Skip to main content

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण ३ - ज्ञानी

लेखक मूकवाचक यांनी बुधवार, 10/06/2020 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
स्वरूपबोधविषयक या प्रकरणात आपण 'ज्ञानी' या संकल्पनेविषयीचे रमण महर्षींचा उपदेश जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी भगवद्गीतेच्या अध्यात २ मधे स्थितप्रज्ञ कसा ओळखावा? त्याचे/ तिचे व्यावहारिक जगातले वर्तन कसे असते? या अनुषंगाने अर्जुनाने विचारलेल्या प्रश्नाचे (भगवद्गीता श्लोक २.५४) सविस्तर उत्तर (भगवद्गीता २.५५ ते २.७२) तसेच भगवद्गीतेच्या अध्याय १२ मधे आलेले ज्ञानी भक्ताचे वर्णन (भगवद्गीता श्लोक १२.१३ ते १२.२०) वाचणे खचितच उपयुक्त ठरेल. हा संदर्भ सहज उपलब्ध असल्याने तसेच विस्तारभयास्तव तो इथे समाविष्ट केलेला नाही.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण २ - स्वरूपाचे भान, स्वरूपाविषयीचे अज्ञान आणि साधकांच्या श्रेणी

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 23:55 या दिवशी प्रकाशित केले.
मागच्या प्रकरणात 'स्व' च्या मूळ स्वरूपाविषयीचे रमण महर्षींचा उपदेश थोडक्यात समजावून घेतल्यावर आता तोच धागा पकडून साधकांचे प्रकार किंवा त्यांच्या श्रेणींबद्दल महर्षींचा दृष्टीकोन या प्रकरणात बघायचा आहे. तत्पूर्वी मराठी संत साहित्यातला एक संदर्भ आवर्जुन देतो. पावसच्या परमहंस स्वामी स्वरूपानंदांच्या वर-प्रार्थनेची सुरूवात 'उदारा जगदाधारा देई मज असा वर, स्व-स्वरूपानुसंधानी रमो चित्त निरंतर' अशी होते. त्यांनी रचलेल्या अभंग ज्ञानेश्वरीच्या नित्यपाठाची सुरूवात 'आत्मरूपा तुज, करी नमस्कार, तुझा जयजयकार, असो देवा' अशी होते.

(दिवस तुझे हे फुगायचे)

लेखक गणेशा यांनी मंगळवार, 09/06/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या विडंबनाची खरी मजा, हे गाणे ऐकताना चालीत म्हणण्यातच. कुमार1 यांच्या धाग्यावर गाणी शोधताना हे गाणे ऐकले आणि त्याचे हे विडंबन शब्द झाले मोती -2 वर लिहिले.. तेच येथे पुन्हा देतो...
काव्यरस

बोहेमिअन रॅप्सडी

लेखक स्टार्क यांनी मंगळवार, 09/06/2020 22:05 या दिवशी प्रकाशित केले.
'ती आली, त्यांनी पाहिलं आणि ते हसले' फॉल सेमिस्टरपासून सुरू झालेल्या आमच्या फिलॉसॉफी क्लासचं हे एका वाक्यातलं वर्णन! एव्हाना रंगीबेरंगी फॉल सीझन संपून पांढर्‍याफटक हिवाळ्याने माझ्या शहराला - इथकाला आणि आमच्या युनिवर्सिटीला कह्यात घेतले होते. जणू शरदाचे सप्तरंग शिशिराने अलगद आपल्या पांढर्‍या बर्फात गोठून ठेवावेत आणि मग मन भरले की ते वसंताच्या हवाली करून निघून जावे. मला नेहमी वाटे....आमच्या ईथकातला शरद ऋतू म्हणजे अगदी एखाद्या मुरलेल्या चित्रकारासाराखा... सुबक आकारांमध्ये मोजून मापून रंग भरणारा....आणि रंगांच्या छटा एवढ्या अगणित की बस्स!

लाल रंगाचं विमान- बालकथा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी मंगळवार, 09/06/2020 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
---------------- चित्रक यक्षाच्या कथा ------------------------------ लाल रंगाचं विमान- बालकथा ------------------------------------------------------------ त्या एका मोठ्या प्रदर्शनाच्या बाहेर बिशन उभा होता. तो एक साधा मुलगा होता . केसांना भरपूर तेल लावून चोपून बसवलेला . खांद्याला पिशवी लटकवून , खेळण्यातली उडणारी विमानं विकण्यासाठी . त्याच्याबरोबर आणखी बरीच मुलं होती, पण ती त्याच्यापेक्षा मोठी होती. सगळेच काही ना काही विकत होते. उन्हाळ्याचे दिवस असल्याने प्रदर्शनाला गर्दी होती . त्या लोकांचा एक मालक होता. रोज त्याच्याकडून माल घ्यायचा, तो विकायचा व त्याला हिशोब द्यायचा.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग १ - स्वरूपबोध: प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:55 या दिवशी प्रकाशित केले.
'द सेल्फ' किंवा स्व-स्वरूप ही संकल्पना भगवान रमण महर्षींच्या बोलण्यात वारंवार येत असे. पावसच्या स्वामी स्वरूपानंदांच्या लेखनातही 'स्वामी म्हणे लाभे अवीट आनंद, लागलासे छंद स्वरूपाचा' या सारखे उल्लेख ठिकठिकाणी आहेत. रमण महर्षींनी उल्लेख केलेल्या स्वरूपाच्या बाबतीत पुढील गोष्टी लक्षात घेण्याजोग्या आहेतः 'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: प्रस्तावना

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 09/06/2020 18:18 या दिवशी प्रकाशित केले.
भगवान दक्षिणामूर्ती आणि भगवद्पाद पूज्य श्री आदि शंकराचार्य प्रणित अद्वैत वेदांताची परंपरा अखंड ठेवणार्‍या, तसेच आधुनिक काळाशी सुसंगत पद्धतीने 'आत्मविचार' या साधनापद्धतीचे पुनरुज्जीवन करणार्‍या भगवान श्री रमण महर्षीं या लोकोत्तर ज्ञानी सत्पुरुषाविषयी मराठी भाषेत फारसे साहित्य उपलब्ध नाही.

ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना

लेखक सिरुसेरि यांनी मंगळवार, 09/06/2020 15:47 या दिवशी प्रकाशित केले.
ऑटोग्राफ -- भुतकाळाला सामोरे जाताना --------- या कथेतील नायक आपल्या जीवनामधे अनेक टप्प्यांवर भले बुरे अनुभव घेउन आता आयुष्यात स्थिरावला आहे . त्याचे लग्नही ठरले आहे . आपल्या लग्नाच्या निमंत्रण पत्रिका घेउन तो जिथे त्याचे शाळेतील शिक्षण झाले त्या गावी निघाला आहे . गावाकडे जाणा-या कॅनॉल रोडवरुन चालताना त्याच्या मनात या गावातील शालेय जीवनातील आठवणी उलगडत आहेत .

फुलपाखरू

लेखक मन्या ऽ यांनी मंगळवार, 09/06/2020 09:22 या दिवशी प्रकाशित केले.
फुलपाखरू एक होते रंगेबेरंगी फुलपाखरू .. त्याचे 'मन' ऐसे नाव.. ईवलेसे नाजुक पंख तयाचे त्यावर सुंदर नक्षी संस्कारांची. फुलपाखराच्या पंखावरचे काही रंग लाल-गुलाबी स्वप्नांचे बालपणीच्या आठवणींचे उमलणार्या फुलांचे चांदण्या रातींचे तर काही रंग आहेत.,मात्र निळे-काळे नको त्या कटु आठवणींचे भळभळत्या जखमांचे चुलीतल्या विस्तवाचे.. त्याच कटु आठवणींने बळ तयाच्या पंखास दिले संकटावर मात करुन त्यास नव्या उमेदीने जगण्यास शिकवले!.. -दिप्ती भगत (१३जून, २०१९)

बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट !

लेखक संजय क्षीरसागर यांनी मंगळवार, 09/06/2020 01:31 या दिवशी प्रकाशित केले.
सोनम वांगचुक यांनी एबिपी माझाला दिलेली ही मुलाखत सर्व भारतीयांना विचार करायला लावणारी आहे. त्यांचे सर्व मुद्दे निर्विवाद आणि पटण्याजोगे आहेत. विषेशतः 'बॉयकॉट चायना विथ वॉलेट, नॉट द बुलेट' हे अभियान भारत सरकारच्या मर्जीवर अवलंबून नसून, भारतीयांच्या सहभागावर आणि त्यांच्या दृष्टीकोन बदलावर अवलंबून आहे. शिवाय हे अभियान भारतीयांच्याच नव्हे तर प्रचंड दडपशाहीखाली भरडल्या जाणार्‍या चिनी नागरिकांच्