Skip to main content

आई घरी जायला निघते तेव्हा...

लेखक प्राची अश्विनी यांनी शनिवार, 13/06/2020 09:35 या दिवशी प्रकाशित केले.
आई घरी जायला निघते तेव्हा, प्रवासासाठी म्हणून केलेले तिचे पराठे थोडे जास्तच होतात, चुकून. फ्रिजमध्ये केलेली असते माझ्या आवडीची केळफुलाची भाजी, रसाची आमटी.. बाबांकडून खवून घेतलेलं खोबरं, सोललेला लसूण.. डब्बा भरलेला असतो तिखट पु-या, चकलीनं.. दाण्याचं कूट, जीरेपूड, धणेपूड..

(धागा धागा.....)

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 12/06/2020 21:01 या दिवशी प्रकाशित केले.
धागा धागा पिंजत बसुया प्रतिसादांची चळत रचूया अक्षांशाचे अयनांशांशी बादरायणी सूत जुळवूया धागा विषया फोडुनी फाटे भरकटवुनी तो मजा बघूया अध्यात्माच्या मागावरती शब्दछलाचे तंतू टाकूया वस्त्र विणूया भरडे तरिही महावस्त्र त्यालाच म्हणूया पडलो तोंडावरती तरीही "जितं मया"चा घोष करूया धागा धागा पिंजत बसुया... (नंब्र विनंती: धागाभरकटतज्ञांनी कृ.ह.घे.) (प्रेर्ना: कवी पी. सावळाराम यांचे गीत " धागा धागा अखंड विणूया)
काव्यरस

बटाट्याच्या चाळीतला लॉकडाऊन

लेखक कुमार जावडेकर यांनी शुक्रवार, 12/06/2020 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
बटाट्याच्या चाळीतल्या 'लॉकडाउन'ची सुरुवातच गच्चीचं कुलूप उघडण्यानं झाली! चापशीनं पुढाकार घेऊन मेंढेपाटलांची परवानगी आणली; पण नेमका किल्ली हरवून बसला! वास्तविक ते कुलूप, कडी आणि दार इतके मोडकळीला आलेले होते की ते उघडण्यासाठी टाचणी, पिना, हातोडी, लाथ असं काहीही चाललं असतं. त्यानं आपल्या कानावरच्या बॉलपेनानं त्या कुलुपाची कळ फिरवली आणि चाळकऱ्यांची कळी खुलली. चाळकऱ्यांचं 'लॉकडाउन' यामुळे होऊ लागलेल्या 'अप-डाउन'मधून मार्गी (?) लागलं. 'निदान गच्चीतली हवा आणि ऊन तरी खायला मिळतील,' अशा समजातून ते मेंढेपाटलांना दुवा देऊ लागले.

तुकोबांचे निवडक अभंग

लेखक प्रसाद गोडबोले यांनी शुक्रवार, 12/06/2020 19:23 या दिवशी प्रकाशित केले.
|| पांडुरंग पांडुरंग || तुकोबा ग्रेट म्हणजे ग्रेट होते राव ! तुकोबांचे अभंग इतके साध्या सोप्प्या भाषेत मनातलं बोलुन जातात कि आपल्याला अजुन जास्त भारी बोलताच येत नाही. आणि हे इतके सोप्पे असल्याने ते कधीही कुठेही आठवतात ! ह्या इंटरनेटने अन गुगल ने शोधाशोध करायची अफलातुन सोय करुन दिली असल्याने अभंगातील एखादा चरण किंव्वा धृवपद जरी आठवत असेल तरी अख्खा अभंग शोधता येतो . नाहीतर हार्ड कॉपी उघडुन पहाण्यचा योगच आला नसता !

वादळ

लेखक पाषाणभेद यांनी शुक्रवार, 12/06/2020 13:04 या दिवशी प्रकाशित केले.
छप्पर उडून गेल्यानंतर पाऊस घरात येतो तोंडचा घास नाहीसा होतो भणाणता आलेले वादळ सारं उध्वस्त करीत जातं वाटेत येईल ते पाडत जातं मग ते काहीही असो घर खांब छप्पर झाड माड आणि मनही.

भगवान रमण महर्षी - वेध एका ज्ञानियाचा: विभाग ३ - सद्गुरू: प्रकरण ८ - गुरूतत्व

लेखक मूकवाचक यांनी शुक्रवार, 12/06/2020 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
या प्रकरणात अध्यात्मिक क्षेत्रात अत्यंत महत्वाच्या असलेल्या तसेच अध्यात्मिक साधकांच्या जीवनात निर्णायक भूमिका निभावत आलेल्या गुरूतत्वाविषयी भगवान श्री रमण महर्षींचे मनोगत आपण जाणून घेणार आहोत. डेव्हिड गॉडमन यांच्या प्रस्तावनेचा सारांश असा आहे: रमण महर्षी नेहेमी सांगत असत की ईश्वर, सद्गुरू आणि आत्मा यात कुठलाही भेद नाही (ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने, व्योमवद् व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः).

जुना वाडा

लेखक मनोज यांनी शुक्रवार, 12/06/2020 11:34 या दिवशी प्रकाशित केले.
एक जुना वाडा भंगलेले तुळशी वृंदावन विरलेली स्वप्नं अन् उदास माझं मन परसातल्या चाफ्याला आता येत नाहीत फुलं अंगणात कधीच खेळत नाहीत मुलं ओसरीवरचा चौफाळा वाऱ्यासोबत रडणारा दारातील पिंपळ दिवसभर झडणारा गंजलेले तावदान कुजलेली खिडकी धुळीने माखलेली उतरंडीची मडकी माळवदातील घरटं चिमणीने सोडलंय दारावरचं आडनाव केंव्हाच मोडलंय
काव्यरस

लोकडाउन सुरु आहे - भाग अंतिम - ते अतरंगी किस्से २

लेखक श्रीकांतहरणे यांनी गुरुवार, 11/06/2020 22:51 या दिवशी प्रकाशित केले.
रोजरोज ईज्जतिचा भाजीपाला न होऊ देता, घरमालकाकडे आंघोळीले, त्याच्या घरातून बाथरूम मदे जाण, हे काई आता जमत नॊत. त्यातल्या त्यात आमी तिघेही पयल्यान्दाच घरा बाहेर राहायले आलो होतो. मग अशात काहीतरी फालतू गोष्टी वरून, वाद होणार नाई त मंग ती दोस्ती कायची? नेहमी अनोळखी लोकांपेक्षा जे आपल्याले लय लाड करतात, जाच्यावर आपला हक्क आहे अस वाटते, अन मंग जर त्याने आपली मर्जी राखली नाई, त दुःख होऊन, राग याले लागतो, त्यातूनच भांडण होतात. अशाच कुठल्यातरी फालतू कारणामुळे, मी दुसऱ्या कुठल्यातरी मित्रांसोबत रूम शिफ्ट केली. मनीष अन राहुल्याले, मनश्याच्या वडिलांच्या ओळखीच्या काकांन, राहायला रूम दिला.

मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) ०२.११.२०१९ सेलम ते दिंडीगल

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी गुरुवार, 11/06/2020 22:01 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबई ते कन्याकुमारी सायकल सफर (दिवस नववा) ०२.११.२०१९ सेलम ते दिंडीगल सकाळी साडेसहा वाजता सेलम जवळच्या 'अन्नामार हॉटेल' कडून राईड सुरू झाली. आज राईड सुरू करतानाच सुर्योदयाचे दर्शन झाले होते. . सोपान, नामदेव आणि विकासने पंढरपूर सायकल वारीचे भगवे टीशर्ट घातले होते. विकासचा पाय दुखत होता. पण जिद्द कायम होती.

अहद-ए-वफ़ा… अहिस्ता...

लेखक सूक्ष्मजीव यांनी गुरुवार, 11/06/2020 20:36 या दिवशी प्रकाशित केले.
हरिहरन हे नाव गाण्याची थोडी देखील आवड असणाऱ्याला माहित नाही असे होऊ शकत नाही. पार्श्वगायन हा जरी त्यांचा प्रांत असला तरी त्याव्यतिरिक्त त्यांनी अनेक उत्तम गझल गायल्या आहेत. अर्थात हिंदी-उर्दू गझल चे नाव निघाले की ‘गुलाम अली, जगजीत सिंग किंवा नाही म्हणता पंकज उधास’ हेच ठळक गझल गायक म्हणून आपल्या समोर येतात. खऱ्या गझल प्रेमींमध्ये मग ‘अहमद आणि महमंद हुसेन’, सारखे किंवा ‘तलत अझीज भूपेंद्र सिंग, आणि चंदन दास’ सारखे गझल गायक आपले स्वतंत्र स्थान मिळवून आहेत. अगदीच कट्टर गझल पंथी ‘बेगम अख्तर, फरीदा खानुम, मेहदी हसन, आबिदा परवीन’ यांना हिमालया सारखे थोर समजतात.