Skip to main content

[शशक' २०२०] - गृहिणी

लेखक स्मिताके यांनी गुरुवार, 16/04/2020 या दिवशी प्रकाशित केले.

गृहिणी




कशी असेल बबडी कुणास ठाऊक. दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन. चांगलं स्थळ आणलं होतं वहिनींनी, पण हिच्या डोक्यात भलतंच. काय म्हणे, घर सांभाळत नाही बसणार. स्टार व्हायचं होतं ना तिला! पाळण्यात पाय दिसत होतेच म्हणा.. नटणं, मुरडणं, नाच, नाटक. वहिनी म्हणाल्या होत्या, "बाकी कसली अट नाही त्यांची. फक्त घर नीट सांभाळावं , इतकंच. घरात बाईमाणूस नाही ना दुसरं?” कसलं काय? निघूनच गेली बया घरातून. मुंबईला टीव्हीवर नाहीतर सिनेमात काम करणार म्हणून. कळवते अधूनमधून, सेल्सगर्ल आहे, नाटकात छोटं काम मिळालं म्हणून. पण पुढे काय? "हॅलो..बोला वहिनी." "अहो, टीव्ही लावा लवकर! तुमची बबडी नव्या सिरियलीत! कामसू सोज्वळ गृहिणीच्या भूमिकेत शोभतेय हो!"


वाचने 8694
प्रतिक्रिया 19

प्रतिक्रिया

+१ मस्त

+१ झकास ! बबडी स्क्रिनवर का होईना, सोज्वळ गृहिणी !

+१

नियती.. छान मांडलंय! आवडेश!

+१

सोज्वळ गृहिणी का होईना, बबडी टिव्हीवर आली!

+1

+१

+१

+१ आवडली!

मस्त आहे ही गोष्ट!! 'सोज्वळ गृहिणी' बद्दल कथा लिहणाऱ्या, त्यांच्या भूमिका वठवणाऱ्या (किंवा जालावर त्यांचा उदोउदो करणाऱ्या ;)) स्त्रिया स्वतःमात्र 'वर्कींग वूमन' असतात; किती तो दांभिकपणा! किंवा मार्केटची गरज ;) +१

+1

+१

+१

हुश्श्य....
दोन वर्षं झाली तिला मुंबईला जाऊन.... नटणं, मुरडणं, नाच, नाटक..... निघूनच गेली बया घरातून....
हे वाचून मला या कथेची आठवण येऊन धस्स झाले होते, पण शेवटी 'सिरीयलीत' वाचून जीव भांड्यात पडला. छान आहे शशक.