर्धा तास पाठी असलेले पिढीजात घड्याळ कोणाचाच हात पोचणार नाही अश्या उंचीवर त्यांच्या आज्याने लटकवले होते. ते निखळवून सारखे करण्यास म्हणून खास अनंत मेस्तास स्टूलाची आर्डर दिली होती. पावसात दार उघडताना व बंद करताना खालून लागत होते ते नीट करण्यास जो अनंत आला नाही त्याचे स्टूल इतक्यात कुठे पोचणार !