Skip to main content

पुरोगामी, लिबरल्स लोकांनी आता करायचे तरी काय ??? कोणती नवी चाल खेळायची?

लेखक सुधीर मुतालीक यांनी गुरुवार, 06/08/2020 22:53 या दिवशी प्रकाशित केले.
संघाचे काल भूमी पूजनाच्या निमित्ताने झालेले भव्य दर्शन त्या समस्त तथाकथित बुद्धिवंत पुरोगामी आणि लिबरल लोकांस किती त्रासदायक असेल ??? संघाच्या एक एक अजेंड्याची अशी पूर्तता होताना बघून किती यातना होत असतील ? चार पाच वर्षांपूर्वी पर्यंत स्वप्नात देखील या देशात कुणी कल्पना केली नव्हती की 370 कलम इतक्या लवकर हटवले जाईल. संघ गेली सत्तर वर्षे सातत्याने समस्त परिवारातल्या कार्यकर्त्याना 370 कलम हटविण्या संबंधीचा नारा देत होता आणि आपल्या उरीचे ते स्वप्न कार्यकर्ता जगत होता. सत्ता अशा स्वप्नांसाठी करायची आहे याची पदोपदी जाण होती आणि आहे. हमे राज नही, समाज बदलना है - कार्यकर्ता हेच तत्व जगतो आहे.

बाधा

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी गुरुवार, 06/08/2020 21:39 या दिवशी प्रकाशित केले.
बाधा ------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------ संध्याकाळची वेळ . गोकुळात तरुण आणि अवखळ गोपींचा खेळ रंगात आला होता . त्या झोके खेळत होत्या . फेर धरत होत्या आणि गाणीही म्हणत होत्या . मनभावन श्रावणऋतु होता ना . राधा मात्र सख्यांची नजर चुकवून पळाली . तिला आता यमुनाकाठ गाठायचा होता . हुरहूर लावणारीच ती वेळ . हवेत सुखद गारवा . सोनेरी पिवळसर ऊन . झाडांच्या शेंड्यांशी सलगी करणारं . घरी जाण्यापूर्वी प्रियाच्या गळ्यात लडिवाळपणे झुलणाऱ्या अभिसारिकेसारखं . पक्ष्यांचा किलबिलाट चाललेला . घरट्यांकडे परतण्यापूर्वीचा .

बुंदीचे लाडू ....

लेखक पियुशा यांनी बुधवार, 05/08/2020 18:32 या दिवशी प्रकाशित केले.
बुंदीचे लाडू हा आमचा आवडीचा लहानपणापासूनचा सवंगडी :) सध्या कोरोनामुळे बाहेरच खाण टाळत रक्षाबंधनासाठी घरीच लाडू केले . लहानपणी जवळ जवळ बऱ्याच लग्नात बुंदी किंवा बुंदीचे लाडू सगळ्यांच्याच खाण्यात आले असतीलच, आताशी लग्ना मध्ये वेगवेगळ्या मेनुच्या गर्दीत बुंदी न बुंदीचे लाडू जणू हद्दपारच झालेत असो .

विराणी- गझल

लेखक मी-दिपाली यांनी बुधवार, 05/08/2020 16:59 या दिवशी प्रकाशित केले.
गझल एक संवेदनशील काव्यप्रकार ! ज्याची मोहिनी जितकी गझलकाराला असते तितकीच तिचा आस्वाद घेणाऱ्याला असते. जेव्हा गझल लिहिण्याचा प्रयत्न करायचं ठरलं तेव्हा खुपच जुजबी माहिती होती. म्हणजे गझलेत प्रामुख्याने विरोधाभासी प्रतिकांचा वापर केला जातो. उदा.भोगले जे दुःख त्याला सुख म्हणावे लागले, सुगंधी जखमा,लाघवी खंजीर यांसारख्या. पण अधिक माहिती जाणुन घेण्यासाठी गुगलुन बघितलं तर ब्रह्मांडच हाती आलं. गझल इतकी तंत्रशुद्ध असते याची कल्पनाच नव्हती. गझलेत पाच ते सतरा द्विपदी असतात. त्यातील पहिल्या द्विपदीला मतला असे म्हणतात तर बाकीच्यांना शेर.

अविनाश कुलकर्णी.. भावपुर्ण श्रद्धांजली.

लेखक गणेशा यांनी बुधवार, 05/08/2020 14:07 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच fb वर ऑर्कुट मित्राने सांगितले की आमचे चिरतरुण मित्र, आपले लाडके मिपाकर, अविनाश काका यांचे 30 तारखेला निधन झाले.. देव त्यांच्या आत्म्यास शांती देवो.. भावपुर्ण श्रद्धांजली.. अविनाश काका आणि आमची खरी भेट ऑर्कुट वर झाली. नंतर कित्येक संध्याकाळ आम्ही म्हात्रे ब्रिज वरील multi spice मध्ये भेटायचो.. किती गप्पा.. किती चांगले सल्ले पण दिले त्यांनी मला.. घराबद्दल.. लग्नाबद्दल.. किती गोष्टी.. त्यांच्या कारखाण्यांचे दिवस सांगायचे ते बऱ्याचदा.. फॉरेन ला असलेल्या मुली बद्दल पण मस्त बोलायचे.. नंतर हॉटेल विश्व् ला आम्ही मी आणि ते चहा आणि टोस्ट खायला भेटायचो.. एकदा काकी पण आल्या होत्या..

!जय श्री राम! - अखेर श्री. मोदींनी करुन दाखवलं

लेखक प्रमोद देर्देकर यांनी बुधवार, 05/08/2020 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
ढुशक्लेमरः- माझा भाजप पक्षाशी कोणाताही संबध नाही आणि मी मोदीभक्तही नाही. जे जे मनात आलं आणि आठवलं तसं तसं लिहत गेलो. ----------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------------- आज अयोध्येत पं.प्र. श्री. नरेंद्र मोदी यांच्या हस्ते राम मंदिराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडणार आहे.

संपला फ्रेंडशिप डे......

लेखक सुधीर मुतालीक यांनी बुधवार, 05/08/2020 06:55 या दिवशी प्रकाशित केले.
कसला डोंबलाचा फ्रेंडशिप डे. च्येष्टाय गड्या हा डे !!! ‘मी तुला माझा फक्त चांगला मित्र मानते...' या वाक्याची लय भीती वाटायची राव ! कोंच्या क्षणी थोबाडावर हे वाक्य येऊन आदळेल याचा नेम नसायचा. बरं, ते आलंच अंगावर की मेंदू त्यावेळी मात्र सटासट कॅल्क्युलेशन करायचा. तेवढे फास्ट कॅल्क्युलेशन इंजिनियरिंगला असताना झाले असते तर आज कुठच्याकुठं गेलो असतो आपण!