Skip to main content

विसावा.

लेखक अशोक गोडबोले यांनी मंगळवार, 18/09/2007 23:54 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. माझे परमस्नेही आणि रसिकाग्रणी श्री तात्या अभ्यंकर यांच्या मिसळपाव या संकेतस्थळावर लिहिताना मला अतिशय आनंद होत आहे. खास तात्यांच्या आग्रहाखातर मी खालील चार ओळी लिहिल्या आहेत त्या गोड मानून घ्या, ही विनंती!
Taxonomy upgrade extras

मला आवडणारे आंतरजालावरील काही लेखक

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 23:45 या दिवशी प्रकाशित केले.
सगळेच लेखक आणि कवी चांगले असतात. पण जे माझ्या कंपूतले ते जरा भारीच आहेत. मी प्रियाली, टग्या ह्यांना माझ्या कंपूतले समजतो म्हणून त्यांचं लिखाण, प्रतिसाद मला भारीच वाटतात. आम्ही प्रत्यक्षात भेटलो नसलो तरी आमची मांडवली झाली आहे. त्यामुळेच टग्याची टगेगिरी मला भलतीच आवडते आणि व्यासंगी प्रियालीचे अभ्यासपूर्ण लेख मला भलतेच रंगतदार वाटतात. तसे सगळेच कवी बरे लिहितात. पण "माझ्याएवढं चांगलं कुणी लिहू शकत नाही," हे मी माझ्या तोंडून तर म्हणू शकत नाही ना. समजून घ्या. फार त्रास होतो हो. जाऊ द्या.

काय ?कुठे ? कसे? का? कोण? केव्हा?

लेखक ॐकार यांनी मंगळवार, 18/09/2007 20:53 या दिवशी प्रकाशित केले.
प्रत्येकाला लहानपणापासून हे असं का? तसं का नाही? एखादी गोष्ट इथे का आहे? तिथे का नाही? हे कोणी केलं? असं कसं झालं? असे प्रश्न पडत असतात. कधीकधी प्रश्न कठीण तर उत्तर अगदी सोप्पं असतं पण ते काही केल्या सापडत नाही. तर कधी प्रश्न साधाच पण उत्तर मात्र बर्‍याच विचाराअंती सापडतं. अशा अडलेल्या, सुटलेल्या, कठीण, साध्या, पांचट, आचरट,पोरकट प्रश्नोत्तरांकरता हे मेनुकार्ड! मला सतावणार्‍या प्रश्नाने आणि मला माझ्यापरीने शोधता आलेल्या उत्तराने मी गमभन करतो ;) प्र. रंगांना लाल, पिवळा, काळा इ. इ. नावे असतात. पण वासांना नावे का नाहीत? उ. घाण, उबस, कुबट वास असतात.

सोमप्रदोष

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 18/09/2007 20:39 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, या महिन्यातील दोन्ही प्रदोष हे सोमप्रदोष आहेत. शिवभक्तांसाठी या दिवसाचे महत्व फार असल्याने मुद्दाम येथे देत आहोत. भाद्रपद शुक्ल पक्ष प्रदोष - दिनांक २४ सप्टेंबर २००७ , सूर्यास्त १८.४७ , सूर्योदय २५ सप्टेंबर -०६.२९ भाद्रपद कृष्ण पक्ष प्रदोष - दिनांक ८ ऑक्टोबर २००७, सूर्यास्त १८.२१, सूर्योदय ९ ऑक्टोबर - ०६.३२ मुंबईचे सूर्योदय सूर्यास्त दिले आहेत. त्यानुसार निषिथकाल काढून घ्यावा. आपला, (शैव) धोंडोपंत { धोंडोपंत कुणाशीही कोणत्याही विषयावर वाद घालत नाहीत. त्याचप्रमाणे ज्योतिष विषय वगळता कोणत्याही विषयावर भाष्य करीत नाहीत.

विलोपले मधु मिलनत ह्या............

लेखक तर्री यांनी मंगळवार, 18/09/2007 14:21 या दिवशी प्रकाशित केले.
हे नाट्य-पद कोण्त्या नाटकामधील आहे? आणि कोणत्या रागावर आहे?................कोणी जाणकार मला सान्गेल का ?

हंगामी/काळजीवाहू पंचायत समिती!

लेखक सरपंच यांनी मंगळवार, 18/09/2007 13:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, मिसळपाव पंचायत समितीचे काम सध्या खालील मंडळींनी पाहायचे मान्य केले आहे, त्याकरता ह्या सर्वांचे मनापासून आभार.. १) नीलकांत २) प्रियाली ३) आजानुकर्ण ४) कोलबेर ५) विकास मिसळपाव ग्रामपंचायतीमधील लेखनाचा आणि प्रतिसादांचा दैनंदिन कारभार कसा चालावा, कसा चालू नये हे सर्व ठरवण्याचा संपूर्ण अधिकार या मंडळींचा आहे! खुद्द विसोबा खेचर हा इसमही याला अपवाद असणार नाही/असू नये असे वाटते! सदर पंचायत समिती ही तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीकरता काळजीवाहू किंवा हंगामी म्हणून काम पाहील. त्यानंतर निवडणुका होऊन पुढची पंचायत समिती अस्तित्वात येईल.

शायरे आज़म

लेखक चित्तरंजन भट यांनी मंगळवार, 18/09/2007 11:22 या दिवशी प्रकाशित केले.
दिलावर फ़िगार ह्या उर्दू हास्य कवीची ही 'शायरे आज़म' कविता मराठीतील काही अरभाट किंवा चिल्लर कवींनाही लागू व्हावी. वाचा आणि आनंद घ्या. कुठे काही अडखळले तर जरूर विचारा.. शायरे आज़म कल इक अदीबो-शायर व नाक़िद मिले हमें कहने लगे की आओ ज़रा बहस ही करें करने लगे बहस की अब हिंदो-पाक में वो कौन है के शायरे-आज़म जिसे कहें मैंने कहा 'जिगर'! तो कहा डेड हो चुके! मैंने कहा के 'जोश'! कहा, क़द्र खो चुके मैंने कहा 'फ़िराक़' की अज़मत का तबसरा! बोले 'फ़िराक़' शायरे-आज़म!

विसोबांना खेटरं! :)

लेखक विसोबा खेचर यांनी मंगळवार, 18/09/2007 10:20 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, सदर संकेतस्थळ सुरू होऊन अवघे दोन-तीन दिवसही झाले नसताना, विसोबांना काही एक ब्रिदिंग टाईम घेऊ न देता, काही गोष्टी ठरवण्याआधीच त्याची खेटरांनी पूजा बांधणार्‍या सर्व पूजकांचे येथे हार्दिक स्वागत आहे! :) आता हाणा त्यांना बिनधास्त! :) आपला, विसोबा खेचर!

चला कथा लिहू या

लेखक आजानुकर्ण यांनी मंगळवार, 18/09/2007 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
मनोगतावर तात्यांनी असा एक उपक्रम सुरू केला होता असे आठवते. आपल्याकडे अतिशय प्रतिभावान साहित्यिक आहेत. चला आता सर्वजण मिळून एक कथा लिहूया. १. प्रत्येक प्रतिसादकर्त्याला एक परिच्छेद लिहिण्याची परवानगी आहे. २. परिच्छेद शक्यतो दहा ओळींपेक्षा जास्त नसावा ३. सलग २ प्रतिसाद देऊ नयेत. अशी साधारण मार्गदर्शक तत्त्वे. चला तर मग.

गोष्ट जन्मांतरीची

लेखक विकास यांनी मंगळवार, 18/09/2007 06:49 या दिवशी प्रकाशित केले.
मिसळपाव या उपक्रमावर, जो काही चालू केल्या केल्या ऐन गणपतीत काही जणांनी शिमगा केला, तो वाचताना जे वाटले, त्याबद्दलचे हे मनोगत! :) आंतर्जालावर मनोगत, उपक्रम आणि मिसळपाव या तीन मराठी संकेतस्थळांशी माझा संबंध त्याच क्रमात आला. यातील आंतर्जाल कालचक्राच्या संदर्भात मनोगत प्रौढावस्थेत, उपक्रम पौंगाडावस्थेत आहेत तर मिसळपाव "तान्हेच" म्हणायला हवे. आता तान्ह्याबद्दल त्याला शिंग फुटे पर्यंत बोलणे अयोग्य वाटते. पण मनोगत आणि उपक्रम या दोन्हीमधे व्यक्तीस्वभावाप्रमाणेच चांगल्या-वाईट गोष्टी आढळतील. त्यात प्रत्येकाचा हवा असलेला आणि नसलेला लोकसंपर्क घडणे पण साहजीकच आहे.