Skip to main content

कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती.

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी मंगळवार, 07/07/2020 20:29 या दिवशी प्रकाशित केले.
कन्याकुमारी सायकलिंग... एक ध्येयपूर्ती. ०६.११.२०१९ . मुंबई ते कन्याकुमारी सायकलवारी करायचा प्रस्ताव आला. परंतु दिवाळीच्या दिवसात सायकलिंगसाठी मुंबई बाहेर जायचे, याला मन तयार होईना. वयाच्या त्रेसष्टाव्या वर्षी एव्हढी मोठी सायकल सफर करावी का हा सुद्धा विचार आला. आतापर्यंतच्या आयुष्यात कुटुंबासमवेत दिवाळी साजरी केली होती. ह्या वर्षी निसर्गसोबत साजरी करायची.

[समारोप] भगवान रमण महर्षी: वेध एका ज्ञानियाचा - महर्षींच्या उपदेशाचा सारांश

लेखक मूकवाचक यांनी मंगळवार, 07/07/2020 09:06 या दिवशी प्रकाशित केले.
प्रकरण १ - 'स्व' चे मूळ स्वरूप 'स्वरूपाचा' अर्थ आपले व्यक्तिमत्व असा नसून ती संकल्पना एका निर्वैयक्तिक आणि सर्वसमावेशक अशा विशुद्ध चैतन्याच्या अखंड अनुभूतीकडे इशारा करते. अहंकार, अस्मिता इत्यादिंच्या परिघात इंद्रियांच्या संयोगाने आलेल्या अनुभवांमुळे जन्माला आलेला, तसेच संस्कारांनी आणि वासनांनी बद्ध असलेला व्यक्तिमत्वदर्शक 'मी' आणि स्व-स्वरूप यात गल्लत होता कामा नये.

माझं नाशिक

लेखक प्रचेतस यांनी सोमवार, 06/07/2020 22:39 या दिवशी प्रकाशित केले.
माझा जन्म नाशिकचा. अशोकस्तंभाजवळच्या कुठल्याश्या हॉस्पिटलात माझा जन्म झाला. ४१२, वकीलवाडी हे माझं आजोळ. तिथं मामाचं कुटुंब आणि आजी आजोबा राहायचे. ४१२ चं घर भाड्याचं. जुन्या पद्धतीचं वाडावजा घर. त्यात बरेच भाडेकरु असंत. मुख्य दरवाजातून आत शिरताच एक अंधारा बोळ, त्यातून बाहेर पडल्यावर चौक, तिथून करवादत्या लाकडी जिन्याने वर जाताच दुसर्‍या मजल्यावर मामाचं घर. पुसटसं आठवतंय आता. बाहेरची मुख्य खोली, माजघर आणि रस्त्याकडेला उतरत्या कौलांनी निमुळती झालेली एक माडी. दिवाळीत, उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये मी नाशिकला जायचा. कधी आईवडीलांबरोबर तर कधी मामांसोबत. त्या घरातली माडी ही माझी आवडती जागा.

गुलाबी कागद निळी शाई - पत्रांक ६ शहारा

लेखक @tul यांनी सोमवार, 06/07/2020 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
प्रियांसी impulsive attitude वाली वैगरे तू आहेस याचा अंदाज आहे मला गेली दोन वर्ष तुझ्या नकळत तुझ्या प्रत्येक हालचालीकडे, तुझ्या उठण्या बसण्याकडे लक्ष होतं माझं. पुरुष मूळचा शिकारी त्या शिकाऱ्या प्रमाणे तुझ्यावर पाळत होती. चांगल्या नजरेने हां :) मला ते friday yoga day वैगरे ज्याम कंटाळवाणं वाटायचं पण त्या सेशनला तुला एकदा जाताना पाहीलं आणि मी ही येऊ लागलो. केवळ तुझ्यामुळे काही महिने स्वास्थ का खयाल झाला. मग पुन्हा येरे माझ्या मागल्या. त्या योग टीचर ने माझी शिकारी नजर ओळखली बहुदा आणि मी घाबरून बंदच केलं येणं. तुझ्या बरोबर लंच टाइम पण adjust केलेला. लांब बसायचो एकटाच तुला बघत.

क्षमा प्रार्थना

लेखक ज्ञानोबाचे पैजार यांनी सोमवार, 06/07/2020 11:48 या दिवशी प्रकाशित केले.
https://www.misalpav.com/node/47149#new शाम भागवत सरांचा हा धागा वाचून मनात काही विचार आले ते शब्दबध्द केले आहेत. त्या धाग्यावर हे टाकले तर कदाचित विषयांतर होईल असे वाटल्याने वेगळा धागा काढत आहे. जसे सुचले तसे लिहिल्याने कदाचित हे वाचताना विस्कळीत वाटेल, तसे वाटले तर तो माझ्या आकलनाचा दोष समजून वाचकांनी मला क्षमा करावी व भावार्थ समजावून घेण्याचा प्रयत्न करावा.
काव्यरस

अप्रिय आठवणींपासून सुटका

लेखक शाम भागवत यांनी सोमवार, 06/07/2020 09:25 या दिवशी प्रकाशित केले.
मे २००७ च्या सुरवातीला जीवनविद्या मिशने मांडलेल्या तत्त्वज्ञानाचा अभ्यास करायला मला सुचवले गेले होते. मला माझ्यातल्या नकारात्मक भावनांवर ताबा मिळवण्यासाठी हे सुचवले गेले आहे हे मला त्यावेळी माहीत नव्हते. २००७ च्या सुरवातीपासून अंदाजे दीड वर्षे मी अभ्यास करीत होतो. मे २००७ च्या पहिल्या आठवड्यात घडलेली ही गोष्ट आहे. एक दिवस रात्री गाढ झोपलेलो असताना एकदम जाग आली. पहाटेचे साडेचार पाच वाजले असतील. मनात विचार सुरू होत असतानाच माझा जपही सुरू झाला होता. एवढ्यात मला नेहमी त्रास देणाऱ्या एका माणसाची आठवण आली आणि मन एकदम संतापाने भरून गेले. हातात पिस्तूल घेऊन गोळ्या माराव्याश्या वाटत होत्या.

सभा आणि मागच्या-पुढच्या वेळा

लेखक लेखनवाला यांनी सोमवार, 06/07/2020 02:52 या दिवशी प्रकाशित केले.
वेळ- सभेचा दिवस शनिवार होता, सकाळपासूनच प्रंचड उत्सुकता होती, साहेब काय बोलणार?, कामावरुन बरोबर सहाला सुटला तो, शहरातल्या तलावाच्या जरा अगदी पुढे बाजूच्या रस्त्यावरच सभा असणार होती, नेहमी नेमका वर्दळीचा, गाडयांनी भरलेला रस्ता आज माणसांनी भरुन जाणार होता, इतके दिवस तो साहेबांना टीव्हीवरच बघत होता, आज प्रत्यक्ष बघायचं होतं, साहेबांच्या नावातच वलय होतं, करिश्मा होता. समोरच्याला मोहित करेल, भारावून टाकेल असचं भाषण करायचे. समोरचा त्यांच्या कितीही विरोधी विचाराचा असो….

कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९

लेखक सतीश विष्णू जाधव यांनी रविवार, 05/07/2020 21:03 या दिवशी प्रकाशित केले.
कन्याकुमारी दर्शन आणि प्रदूषणमुक्तीचा संदेश ०५.११.२०१९ सकाळी लक्ष्मण आणि मी लवकर उठून सायकलसह कन्याकुमारीच्या त्रिवेणी संगमावर सूर्योदय दर्शन घेतले. . सूर्याचा तांबूस गोळा स्वामी विवेकानंद स्मारकावर विलसत होता. कन्याकुमारी मंदिराच्या मागच्या बाजूला सूर्योदय दर्शनासाठी जनसागर लोटला होता. तेथून सकाळची सायकल रपेट मारावी म्हणून जवळच्या सनसेट पॉइंटवर सुद्धा गेलो.

गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti)

लेखक ytallfun@gmail.com यांनी रविवार, 05/07/2020 11:41 या दिवशी प्रकाशित केले.
आज आपण बघणार आहे की गुरु पूर्णिमा का साजरा केला जातो? (guru purnima marathi mahiti), हेचे कारण गुरुची प्रमुख भूमिका भारतात मानली जाते. पण तुम्हाला माहित आहे गुरु पौर्णिमा का साजरा केला जातो? जरी जगभरातील एखाद्या व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्वाला परिष्कृत करण्यासाठी शिक्षणाला प्राधान्य दिले गेले आहे, परंतु शिक्षण असेल तर भारतात शिक्षणाला महत्त्व दिले गेले आहे. अशी एक म्हण आहे की केवळ गुरुच आपल्या शिष्याला शर्ममार्गाचे दर्शन देतात.

रात्र - चारोळी

लेखक शब्दानुज यांनी शनिवार, 04/07/2020 22:30 या दिवशी प्रकाशित केले.
मदनाच्या भेटीला आज रती ही आली चंद्राच्या कुशीत ती चांदणी विसावली तुझ्या माझ्या प्रितीसाठी रात्र थबकली दूर का उभी तू तिथे ये इथे जवळी
काव्यरस