हंगामी/काळजीवाहू पंचायत समिती!
राम राम मंडळी,
मिसळपाव पंचायत समितीचे काम सध्या खालील मंडळींनी पाहायचे मान्य केले आहे, त्याकरता ह्या सर्वांचे मनापासून आभार..
१) नीलकांत
२) प्रियाली
३) आजानुकर्ण
४) कोलबेर
५) विकास
मिसळपाव ग्रामपंचायतीमधील लेखनाचा आणि प्रतिसादांचा दैनंदिन कारभार कसा चालावा, कसा चालू नये हे सर्व ठरवण्याचा संपूर्ण अधिकार या मंडळींचा आहे! खुद्द विसोबा खेचर हा इसमही याला अपवाद असणार नाही/असू नये असे वाटते!
सदर पंचायत समिती ही तीन ते सहा महिन्यांच्या कालावधीकरता काळजीवाहू किंवा हंगामी म्हणून काम पाहील. त्यानंतर निवडणुका होऊन पुढची पंचायत समिती अस्तित्वात येईल. निवडणुकीतून कुणाला निवडून द्यायचे किंवा नाही हे मिसळपावची ग्रामस्थ मंडळी ठरवतीलंच!
तो पर्यंत मात्र वरील पंचायत समितीचा निर्णय सर्वांना 'पाचामुखी परमेश्वर' या न्यायाने बंधनकारक राहील. ग्रामस्थांनी आपल्या सर्व शंकाकुशंका, कंप्लेन्टी वरीलपैकी कुणाहीकडे कराव्यात!
जय खंडोबा!
जय अंबाबाई!
जय रवळनाथ!
कळावे,
सरपंच,
मिसळपाव बुद्रुक,
तालुका - ड्रुपल
जिल्हा - आंतरजाल!
वाचने
19165
वाचनखूण
प्रतिक्रिया
15
क्या बात है
In reply to क्या बात है by सहज
कदाचित,
In reply to कदाचित, by विसोबा खेचर
हे लय भारी
हगामा
In reply to हगामा by प्रकाश घाटपांडे
पुरेशी रेवडी! :)
३३% चं काय?
In reply to ३३% चं काय? by प्रियाली
सही आयडी आहे
In reply to सही आयडी आहे by सहज
विजयाशांती आणि किरण बेदी
In reply to विजयाशांती आणि किरण बेदी by प्रियाली
हा हा हा!
सही निवड !
दुवा!
अनुभव
अहो,
In reply to अहो, by राजे (verified= न पडताळणी केलेला)
तांत्रीक गडबड
In reply to तांत्रीक गडबड by विकास
धन्यवाद.