शरीर..
ह्याचं शरीर ह्याला पुरेपूर ओळखून आहे.
फार जुनी सोबत आहे..!
ह्याचं शरीर चालतं, बसतं, लोळतं, लाडावतं, कधी बासरीसारखं झंकारतं..
शरीर ह्याच्या इच्छा विनातक्रार झेलत, ह्याच्यापाठोपाठ पळतं...तेव्हा हा कृतज्ञ नसतो शरीराबद्दल..
पण तेच आजारलं की मलूल होऊन पडून राहतं, तेव्हा मात्र ह्याला दगाफटका झाल्यासारखं वाटतं.
ह्याचं शरीर थरथरतं.
पिकल्या पानांबरोबर हल्लकफूल गिरक्या घेतं.
पाचोळा तुडवतानाचा आवाज ऐकत ऊर्जावान होतं.
कधी वेल्हाळ गाण्याबरोबर आपोआप डुलायला लागतं..
शरीर घारींसोबत आकाश तोलतं.
कधी सुनसान हायवेवर, सुसाट बाईकवर, वारा कापत
भिंगरी होतं.
पावसात भिजून लगदा होतं.
रखरखत्या ऊन्हात पाणी धरून ठेवतं..
मिसळपाव